AusVsInd : रोहितची झुंजार खेळी व्यर्थ, भारताचा पराभव

सिडनी: टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्माच्या खणखणीत शतकानंतरही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात भारताचा पराभव झाला. ऑस्ट्रेलियाने भारताचा 34 धावांनी पराभव करत, तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने दिलेलं 289 धावांचं आव्हान भारताला पेललं नाही. भारताला 50 षटकात 9 बाद 254 धावा करता आल्या. भारताची अवस्था 3 बाद 4 अशी असताना रोहितने धोनीच्या […]

AusVsInd : रोहितची झुंजार खेळी व्यर्थ, भारताचा पराभव
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM

सिडनी: टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्माच्या खणखणीत शतकानंतरही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात भारताचा पराभव झाला. ऑस्ट्रेलियाने भारताचा 34 धावांनी पराभव करत, तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने दिलेलं 289 धावांचं आव्हान भारताला पेललं नाही. भारताला 50 षटकात 9 बाद 254 धावा करता आल्या. भारताची अवस्था 3 बाद 4 अशी असताना रोहितने धोनीच्या साथीने किल्ला लढवला. हिटमॅन रोहित शर्माने 129 चेंडूत 10 चौकार आणि 6 षटकारांसह स्फोटक 133 धावा केल्या. मात्र त्याच्या या झुंजार खेळीला विजयाचा टिळा लागला नाही. धोनीने  96 चेंडूत 51 धावा करुन रोहितला उत्तम साथ दिली. रोहित शर्मा आणि धोनीने चौथ्या विकेटसाठी 137 धावांची भागीदारी केली.  मात्र त्यांची ही खेळी भारताला विजयापर्यंत पोहोचवू शकली नाही.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने 50 षटकात 5 बाद 288 धावा केल्या होत्या.

ऑस्ट्रेलियाच्या 289 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या टीम इंडियाला सुरुवातीलाच धक्के बसले. टीम इंडियाची सुरुवात अतिशय वाईट झाली. भारताचा सलामीवीर शिखर धवन 0, विराट कोहली 3 आणि अंबाती रायुडू 0 धावावर माघारी परतले. त्यामुळे भारताची अवस्था 4 बाद 3 अशी झाली. त्यानंतर रोहित शर्मा आणि महेंद्रसिंह धोनीने भारताला सावरलं. दोघांनीही अर्धशतक झळकावत जवळपास दीडशतकी भागीदारी रचली. रोहितने 62 धावांत अर्धशतक पूर्ण केलं, तर धोनीने 93 चेंडूत 50 धावा केल्या. त्यानंतर धोनी लगेचच माघारी परतला. धोनीला बेहरेनड्रॉपने पायचित केलं. धोनीने 96 चेंडूत 51 धावा केल्या. धोनी-रोहितने चौथ्या विकेटसाठी 137 धावांची भागीदारी केली.

यानंतर आलेल्या दिनेश कार्तिकने रोहित शर्माला साथ देण्याचा प्रयत्न केला, मात्र तो 21 चेंडूत 12 धावा करुन माघारी परतला. त्यानंतर रोहितने आपलं शतक पूर्ण करुन घेतलं. रोहितने 110 चेंडूत 7 चौकार आणि 4 षटकारांसह 100 धावा ठोकल्या. त्याचं हे कारकिर्दीतील 22 वं शतक ठरलं.

रोहितने शतक पूर्ण केल्यानंतर त्याने जाडेजाच्या साथीने फटकेबाजी सुरु केली, मात्र जाडेजाही (8) माघारी परतल्याने त्याला कोणाची साथ लाभली नाही. मग हाणामारीच्या नादात रोहितला स्टोईनीसने 133 धावांवर बाद केलं. त्यामुळे भारताच्या उरल्या सुरल्या आशा संपल्या.

रोहित बाद झाल्यावर भुवनेश्वर कुमारने फटकेबाजी करुन 23 चेंडूत नाबाद 29 धावा केल्या. कुलदीप यादव 3 तर  मोहम्मद शमी 1 धाव करुन माघारी परतला.

ऑस्ट्रेलियाकडून रिचर्डसनने सर्वाधिक 4 बेहरेनड्रॉफ आणि स्टोईनीसने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

त्याआधी शेवटच्या षटकांमध्ये मार्कस स्टेनॉईसने केलेली फटकेबाजी आणि तीन फलंदाजांच्या अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने सिडनीतील पहिल्या वन डे सामन्यात भारतासमोर 289 धावांचं लक्ष्य ठेवलं . ऑस्ट्रेलियाने 50 षटकात 5 बाद 288 धावा केल्या. मार्कस स्टेनॉईसने 43 चेंडूत नाबाद 47 धावा केल्या. तर त्याआधी उस्मान ख्वाजा 59, शॉन मार्श 54 आणि पीटर हॅण्डस्कोम्बने 73 धावा ठोकल्याने, ऑस्ट्रेलियाला 50 षटकात 288 धावांपर्यंत मजल मारता आली.

