India vs Australia 2020 | टीम इंडियाकडे 5 स्टार खेळाडू, कांगारुना त्यांच्याच घरात पराभूत करु, रवी शास्त्रींना विश्वास

टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय, टी 20 आणि कसोटी मालिका खेळणार आहे.

India vs Australia 2020 | टीम इंडियाकडे 5 स्टार खेळाडू, कांगारुना त्यांच्याच घरात पराभूत करु, रवी शास्त्रींना विश्वास
Follow us
| Updated on: Nov 25, 2020 | 12:49 PM

सिडनी : टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर (India Tour Australia 2020) आहे. टीम इंडिया या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय, टी 20 आणि कसोटी मालिका खेळणार आहे. मात्र एकदिवसीय आणि टी 20 पेक्षा कसोटी मालिकेला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. या कसोटी मालिकेत दोन्ही संघांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. टीम इंडियाने अखेरच्या दौऱ्यात ऑस्ट्रेलिाचा कसोटी मालिकेत 2-0 च्या फरकाने पराभव केला होता. यावेळेसही टीम इंडिया कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध भिडण्यासाठी सज्ज आहे. आमच्याकडे फॅब्युस फाईव्ह आहेत. म्हणजेच टॉप 5 खेळाडू आहेत. टीम इंडियाचे 5 खेळाडू ऑस्ट्रेलियाचा कसोटी मालिकेत पराभव करतील, असा विश्वास भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींनी (Team India Head Coach Ravi Shastri)व्यक्त केला आहे. india vs australia 2020 team india fabulous 5 players to beat australia in test series at home believes head coach ravi shastri

“आमच्याकडे फॅब्युलस फाईव्ह खेळाडू”

“मी टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजीबद्दल आश्वस्त आहे. आमच्याकडे जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि नवदीप सैनी असे एकूण फॅब्युलस फाईव्ह गोलंदाज आहेत. उमेश अनुभवी आहे. नवदीप सैनी तरूण आहे. तसेच त्याच्याकडे वेगाने गोलंदाजी करण्याचे कौशल्य आहे. बुमराह सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. शमी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्यासाठी सज्ज आणि उत्सुक आहे. मोहम्मद सिराज ऑस्ट्रेलियाचा पाडाव करण्साठी तयार आहे. या सर्व गोलंदाजांमध्ये कांगारुना त्यांच्याच घरात पराभूत करण्याची क्षमता आहे, आणि ते नक्कीच करतील”, असा विश्वासही शास्त्रींनी व्यक्त केला.

रवी शास्त्री काय म्हणाले?

Sport Starच्या वृत्तानुसार, भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांना या मालिकेतील ताणतणावाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर ते उत्तर देताना म्हणाले की “दबाव कुठे आहे? आम्ही येथे आपला नैसर्गिक खेळ खेळायला आलो आहोत. मी सर्व खेळाडूंना परिस्थितीचं भान ठेवून आणि प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाचा आदर करण्यास सांगितले आहे. तसेच निर्भयपणे अर्थात बिंधास्त खेळण्याचा सल्ला दिला आहे”.

शास्त्री पहिल्या कसोटीबद्दल काय म्हणाले?

कसोटी मालिकेला 17 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. हा पहिली कसोटी सामना ऐतिहासिक असणार आहे. हा सामना अॅडिलेडमध्ये खेळला जाणार आहे. पिंक अर्थात गुलाबी चेंडूनी हा सामना खेळण्यात येणार आहे. “आमच्या खेळाडूंना डोमेस्टिक क्रिकेटमध्ये गुलाबी चेंडूने खेळण्याचा फारसा अनुभव नाही. मात्र खेळाडूंनी मैदानात जाऊन गुलाबी चेंडू खेळावं आणि आनंद घ्यावा, अशी माझी इच्छा आहे”, असं शास्त्री म्हणाले.

मालिकानिहाय वेळापत्रक

एकदिवसीय (वनडे) मालिका

पहिली वनडे – 27 नोव्हेंबर – सिडनी दुसरी वनडे – 29 नोव्हेंबर – सिडनी तिसरी वनडे – 1 डिसेंबर – मानुका ओव्हल

टी-20 मालिका

पहिली T20 – 4 डिसेंबर – मानुका ओव्हल दुसरी T20 – 6 डिसेंबर – सिडनी तिसरी T20 – 8 डिसेंबर – सिडनी

कसोटी (टेस्ट) मालिका

पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – अॅडलेड दुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा अॅडलेड तिसरी टेस्ट – 7 ते 11 जानेवारी – सिडनी चौथी टेस्ट – 15 ते 19 जानेवारी – ब्रिस्बेन

संबंधित बातम्या :

West Indies tour New Zealand | न्यूझीलंडला मोठा धक्का, ‘हा’ स्टार खेळाडू दुखापतीमुळे कसोटी मालिकेला मुकणार

India vs Australia 2020 | रोहित-इशांतला संघात घेण्यासाठी बीसीसीआयने कंबर कसली, क्वारंटाईन नियमात सवलतीचे प्रयत्न

india vs australia 2020 team india fabulous 5 players to beat australia in test series at home believes head coach ravi shastri

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.