भारताचा ऑस्ट्रेलियावर ‘विराट’ विजय, कोहलीचं खास ट्विट
नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत मराठामोळ्या अजिंक्यच्या नेतृत्वात भारताने ऑस्ट्रेलियाने मेलबर्नमध्ये नमवलं आहे.
मेलबर्न : पहिल्या कसोटीतील ऐतिहासिक पराभवानंतर दुसऱ्या कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाला (India vs Australia) 8 विकेट्सने लोळवलं. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (MCG) पार पडलेल्या या कसोटी मॅचमध्ये चारही दिवस भारताने गाजवले. चार दिवसातल्या एकाही सत्रात भारताने ऑस्ट्रेलियाला उजवी कामगिरी करु दिली नाही. विशेष म्हणजे नियमित कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) अनुपस्थितीत मराठामोळ्या अजिंक्यच्या (Ajinkya Rahane) नेतृत्वात भारताने ऑस्ट्रेलियाने नमवलं आहे. साहजिकच अजिंक्य रहाणेवर दिग्गज खेळाडू कौतुकाचा वर्षाव करत आहेत. विराट कोहलीनेही भारतीय संघाचं अभिनंदन करत अजिंक्यचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. (India Vs Australia Virat Kohli Tweet After India Won Melbourne Test)
ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला जिंकण्यासाठी अवघं 70 धावांचं लक्ष दिलं होतं. भारताने हे आव्हान 2 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण करुन ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट्सने पराभव केला. यानंतर विराटने ट्विट करत म्हटलंय, “भारतीय टीमने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आणि विजय मिळवला. भारतीय खेळाडू आणि खासकरून अजिंक्य रहाणेच्या खेळीबद्दल मला विशेष आनंद आहे. यानंतर भारतीय संघाची कामगिरी अधिक सरस असेल”.
What a win this is, absolutely amazing effort by the whole team. Couldn’t be happier for the boys and specially Jinks who led the team to victory amazingly. Onwards and upwards from here ???
— Virat Kohli (@imVkohli) December 29, 2020
कर्णधार अजिंक्य रहाणेंचं झुंजार शतक, रविंद्र जाडेजाची अष्टपैलू कामगिरी आणि टीम इंडियाच्या बोलर्सची टिच्चून गोलंदाजीच्या बळावर भारताने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कांगारुंना आठ विकेट्सने नमवून 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. अजिंक्यच्या मॅचविनिंग खेळीबद्दल त्याला सामनावीराचा पुरस्कार देऊन त्याचा गौरव करण्यात आला.
सकारात्मक खेळ आणि जिगर दाखवण्याची गरज होती
अॅडलेडमधल्या पराभवानंतर सकारात्मक क्रिकेट खेळण्याची आणि जिगर दाखवण्याची गरज होती. भारतीय संघातील सर्वच खेळाडूंनी आपला सर्वोत्तम खेळ केला. सांघिक कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाला हे यश मिळाल्याचं अजिंक्य म्हणाला.
विजयाचं श्रेय शुभमन गिल आणि मोहम्मद सिराजला
टीम इंडियाच्या विजयाचं श्रेय कर्णधारअजिंक्य रहाणेने पहिलीच टेस्ट खेळणाऱ्या मोहम्मद सिराज आणि शुभमन गिल यांना दिलं. शुभमनची रणजी क्रिकेटमधली कामगिरी शानदार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर तो उत्तम खेळी खेळू शकतो हे त्याने आपल्या पहिल्याच कसोटीत दाखवून दिलं. सिराजनेही बॉलिंगमध्ये एकाग्रता दाखवली. पहिल्या कसोटीत तशी बोलिंग करणं अवघड असतं. मात्र कोणत्याही दबाशिवाय त्याने बोलिंग करत ऑस्ट्रेलियाच्या मुख्य फलंदाजांना बाद केलं.
(India Vs Australia Virat Kohli Tweet After India Won Melbourne Test)
हे ही वाचा