Video : “एक पाय चंदीगड, तर एक पाय हरयाणात…”, तिसऱ्या कसोटीत मैदानात श्रेय्यस अय्यरने कोणाला डिवचलं?

भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धचा तिसरा कसोटी सामना गमावला आहे. या सामन्यातील काही व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Video : एक पाय चंदीगड, तर एक पाय हरयाणात..., तिसऱ्या कसोटीत मैदानात श्रेय्यस अय्यरने कोणाला डिवचलं?
तिसऱ्या कसोटीत श्रेयस अय्यरने असं काय केलं की बॅट्समन संतापला, काय झालं नेमकं पाहा VideoImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Mar 04, 2023 | 12:36 PM

मुंबई : क्रिकेट म्हंटलं की जिंकण्यासाठी खेळाडू मैदानात काहीही करू शकतात. मग एकमेकांना डिवचून लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न असतो. असाच काहीसा प्रकार इंदुरमधील तिसऱ्या कसोटीत पाहायला मिळाला. भारतानं दुसऱ्या डावातील आघाडी मोडत फक्त 76 धावांचं आव्हान दिलं होतं. त्यामुळे हा सामना ऑस्ट्रेलिया जिंकणार हे स्पष्टच होतं. पण क्रिकेटमध्ये सहजासहजी पराभव स्वीकारला जात नाही. यासाठी खेळाडू आपलं सर्वस्वी पणाला लावतात. तिसऱ्या दिवशीच्या दुसऱ्या चेंडूवर उस्मान ख्वाजाला बाद केल्यानंतर भारताच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. त्यामुळे क्षेत्ररक्षण करणारे खेळाडूही एकही संधी सोडत नव्हते. त्यात श्रेयस अय्यरही मागे नव्हता.

उस्मान ख्वाजा बाद झाल्यानंतर मैदानात ट्रॅविस हेड आणि मार्नस लाबुशेन फलंदाजी करत होते.तिसऱ्या दिवसाच्या सहाव्या षटकात हेड रविंद्र जडेजाची गोलंदाजी खेळत होता. तेव्हा श्रेयस अय्यर शॉर्ट फाइन लेगला क्षेत्ररक्षण करत होता. तेव्हा त्याने हेडला डिवचत म्हणाला, “याचा एक पाय चंदीगड आणि दुसरा हरयाणात आहे.” पण हेडला हिंदी कळत नसल्याने तो त्याच्याकडे पाहून शांतपणे उभा होता.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. तसेच श्रेयस अय्यर काय बोलला हे माइकमध्ये रेकॉर्ड झालं आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने तिसरा कसोटी सामना 9 गडी राखून जिंकला. या सामन्याच्या पहिल्या डावात ट्रॅविस हेडनं 9 धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात ट्रॅविसनं नाबाद 49 धावांची खेळी केली. विजयासह मालिकेत 2-1 अशी स्थिती आहे.

तिसरा कसोटी सामन्यात पराभूत झाल्याने भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत जाण्याचं स्वप्न लांबल आहे. आता भारताला चौथा कसोटी सामना काहीही करून जिंकावाच लागेल. अन्यथा न्यूझीलँड विरुद्ध श्रीलंका मालिकेच्या निकालावर अवलंबून राहावं लागेल. कारण श्रीलंका आणि भारतात दुसऱ्या संघासाठी चुरस आहे.

टीम इंडियाने चौथा सामना गमवल्यास गुणतालिकेत भारताचे गुण 56.94 टक्के इतके राहतील.श्रीलंका विरुद्ध न्यूझीलँड दोन सामन्यांची मालिका आहे. ही मालिका श्रीलंकेन 2-0 ने जिंकली तर भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या स्पर्धेतून बाहेर जाईल. या परिस्थितीत श्रीलंकेचे 61.11 टक्के गुण होतील.

भारताने आतापर्यंत 17 कसोटी सामने खेळला असून 10 मध्ये विजय, 5 मध्ये पराभव आणि 2 सामने ड्रॉ झाले आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीचा सामना 7 जून ते 11 जून दरम्यान होणार आहे. हा सामना इंग्लंडच्या ओव्हल मैदानात होणार आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.