Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs Australia 2020, 3rd Odi | टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद शमीला आगरकरचा 18 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 303 धावांचे आव्हान दिले आहे.

India vs Australia 2020, 3rd Odi | टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद शमीला आगरकरचा 18 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी
Follow us
| Updated on: Dec 03, 2020 | 12:36 PM

कॅनबेरा : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia 2020) यांच्यात कॅनबेरा येथील मानुका ओव्हल येथे तिसरा एकदिवसीय सामना (India vs Australia 2020, 3rd Odi) खेळण्यात येत आहे. टीम इंडियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 303 धावांचे आव्हान दिले आहे. भारताने प्रथम फलंदाजी करत हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा आणि विराट कोहलीच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर निर्धारित 50 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 302 धावा केल्या. टीम इंडियासाठी हा तिसरा सामना प्रतिष्ठेचा झाला आहे. त्यामुळे फलंदाजांनंतर आता गोंलदाजांची कमाल करण्याची वेळ आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला (Mohammed Shami) विक्रम करण्याची संधी आहे. शमीला टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरचा (Ajit Agarkar) 18 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडित काढण्याची संधी आहे. india vs australia 3rd odi faster bowler mohammad shami has a chance to take fastest 150 wickets in odi

काय आहे विक्रम?

शमीने ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात 3 विकेट्स घेतल्या. मात्र शमी दुसऱ्या सामन्यात अपयशी ठरला. मात्र या तिसऱ्या सामन्यात शमीला विक्रमी कामगिरी करण्याची संधी आहे. शमीला टीम इंडियाकडून एकदिवसीय सामन्यात वेगवान 150 विकेट्स (Fastest Wickets in Odi) घेण्याची संधी आहे. 150 विकेटपासून शमी अवघ्या 2 विकेट्स दूर आहे. शमीने 79 वन डे सामन्यात 148 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे या सामन्यात 3 विकेट्स घेतल्यास शमी एकदिवसीय सामन्यात वेगवान 150 विकेट्स घेणारा गोलंदाज ठरेल.

टीम इंडियाकडून वेगवान 150 विकेट्स घेण्याची कामगिरी माजी गोलंदाज अजित आगरकरने केली होती. आगरकरने एकूण 97 सामन्यांमध्ये 150 विकेट्स घेतल्या होत्या. आगरकरने तब्बल 18 वर्षांपूर्वी ही कामगिरी केली होती. त्यामुळे आता शमी वेगवान 150 विकेट्स पूर्ण करतो का, याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असणार आहे.

संबंधित बातम्या :

India vs Australia, 3rd Odi | ‘यॉर्कर किंग’ थंगारसू नटराजनचं एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण

India vs Australia 2020, 3rd ODI | वेगवान विराट, विश्वविक्रमाला गवसणी, सचिनचा विक्रम मोडित

India vs Australia 2020, 3rd ODI Updates | कर्णधार विराट कोहलीचे झुंजार अर्धशतक

india vs australia 3rd odi faster bowler mohammad shami has a chance to take fastest 150 wickets in odi

राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण...
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा.
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?.
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?.
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?.
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन.
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा.
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल.
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले.