IND vs AUS | जडेजाच्या गोलंदाजीसमोर स्टीव्ह स्मिथच्या बॅटनं केला घोळ, कसं पाठवलं तंबूत पाहा Video

चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत आहे. दुसरीकडे, स्मिथला बाद केल्याने रविंद्र जडेजाची चर्चा रंगली आहे.

IND vs AUS | जडेजाच्या गोलंदाजीसमोर स्टीव्ह स्मिथच्या बॅटनं केला घोळ, कसं पाठवलं तंबूत पाहा Video
Video : जडेजाच्या फिरकीसमोर स्टीव्ह स्मिथचा उडाला त्रिफळा, काय झालं कळलंच नाही मग केलं असं... Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Mar 09, 2023 | 4:32 PM

मुंबई : बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील चौथा आणि अखेरचा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने चांगली सुरुवात केली आहे. त्यामुळे पहिल्या डावात भारतासमोर तगडं आव्हान असणार आहे. पण संघाच्या 61 धावा असताना ट्रॅव्हिस हेडच्या रुपाने पहिला धक्का बसला. त्यानंतर लगेचच लाबुशेन माघारी परतला. दोन गडी झटपट बाद झाल्यानंतर उस्मान ख्वाजा आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथने डाव सावरला. दोघांनी 79 धावांची भागीदारी केली. ही जोडी फोडण्यात फिरकीपटू रविंद्र जडेजाला यश आलं. 38 धावांवर असताना रविंद्र जडेजाने त्याचा त्रिफळा उडवला. स्मिथनं रविंद्र जडेजाचा चेंडू खेळला खरा पण प्लेड ऑन झाला. म्हणजेच चेंडू बॅटला लागून त्रिफळा उडाला.

रविंद्र जडेजाने मालिकेत स्टीव्ह स्मिथला तिसऱ्यांदा बाद केलं आहे. इतकंच काय तर जडेजाने त्याला चार वेळा त्रिफळाचीत केलं आहे. असा कारनामा करणारा जडेजा एकमेव गोलंदाज आहे. त्याचबरोबर कसोटीत नंबर एक पोझिशनवर असलेल्या लाबुशेनला 4 वेळा तंबूचा रस्ता दाखवला आहे.

जडेजाने हा चेंडू 100 किमीच्या वेगाने टाकला होता. पण चेंडू खालीच बसल्याने स्मिथच्या बॅटला लागून स्टम्प उडाले. या डावात त्याने 38 धावा केल्या. मात्र खेळपट्टीवर तग धरून उभा राहिल अशी बॉडी लँग्वेज नव्हती. स्टीव्ह स्मिथने 6 डावात एकही अर्धशतक न झळकाल्याचं पहिल्यांदाच घडलं आहे. मालिकेत स्मिथचा 38 हा सर्वोत्तम स्कोअर आहे.

स्मिथने 6 डावात एकूण 135 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 27 इतकी आहे. अहमदाबादच्या पिचवर चेंडू जराही वळत नसल्याचं समोर आलं आहे. मात्र असं असूनही स्मिथला खेळताना अडचण येत होती. यामुळे स्मिथचा कसोटीतील सरासरी 60 पेक्षा कमी झाली आहे. अहमदाबादमध्ये आउट होतात कसोटी सरासरी 59.74 इतकी झाली आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने यापूर्वीच धडक मारली आहे. मात्र दुसऱ्या संघासाठी भारत आणि श्रीलंका यांच्यात चुरस आहे. भारताने शेवटचा सामना जिंकल्यास थेट अंतिम फेरीत स्थान मिळणार आहे. पण गमवल्यास सर्व गणित जर तर वर अवलंबून असणार आहे.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद शमी आणि उमेश यादव.

ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन | ट्रेव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ (कर्णधार), पीटर हँड्सकॉम्ब, कॅमरन ग्रीन, एलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नाथन लायन, टॉड मर्फी आणि मॅथ्यू कुन्हेमन.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.