सिडनी : ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 51 धावांनी विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकाही जिंकली. ऑस्ट्रेलियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. विराटने या सामन्यात विजयी आव्हानाचं पाठलाग करताना झुंजार खेळी केली. विराटने 87 चेंडूत 7 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने 89 धावा केल्या.या खेळीसह कोहलीने विराट कामगिरी केली आहे. अशी कामगिरी करणारा विराट तिसराच भारतीय फलंदाज ठरला आहे. india vs australia 2020 india captain virat kohli became the third indian and overall eighth batsman to complete 22,000 runs in international cricket
विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 22 हजार धावा पूर्ण करण्याचा कामगिरी केली आहे. विराटने एकूण 418 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे. अशी कामगिरी करणारा तो ओव्हरऑल 8 वा तर टीम इंडियाचा तिसराच खेळाडू ठरला आहे.
22,000 international runs for Virat Kohli ?
Describe this cricketer in one word ? pic.twitter.com/wPH6ELCUmV
— ICC (@ICC) November 29, 2020
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत ब्रायन लारा, राहुल द्रविड, जॅक कॅलिस, महिला जयवर्धने, रिकी पॉन्टिंग, कुमार संगकारा आणि सचिन तेंडुलकर या 7 खेळाडूंनी 22 हजारांपेक्षा अधिक धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे हे सर्व माजी खेळाडू आहेत. विराट 22 हजार धावा करणारा आठवा आणि आजी खेळाडू ठरला आहे.
विराटच्या आधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाच्या 2 फलंदाजांनाच 22 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत. यामध्ये सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडचा समावेश आहे. सचिनच्या नावे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम आहे. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 34 हजार 357 धावा केल्या आहेत. तर राहुल द्रविडने 24 हजार 64 धावा केल्या आहेत.
22000 international runs for King Kohli ??#TeamIndia pic.twitter.com/ulWqBZ3tuM
— BCCI (@BCCI) November 29, 2020
विराटने एकूण 418 आंतरराष्ट्रीय सामन्यातील (एकदिवसीय, टी 20 आणि कसोटी) 462 डावांमध्ये 56.15 च्या सरासरीने 22 हजार 11 धावा केल्या आहेत. यामध्ये विराटने एकूण 70 शतकं तर 105 अर्धशतकं लगावली आहेत.
दरम्यान ऑस्ट्रेलियाविरोधातील एकदिवसीय मालिकेतील शेवटचा आणि अखेरचा सामना बुधवारी 2 डिसेंबरला खेळण्यात येणार आहे. या सामन्यात विजय मिळवून शेवट गोड करण्याचा प्रयत्न टीम इंडियाचा असणार आहे.
संबंधित बातम्या :
India vs Australia 2020 | विराट कोहलीने रचला इतिहास, हा रेकॉर्ड करणारा 9 वा भारतीय खेळाडू
india vs australia 2020 india captain virat kohli became the third indian and overall eighth batsman to complete 22,000 runs in international cricket