Ind Vs Aus : रहाणेची ‘विराट’ कामगिरी, दिग्गज खेळाडू रिकी पॉटिंगचं मोठं वक्तव्य

रहाणेच्या कामगिरीने विराटच्या कर्णधारपदाला धोका नसल्याचं ऑस्ट्रेलियाचा महान खेळाडू रिकी पाँटिंगने म्हटलं आहे.

Ind Vs Aus : रहाणेची 'विराट' कामगिरी, दिग्गज खेळाडू रिकी पॉटिंगचं मोठं वक्तव्य
Follow us
| Updated on: Dec 28, 2020 | 8:18 AM

मेलबर्नऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया (Australia vs India 2nd Test) यांच्यात मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (MCG) दुसरा कसोटी सामना खेळण्यात येतोय. नियमित कर्णधार विराट कोहलीच्या (Virat kohli) अनुपस्थितीत मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) या कसोटी सामन्यात ‘विराट’ कामगिरी केलीय. रहाणेने या दुसऱ्या कसोटीत आपल्या नेतृत्वाची चूणुक दाखवली तसंच पहिल्या डावांत झुंजार शतक ठोकलं. त्याच्या या कामगिरीने विराटच्या कर्णधारपदाविषयी चर्चा सुरु झाल्या आहेत. परंतु रहाणेच्या कामगिरीने विराटच्या कर्णधारपदाला धोका नसल्याचं ऑस्ट्रेलियाचा महान खेळाडू रिकी पाँटिंगने (Ricky Ponting) म्हटलं आहे. (India vs Australia Ricky Ponting on Ajinkya Rahane And Virat kohli)

अजिंक्य रहाणेने भारतीय बोलर्सचा अगदी योग्य पद्धतीने वापर करुन ऑस्ट्रेलियाला प्लॅन करुन ऑलआऊट केलं. त्यानंतर भारतीय बॅट्समन ढेपाळत असताना अगदी मोक्याच्या क्षणी हनुमा विहारी, रिषभ पंत आणि नंतर रविंद्र जाडेजाला साथीला घेऊन भारतीय डावाला आकार दिला. केवळ आकारच दिला नाही तर मेलबर्नमध्ये दणदणीत शतक ठोकून भारताला पहिल्या डावांत निर्णायक 131 रन्सची आघाडी मिळवून दिली. त्याच्या या कामगिरीने जगभरातील दिग्गज खेळाडू त्याचं कौतुक करत आहेत. ऑस्ट्रेलियाचा महान खेळाडू रिकी पाँटिंगनेही त्याचं कौतुक केलंय. पण त्याच्या खेळीने आणि कॅप्टन्सी चातुर्याने विराटच्या कर्णधापदाला धोका नसल्याचं रिकी पॉटिंग म्हणाला.

“अ‌ॅडलेड टेस्टमध्ये ऐतिहासिक पराभव झाल्यानंतर भारतीय खेळाडूंचं मनोबल खचलं होतं. मात्र अजिंक्य रहाणेने विराटच्या अनुपस्थितीत दुसऱ्या कसोटीत भारतीय खेळाडूंचं मनोबल तर वाढवलंच परंतु त्यांच्याकडून सर्वोत्तम खेळ करुन घेतला. मनाने तुटलेल्या भारतीय खेळाडूंची त्याने उमेद जागवून त्यांना विजयाचं स्वप्न दाखवलं.  4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाचं आव्हान जिवंत ठेवण्यात रहाणेने महत्त्वाची भूमिका निभावली.परंतु हे सगळं जरी खरं असलं तरी विराटच्या कर्णधारपदाला अजिंक्यकडून कसलाही धोका नाही”, असं विश्लेषण रिकी पाँटिंगने केलं आहे.

“त्याला वाटेल तोपर्यंत विराट भारताचं नेतृत्व करेल. ज्यावेळी त्याच्या खेळावर कर्णधारपदाचा फरक पडेल आणि तो विचार करेल की आपण कर्णधारपद सोडून आपल्या खेळावर लक्ष केंद्र करावं, तेव्हा तो कर्णधारपद सोडू शकतो. मात्र ही गोष्ट जागतिक क्रिकेटसाठी धक्क्याची आणि आश्चर्याची गोष्ट असेल”, असं पॉटिंग म्हणाला. (India vs Australia Ricky Ponting on Ajinkya Rahane And Virat kohli)

संबंधित बातम्या

AUS vs IND, 2nd Test 3rd Day Live : रहाणे-जाडेजाची झुंजार खेळी, 131 रन्सची निर्णायक आघाडी

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.