मुंबई- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला कसोटी सामना नागपूरमध्ये सुरु आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय चुकीचा ठरला असंच म्हणावं लागेल. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ पहिल्याच दिवशी 177 धावांवर सर्वबाद झाला. पहिल्या डावात रविंद्र जडेजाने 5, आर. अश्विननं 3, मोहम्मद सिराज आमि मोहम्मद शमीनं प्रत्येकी एक गडी बाद केला. आर. अश्विननं तीन गडी बाद करत कसोटीत आपल्या नावावर एक विक्रम प्रस्थापित केला आहे. रविचंद्रन अश्विननं कसोटी इतिहासात 450 विकेट घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे. असं विक्रम करत अश्विननं अनिल कुंबलेचा विक्रम मोडीत काढला. अश्विननं आपल्या कसोटी करिअरमधील 89 व्या सामन्यात 450 वा गडी टीपला. तर कुंबलेने 93 व्या कसोटीत 450 वा गडी बाद केला होता.
आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवान 450 गडी बाद करण्याऱ्या खेळाडूंच्या यादीत आर. अश्विन दुसऱ्या स्थानी आहे. तर श्रीलंकेचा फिरकीपटू मुथैय्या मुरलीधरन या यादीत अव्वल स्थानी आहे. मुरलीधरनने 80 व्या कसोटी सामन्यात या आकडा गाठला होता. दुसरीकडे, कसोटीत भारताकडून 450 विकेट्स घेणारा आर. अश्विन हा दुसरा भारतीय गोलंदाज आहे. तर अनिल कुंबलेने कसोटीत एकूण 619 गडी बाद केले आहेत.
कसोटीत सर्वाधिक गडी बाद करणारे गोलंदाज
Milestone Alert
Test wickets & going strongCongratulations to @ashwinravi99 as he becomes only the second #TeamIndia cricketer after Anil Kumble to scalp or more Test wickets
Follow the match https://t.co/SwTGoyHfZx #INDvAUS pic.twitter.com/vwXa5Mil9W
— BCCI (@BCCI) February 9, 2023
रवींद्र जडेजाचा पंच
टीम इंडियाचा ऑलराउंडर रवींद्र जडेजा याने शानदार एन्ट्री केली आहे. जडेजाने बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील पहिल्याच कसोटी सामन्यात कांगारुंना जेरीस आणलं. जडेजा पहिल्या डावात 5 विकेट्स घेत अर्धी टीम माघारी पाठवली. तसेच जडेजाने मोठा रेकॉर्ड ब्रेक केला. जडेजाच्या या फिरकीच्या जादूवर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव हा 63.5 ओव्हरमध्ये 177 धावांवर आटोपला. जडेजाने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांच्या नाकी नऊ आणले. जडेजाने आपल्या एकूण 22 ओव्हरमध्ये 47 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स घेतल्या. जडेजाने या 22 पैकी 8 ओव्हर मेडन टाकल्या.
टीम इंडिया प्लेइंग 11 : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, एस भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जाडेजा, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग 11 : पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकॉम्ब, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), टॉड मर्फी, नाथन लायन आणि स्कॉट बोलँड.