India vs Australia 2020 | ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाने मोठ्या फरकाने जिंकलेले 3 एकदिवसीय सामने

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेला 27 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे.

India vs Australia 2020 | ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाने मोठ्या फरकाने जिंकलेले 3 एकदिवसीय सामने
Follow us
| Updated on: Nov 22, 2020 | 10:39 PM

सिडनी : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाने (India Tour Australia 2020) कंबर कसली आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय, टी 20 आणि कसोटी मालिका खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात एकदिवसीय मालिकेपासून सुरुवात होणार आहे. 27 नोव्हेंबरपासून वनडे सीरिजला सुरुवात होत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकूण 3 वनडे सामन्यांची मालिका असणार आहे. टीम इंडियाने मागील दौऱ्यात ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय आणि कसोटी मालिकेत पराभव केला होता. मात्र यावेळेस ऑस्ट्रेलिया संघात डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथचं पुनरागमन झालं आहे. त्यामुळे या वेळेस भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियात कडवी झुंज पाहायला मिळू शकते. दरम्यान टीम इंडियाने अनेकवेळा एकदिवसीय सामन्यात कांगारुंचा पराभव केला आहे. यापैकी टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोठ्या फरकानेही काही सामने जिंकले आहेत. यापैकी काही निवडक सामन्यांमध्ये टीम इंडियाने केलेली कामगिरी आपण पाहणार आहोत. india vs australia 2020 team india won 3 odi by a big margin against australia

इंदूर- 2001

ऑस्ट्रेलियाचा संघ 2001 मध्ये भारत दौऱ्यावर आला होता. या दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या सामन्यातील टॉस ऑस्ट्रेलियाने जिंकला. टीम इंडियाकडून राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकरने सलामी केली. द्रविड स्वस्तात बाद झाला. मात्र यानंतर सचिन आणि व्ही व्ही एस लक्ष्मनने टीम इंडियाचा डाव सावरला. सचिनने 139 धावांची धमाकेदार खेळी केली. तर लक्ष्मनने 83 धावा केल्या. या जोरावर टीम इंडियाने 50 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 299 धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 300 धावांचे आव्हान मिळाले.

विजयी आव्हानाचं पाठलाग करायला आलेल्या ऑस्ट्रेलियाकडून एडम गिलख्रिस्टने सर्वाधिक 63 धावांची खेळी केली. मात्र उर्वरित एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा डाव 181 धावांवर 35.5 ओव्हरमध्येच गुंडाळला. यामुळे भारताने कांगारुंवर 118 धावांच्या फरकाने मोठा विजय मिळवला.

पर्थ-1991

8 डिसेंबर, 1991 ला बेन्सन एंड हेजेज वर्ल्ड सीरिजमधील दुसरा एकदिवसीय सामना खेळण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. टीम इंडियाने निर्धारित 50 षटकांमध्ये 7 विकेट्स गमावून 208 धावा केल्या. विजयी आव्हानाचं पाठलाग करायला आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या फलंजदाजांना रवी शास्त्रीच्या गोलंदाजीसमोर मैदानात टिकता आले नाही. ऑस्ट्रेलियाला सर्वबाद 101 धावाच करता आल्या. त्यामुळे टीम इंडियाचा 107 धावांनी विजय झाला होता.

वर्ल्ड कप 1983

1983 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. टीम इंडियाकडून कोणत्याच फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. मात्र सर्व फलंदाजांनी छोटेखानी पण महत्वाची आणि उपयुक्त खेळी केली. टीम इंडियाकडून यशपाल शर्माने सर्वाधिक 40 धावांची खेळी केली. टीम इंडियाने सर्वबाद 247 धावा केल्या. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला 248 धावांचे विजयी आव्हान दिले. मदन लाल आणि रॉजर बिन्नीच्या भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाचा डाव 38.2 ओव्हरमध्ये 129 धावांवरच आटोपला. या सामन्यात टीम इंडियाचा 118 धावांनी विजय झाला होता.

ऑस्ट्रेलिया भारतावर वरचढ

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत एकूण 145 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलिया टीम इंडियावर वरचढ राहिली आहे. ऑस्ट्रेलियाने 145 पैकी 78 सामन्यात भारताचा पराभव केला आहे. तर टीम इंडियानेही 52 मॅचेसमध्ये कांगारुंवर मात केली आहे. 10 सामन्यांचा निकाल लागू शकला नाही. तर 5 मॅचेस रद्द केल्या गेल्या आहेत.

ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक

एकदिवसीय (वनडे) मालिका

पहिली वनडे – 27 नोव्हेंबर – सिडनी दुसरी वनडे – 29 नोव्हेंबर – सिडनी तिसरी वनडे – 1 डिसेंबर – मानुका ओव्हल

टी-20 मालिका

पहिली T20 – 4 डिसेंबर – मानुका ओव्हल दुसरी T20 – 6 डिसेंबर – सिडनी तिसरी T20 – 8 डिसेंबर – सिडनी

कसोटी (टेस्ट) मालिका

पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – अॅडलेड दुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा अॅडलेड तिसरी टेस्ट – 7 ते 11 जानेवारी – सिडनी चौथी टेस्ट – 15 ते 19 जानेवारी – ब्रिस्बेन

संबंधित बातम्या :

IND vs AUS : कांगारुंविरुद्ध खेळण्यासाठी हिटमॅन सज्ज, टीम मॅनेजमेंटसह चाहते सुखावले

रोहित शर्माला कर्णधारपद न दिल्यास टीम इंडियाचं नुकसान, कोहलीवरील टीकेनंतर गंभीरचा नवा पर्याय

india vs australia 2020 team india won 3 odi by a big margin against australia

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.