IND vs AUS | आर. अश्विनच्या शिरपेचात मानाचा तुरा, ऑस्ट्रेलियाविरुद्ध सहा विकेट घेत मिळवलं मुकूट

बॉर्डर गावसकर मालिकेतील चौथ्या कसोटीत आर. अश्विनच्या फिरकीची जादू दिसली. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी एकूण सहा गडी बाद केले.

IND vs AUS | आर. अश्विनच्या शिरपेचात मानाचा तुरा, ऑस्ट्रेलियाविरुद्ध सहा विकेट घेत मिळवलं मुकूट
IND vs AUS | आर. अश्विनच्या शिरपेचात मानाचा तुरा, ऑस्ट्रेलियाविरुद्ध सहा विकेट घेत मिळवलं मुकूटImage Credit source: ICC
Follow us
| Updated on: Mar 10, 2023 | 4:49 PM

मुंबई : बॉर्डर गावसकर मालिकेतील चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचं पारडं जड आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने मजबूत पकड असली तरी आर. अश्विनच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला. आर. अश्विनने आयसीसी क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थान पटकावलं आहे. चौथा कसोटी सामना सुरु होण्यापूर्वी जेम्स अँडरसन आणि आर. अश्विन या दोघांचे 859 इतके गुण होते. चौथ्या कसोटीत सहा गडी बाद करत आर. अश्विननं आता जेम्स अँडरसनला मागे टाकलं. तिसऱ्या कसोटीत आर. अश्विनच्या रॅकिंगमध्ये सहा गुणांचं नुकसान झालं होतं. मात्र सहा गडी बाद केल्याने गुणांकनात फरक पडणार आहे. आयसीसीने अद्याप गुणांकनात बदल केला नसला तरी नंबर वन गाठल्याचं निश्चित आहे.

चौथ्या कसोटीत आर. अश्विनने ट्रेव्हिस हेड, स्टीव्ह स्मिथ, कॅमरून ग्रीन, अलेक्स कॅरे, मिशेल स्टार्क, नाथन लायन आणि टोड मर्फीला बाद केलं. दुसरीकडे, आर. अश्विन याने माजी फिरकीपटू गोलंदाज अनिल कुबंळे याचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.  या सामन्याआधी अश्विनला रेकॉर्ड मोडण्यासाठी 5 विकेट्सची गरज होती.

अश्विनने टोड मर्फी याला एलबीडब्ल्यू करत हा रेकॉर्ड ब्रेक मोडला. आर अश्विन याच्या चौथ्या कसोटीआधी नावावर 107 विकेट्सची नोंद होती. आता आर. अश्विनच्या नावावर 112 विकेट्स आहेत. अनिल कुंबळे यांने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 111 विकेट्स घेतल्या होत्या. अश्विन याने भारतात सर्वाधिक 5 विकेट्स घेण्याबाबतही कुंबळेला पछाडलं आहे. अश्विनची भारतात 5 विकेट्स घेण्याची ही 26 वी वेळ ठरली. तर कुंबळेने 25 वेळा हा कारनामा केला होता. आयसीसी कसोटी क्रमवारीत आर. अश्विन पहिल्या स्थानी, जेम्स अँडरसन दुसऱ्या, पॅट कमिन्स तिसऱ्या, कगिसो रबाडा चौथ्या आणि शाहीन अफ्रिदी पाचव्या स्थानावर आहे.

ऑस्ट्रेलियाचा डाव

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद 480 धावा केल्या. उस्मान ख्वाजाने 180 धावा, कॅमरून ग्रीनने 114 धावा केल्या आहेत. या जोडीने 208 धावांची भागीदारी केली. या डावात आर. अश्विनने 6, मोहम्मद शमीने 2, रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेलने प्रत्येकी एक गडी बाद केले.

दोन्ही संघाचे खेळाडू

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद शमी आणि उमेश यादव.

ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन | ट्रेव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ (कर्णधार), पीटर हँड्सकॉम्ब, कॅमरन ग्रीन, एलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नाथन लायन, टॉड मर्फी आणि मॅथ्यू कुन्हेमन.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.