तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ, राहुल- विजय बाहेर, सलामीला फ्रेश जोडी

मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या बॉक्सिंग डे कसोटीसाठी भारताच्या प्लेईंग इलेव्हन अर्थात अंतिम 11 खेळाडूंची घोषणा झाली आहे. बीसीसीआयने परंपरेनुसार सामन्याच्या आदल्या दिवशी संघ जाहीर केला. त्यानुसार सातत्याने भारताला अपयशी सुरुवात करुन देणारे सलामीवीर के एल राहुल आणि मुरली विजय यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे, तर मध्यमगती गोलंदाज उमेश यादवही संघातून बाहेर पडला […]

तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ, राहुल- विजय बाहेर, सलामीला फ्रेश जोडी
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:47 PM

मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या बॉक्सिंग डे कसोटीसाठी भारताच्या प्लेईंग इलेव्हन अर्थात अंतिम 11 खेळाडूंची घोषणा झाली आहे. बीसीसीआयने परंपरेनुसार सामन्याच्या आदल्या दिवशी संघ जाहीर केला. त्यानुसार सातत्याने भारताला अपयशी सुरुवात करुन देणारे सलामीवीर के एल राहुल आणि मुरली विजय यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे, तर मध्यमगती गोलंदाज उमेश यादवही संघातून बाहेर पडला आहे. त्यांच्याऐवजी टीम इंडियात मयांक अग्रवाल, रोहित शर्मा आणि रवींद्र जाडेजाचा समावेश करण्यात आला आहे.

त्यामुळे तिसऱ्या कसोटीत टीम इंडिया नव्या सलामीवीरांसह मैदानात उतरेल. भारताकडून मयांक अग्रवाल आणि रोहित शर्मा किंवा मयांक अग्रवाल आणि रोहित शर्मा किंवा रोहित शर्मा आणि हनुमा विहारी यापैकी एक जोडी सलामीला उतरु शकते. बीसीसीआयने अंतिम 11 खेळाडूंची नावं ट्विटरवरुन जाहीर केली.

दरम्यान, पहिल्या कसोटीत दमदार कामगिरी करणारा आर अश्विन अद्याप दुखापतीतून सावरलेला नाही. अश्विनच्या पोटाच्या डाव्या बाजूच्या मांसपेशी ताणल्या गेल्याने, अश्विन दुसऱ्या पर्थ कसोटीत खेळू शकला नव्हता.

राहुल-मुरली विजय अपयशी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन्ही कसोटीमध्ये भारताचे सलामीवीर सपशेल अपयशी ठरले. के एल राहुल आणि मुरली विजय या दोघांनाही चांगली सलामी देता आली नाही. त्याचा परिणाम भारतीय फलंदाजी कोसळत गेली. पहिला कसोटी सामना भारताने जिंकला, मात्र दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. पर्थ कसोटीत लोकेश राहुल आणि मुरली या दोघांनी पहिल्या डावात 6 धावांची तर दुसऱ्या डावात 0 धावांची भागीदारी केली. पहिल्या डावात राहुलने 2 धावा केल्या होत्या, तर मुरली विजय शून्यावर बाद झाला होता. दुसऱ्या डावात राहुल शून्यावर तर मुरली विजयला 20 धावा करता आल्या होत्या.

तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ – मयंक अग्रवाल, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह

ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं वेळापत्रक

कसोटी मालिका पहिला सामना – 6 डिसेंबर दुसरा सामना – 14 डिसेंबर तिसरा सामना – 26 डिसेंबर चौथा सामना – 3 जानेवारी

वन डे मालिका पहिला सामना – 12 जानेवारी दुसरा सामना – 15 जानेवारी तिसरा सामना – 18 जानेवारी

संबंधित बातम्या 

के एल राहुल, मुरली विजय विलन, भारताच्या पराभवाची 5 कारणं!  

“मुरली, मला माहितीये एक माणूस म्हणून विराट तुला आवडत नाही”  

इशांत शर्मा आणि रवींद्र जाडेजा मैदानातच भिडले!

आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.