भारताकडून भुवनेश्वर कुमार आणि कुलदीप यादवला प्रत्येकी 2 विकेट मिळाल्या, तर रवींद्र जाडेजाने एक बळी टिपला.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या सिडनी वन डेमध्ये ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भुवनेश्वर कुमारने कर्णधार अरॉन फिंचला अवघ्या 6 धावांवर माघारी धाडून ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. त्यानंतर कुलदीप यादवने अॅलेक्स कॅरेला कुलदीप यादवने रोहित शर्माकरवी झेलबाद केलं. कॅरेने 24 धावा केल्या. कॅरे बाद झाला त्यावेळी ऑस्ट्रेलियाची अवस्था 2 बाद 41 अशी होती.

यानंतर उस्मान ख्वाजा आणि शॉन मार्श यांनी संयमी खेळी केली. दोघांनीही भारताच्या फिरकी आणि मध्यमगती गोलंदाजांचा सावधपणे सामना केला. त्यानंतर दोघांनीही अर्धशतकं झळकावली. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली. अर्धशतकानंतर उस्मान ख्वाजा फटकेबाजी करत होता. त्याला रवींद्र जाडेजाने पायचित करुन माघारी धाडलं. ख्वाजाने 81 चेंडूत 59 धावा केल्या.

त्यानंतर मार्शच्या साथीला आलेल्या हॅण्डस्कोम्बनेही तडाखेबाज खेळी केली. हॅण्डस्कोम्ब फटकेबाजी करत असताना दुसऱ्या बाजूच्या शॉन मार्शला कुलदीप यादवने 54 धावांवर माघारी धाडलं. मग हॅण्डस्कोम्बने 50 चेंडूत 50 धावा ठोकून अर्धशतक झळकावलं. तो वेगाने शतकाकडे वाटचाल करत असताना, भुवनेश्वरने त्याचा काटा काढला. हॅण्डस्कोम्बने 61 चेंडूत  6 चौकार आणि 2 षटकारांसह 71 धावा केल्या.

यानंतर मग स्टेनॉईसने खेळाची सूत्रं हाती घेतली. त्याने अंतिम षटकांमध्ये धुवाँधार फलंदाजी केली.  स्टेनॉईसने 43 चेंडूत नाबाद 47 धावा केल्या, तर ग्लेन मॅक्सवेल 5 चेंडूत 11 धावा करुन नाबाद राहिला.

दरम्यान आजच्या सामन्यात भारताने रवींद्र जाडेजाची टीम इंडियात समावेश केला. त्याच्या जोडीला कुलदीप यादव फिरकीची धुरा सांभाळत आहे. तर जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाजीची धुरा भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी आणि खलील अहमदच्या खांद्यावर आहे. दुसरीकडे सलामीचा फलंदाज शिखर धवन टीम इंडियात परतला आहे. कसोटी मालिकेतून त्याला वगळण्यात आलं होतं.

 टीम इंडिया भारी

दरम्यान, भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिकेत 2-1 असा ऐतिहासिक विजय मिळवला. त्यामुळे वन डे मालिकेसाठीही टीम इंडियाचा आत्मविश्वास उंचावला आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात 72 वर्षांनी कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम गाजवला. त्यामुळे भारतीय संघ वन डे मालिकाही खिशात घालण्याच्या इराद्याने मैदानात उतरली आहे.

के एल राहुल, हार्दिक पंड्याला झटका

दिग्दर्शक करण जोहरच्या कॉफी विथ करण या शो मध्ये महिलांबाबतचं वादग्रस्त वक्तव्य अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि केएल राहुलला चांगलचं भोवलं. या दोन्ही खेळाडूंवर कारवाई करत बीसीसीआयने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वन डेमध्ये टीममधून त्यांना बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. इतकंच नाही तर या दोन्ही खेळाडूंवर कडक कारवाईही केली जाऊ शकते. या दोघांसाठी 15 दिवसांची चौकशी समिती नेमली जाऊ शकते. पंड्या आणि केएल राहुल यांना ऑस्ट्रेलियातून भारतात पाठवलं जाऊ शकतं.

संबंधित बातम्या

निर्लज्जपणाचं वक्तव्य भोवलं, हार्दिक पंड्या-केएल राहुल आऊट 

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.