Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs Australia 2020 | भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वन डे आणि T20 ची तिकीटं पहिल्याच दिवशी फुल

टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात एकदिवसीय मालिकेपासून होणार आहे.

India vs Australia 2020 | भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वन डे आणि T20 ची तिकीटं पहिल्याच दिवशी फुल
Follow us
| Updated on: Nov 21, 2020 | 4:17 PM

सिडनी : टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यसाठी (India Tour Australia) सज्ज झाली आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर एकदिवसीय, टी 20 आणि कसोटी मालिका खेळणार आहे. एकदिवसीय मालिकेला 27 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. एकदिवसीय मालिकेला सुरुवात होण्यासाठी अजूनही 5 दिवस शिल्लक आहेत. याआधीच पहिल्या 2 एकदिवसीय आणि 3 सामन्यांच्या टी 20 मालिकांचे तिकीटं संपली आहेत. क्रिकेट चाहत्यांनी तिकीट विक्रीच्या पहिल्याच दिवशी तिकीटं काढून ठेवली आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (Cricket Australia) याबाबतीत माहिती दिली आहे. india vs australia 2020 tickets for the odi and t20 series between Team india and australia were sold out on the first day

शुक्रवारी 20 नोव्हेंबरला सकाळीच या सामन्यांची तिकीटं संपली आहेत. याबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने प्रसिद्धीपत्रक जाहीर केलं आहे. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर दुसरा तर मानुका ओव्हल ग्राऊंडवर तिसरा एकदिवसीय सामना खेळण्यात येणार आहे. या सामन्याचे तिकीट संपले आहेत. तसेच मानुका ओव्हलमध्ये पहिली तर उर्वरित 2 टी 20 सामने हे सिडनीमध्ये खेळले जाणार आहेत. या 3 टी 20 सामन्यांच्या मालिकेचेही तिकीट विक्री झाली आहे, अशी माहिती ऑस्ट्रेलिया क्रिकेटने प्रसिद्धीपत्रकात दिली आहे.

कोरोना पार्श्वभूमीवर 50 टक्के प्रेक्षकांनाच परवानगी

जगभरात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर क्रिकेट स्पर्धा रद्द करण्यात आल्या. कोरोना नियंत्रणात आल्यानंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर प्रेक्षकांना स्टेडियममध्ये उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. सिडनी आणि मानुका ओव्हल या दोन्ही स्टेडियममध्ये हे सामने खेळण्यात येणार आहेत. या स्टेडियमच्या क्षमतेच्या 50 टक्के प्रेक्षकांना उपस्थित राहता येणार आहे.

“अशा मोठ्या प्रमाणात तिकीट विक्री झाली. यावरुन क्रिकेट चाहत्यांमध्ये स्टेडियममध्ये येऊन सामने पाहण्यासाठी किती उत्सुक आहे, हे दिसून येतं. टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामने हे फार चुरशीचे होणार आहेत. तिकीट विक्रीसाठी फार वेळ लागला नाही. पहिल्या सामन्याचे केवळ काही मोजकेच तिकीट उपलब्ध आहेत”, असं क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या फॅन एंगेजमेंटचे कार्यकारी महाप्रबंधक अँथोनी एवरार्ड (Anthony Everard) म्हणाले.

मालिकानिहाय सामन्यांचं वेळापत्रक

एकदिवसीय (वनडे) मालिका

पहिली वनडे – 27 नोव्हेंबर – सिडनी दुसरी वनडे – 29 नोव्हेंबर – सिडनी तिसरी वनडे – 1 डिसेंबर – मानुका ओव्हल

टी-20 मालिका

पहिली T20 – 4 डिसेंबर – मानुका ओव्हल दुसरी T20 – 6 डिसेंबर – सिडनी तिसरी T20 – 8 डिसेंबर – सिडनी

कसोटी (टेस्ट) मालिका

पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – अॅडलेड दुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा अॅडलेड तिसरी टेस्ट – 7 ते 11 जानेवारी – सिडनी चौथी टेस्ट – 15 ते 19 जानेवारी – ब्रिस्बेन

संबंधित बातम्या :

India Tour Australia | विराट कोहलीमुळे अ‌ॅडलेड कसोटीसाठी तिकीटांची मागणी वाढली

भारतीय संघाच्या ‘या’ सामन्यांदरम्यान स्टेडियममध्ये प्रेक्षकांना प्रवेश मिळणार?

india vs australia 2020 tickets for the odi and t20 series between Team india and australia were sold out on the first day

जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.
दिशा सालियान प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात होणार
दिशा सालियान प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात होणार.
त्यांनी जेवायला बोलवलंय, अजितदादांची भेट घेणार... सुरेश धस काय म्हणाले
त्यांनी जेवायला बोलवलंय, अजितदादांची भेट घेणार... सुरेश धस काय म्हणाले.