Brain Lara | सूर्यकुमार यादव क्लास खेळाडू, ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याला संधी मिळायला हवी होती : ब्रायन लारा
सूर्यकुमारने आयपीएलच्या 13 व्या मोसमात धमाकेदार कामगिरी केली.
मुंबई : मुंबई इंडियन्सच्या सूर्यकुमार यादवने आयपीएलचा 13 वा मोसम चांगलाच गाजवला. या मोसमात त्याने दमदार कामगिरी केली. मुंबईला पाचव्यांदा विजेतेपद मिळवून देण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली. मात्र त्यानंतरही सूर्यकुमारची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड करण्यात आली नाही. सूर्यकुमारची निवड न झाल्याने टीम इंडियाच्या माजी खेळाडूंनी संताप व्यक्त केला. यानंतर वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराने सूर्यकुमार बाबतीत वक्तव्य केलं आहे. सूर्यकुमारची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड व्हायला हवी होती, असं लारा म्हणाला. india vs australia 2020 suryakumar yadav should have been part of australia tour says former west indies captain brian lara
“सूर्यकुमार क्लास खेळाडू आहे. जे फलंदाज धावा करतात मी त्याच फलंदाजांना पाहत नाही. तर मी त्यांची फलंदाजी करण्याची पद्धत, कुवत आणि ते दबावत्मक परिस्थितीत कशी कामगिरी करतात हे पाहतो. सूर्यकुमारने मुंबईसाठी धमाकेदार कामगिरी केली आहे:”, असं लारा स्टार स्पोर्ट्सच्या क्रिकेट कनेक्टेड या कार्यक्रमात बोलत होता.
“सूर्यकुमार, रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉकनंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी यायचा. लक्षात ठेवा, सलामीवीरांनंतर तिसऱ्या क्रमांकावर येणारा फलंदाज हा सर्वश्रेष्ठ फलंदाज असतो. तसेच विश्वासूही असतो. सूर्यकुमारची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड होईल, अशी आशा होती”, असंही लारा म्हणाला.
“निवड न झाल्याने निराश होतो”
सूर्यकुमारने काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड न झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली. “ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड करण्यात आली. तेव्हा मी फार निराश होतो. माझी निवड होईल, अशी मला आशा होती. मी आयपीएलमध्ये चांगली फंलदाजी करत होतो. मी गेल्या 2 वर्षांपासून चांगली कामगिरी करत होतो”, अशी प्रतिक्रिया सूर्यकुमारने एका हिंदी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमादरम्यान दिली होती.
“रोहितनं प्रोत्साहित केलं”
“मी निराश असल्याचं पाहून रोहित शर्मा माझ्याजवळ आला. रोहितने माझी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. निवड झाली नाही, याबाबत फार विचार करु नकोस. तुला नक्कीच संधी मिळेल. त्या संधीची वाट बघ. तुझ्याकडे निवड समितीच्या पदाधिकाऱ्यांच लक्ष वळवण्याची संधी आहे. ती संधी दवडू नकोस”. असा सल्ला रोहितने दिल्याचं सूर्यकुमार म्हणाला होता.
रवी शास्त्री आणि सचनिचा खास संदेश
टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी काही दिवसांपूर्वी सूर्यकुमारला ट्विटद्वारे संदेश दिला होता. ‘सूर्य’ नमस्कार, असाच कणखर रहा आणि धीर ठेव, असा मेसेज शास्त्री यांनी दिला होता.
तसेच सचिननेही सूर्यकुमारला संदेश दिला होता. सूर्यकुमारने एका मुलाखतीत याबाबत माहिती दिली होती. “तू तुझ्या खेळाशी एकनिष्ठ आणि इमानदार राहशील तेव्हा हा खेळ तुझी काळजी घईल. आत्ता तुझ्यासमोर जो अडथळा दिसतोय तो कदाचित शेवटचा असू शकतो. भारतासाठी खेळणं हे तुझं स्वप्न लवकरच सत्यात उतरु शकतं. स्वतःला क्रिकेटसाठी समर्पित कर. मला माहीत आहे की, तू लगेच हार मानणाऱ्यांपैकी नाहीस, तू चालत राहा आणि आम्हाला आनंदी होण्याचं निमित्त देत जा, असा संदेश सचिनने दिला असल्याचं सूर्यकुमारन म्हणाला होता.
दरम्यान या पार्श्वभूमीवर सूर्यकुमारने एक ट्विट केलं आहे. पुढे जात राहणं भाग आहे. मी थांबण्यासाठी इथवर आलो नाही, असं ट्विट सूर्यकुमारने केलंय.
Keep going,because you did’nt come this far to only come this far??? pic.twitter.com/WX3Xv7Zd66
— Surya Kumar Yadav (@surya_14kumar) November 22, 2020
सूर्यकुमारची आयपीएलच्या 13 व्या मोसमातील कामगिरी
सूर्यकुमार आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील 16 सामने खेळला. या 16 सामन्यात त्याने 4 अर्धशतकांसह 480 धावा केला. ईशान किशन आणि क्विंटन डी कॉकनंतर सूर्यकुमार मुंबईकडून सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज ठरला.
संबंधित बातम्या :
india vs australia 2020 suryakumar yadav should have been part of australia tour says former west indies captain brian lara