India vs Bangladesh 1st Test Highlights : कुलदीप-सिराजच्या बळावर बांगलादेशची झुंज, 102 धावांत 8 विकेट पडल्या

| Updated on: Dec 17, 2022 | 6:52 AM

India vs Bangladesh 1st Test Live Score Updates : टीम इंडियाच्या सुरुवातीच्या विकेट पटकन गेल्या, परंतु पुजारा आणि पंत या दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली आहे. पंत सध्या चांगल्या फॉर्ममध्ये दिसत असून त्याच्याकडून चाहत्यांना मोठी अपेक्षा आहे.

India vs Bangladesh 1st Test  Highlights : कुलदीप-सिराजच्या बळावर बांगलादेशची झुंज, 102 धावांत 8 विकेट पडल्या
India vs Bangladesh 1st Test Live ScoreImage Credit source: twitter

India vs Bangladesh 1st Test Day 1, : भारत आणि बांग्लादेशमध्ये पहिला कसोटी सामना बुधवारी सुरु झाला. भारताने पहिल्या दिवशी 6 विकेट गमावून 278 धावा केल्या आहेत. भारताकडून चेतेश्वर पुजाराने 90 आणि ऋषभ पंतने 46 धावा केल्या. श्रेयस अय्यर 82 धावा बनवून नाबाद आहे. बांग्लादेशसाठी तैजुल इस्लामने तीन, मेहदी हसनने दोन विकेट घेतल्या. भारताने टॉस जिंकून पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला.

बांगलादेश प्लेइंग इलेव्हन: झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो, यासिर अली, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन (क), लिटन दास, नुरुल हसन, मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, खालिद अहमद आणि इबादत हुसेन

टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन: शुभमन गिल, केएल राहुल (कर्णधार), चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 15 Dec 2022 04:04 PM (IST)

    कुलदीप-सिराजच्या बळावर बांगलादेशची झुंज

    कुलदीप-सिराजच्या बळावर बांगलादेशची झुंज, 102 धावांत 8 विकेट पडल्या

  • 15 Dec 2022 03:40 PM (IST)

    बांगलादेशचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला

    कुलदीप यादवने शकीब अल हसनला बाद केल्याने बांगलादेशचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला

  • 15 Dec 2022 01:30 PM (IST)

    यासिर अली चार धावा करुन बाद झाला

    उमेश यादवने त्याच्या दुसऱ्या (चौथ्या डावातील) षटकातील तिसऱ्या चेंडूवर यासिर अलीला (4) बोल्ड केले.

  • 15 Dec 2022 01:28 PM (IST)

    टीम इंडियाने पहिल्या डावात 404 धावा केल्या

    सिराजने डावाच्या पहिल्याच चेंडूवर टीम इंडियाला यश मिळवून दिले. त्याने बांगलादेशचा सलामीवीर नजमुल हसन शांतोला (0) ऋषभ पंतकडे विकेटच्या मागे झेलबाद केले. टीम इंडियाने पहिल्या डावात 404 धावा केल्या आहेत. यासिर अली फलंदाजीला आला.

  • 15 Dec 2022 01:28 PM (IST)

    बांगलादेशची दुसरी विकेट पडली

    बांगलादेशची दुसरी विकेट पडली, सिराजनंतर उमेशने दिला धक्का

  • 15 Dec 2022 12:45 PM (IST)

    अश्विन 58 धावा करून बाद झाला

    भारतीय संघाला 8 वा धक्का बसला. अश्विन 58 धावा करून यष्टिचित झाला. मेहदी हसन मिराजने त्याला शिकार बनवले. अश्विनने 113 चेंडूंच्या खेळीत 2 चौकार आणि तब्बल षटकार ठोकले. 385 च्या सांघिक स्कोअरवर भारताला 8वा धक्का बसला. उमेश यादव फलंदाजीला आला.

  • 15 Dec 2022 12:43 PM (IST)

    अश्विनचे ​​अर्धशतक

    अश्विनने कसोटी कारकिर्दीतील 13वे अर्धशतक झळकावले. तैजुल इस्लामच्या डावातील १२३व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर त्याने षटकार ठोकला. त्यानंतर पुढच्या चेंडूवर त्याने एकच धाव घेतली आणि वैयक्तिक धावसंख्या 50 वर आणली.

  • 15 Dec 2022 12:43 PM (IST)

    अश्विनने 13वे कसोटी अर्धशतक झळकावले

    अश्विनने 13वे कसोटी अर्धशतक झळकावले, टीम इंडिया 400 धावांच्या जवळ

  • 15 Dec 2022 11:45 AM (IST)

    लंच ब्रेक नंतर खेळ सुरू

    दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या पहिल्या दोन तासांत भारताने 30 षटकांत 1 गडी गमावून 70 धावा केल्या. आर अश्विन ४० धावा करून खेळत आहे तर कुलदीप यादव २१ धावा करून नाबाद आहे.

  • 15 Dec 2022 11:02 AM (IST)

    India vs Bangladesh 1st Test Highlights : रविचंद्रन अश्विन 32 आणि कुलदीप यादव 10 धावांवर खेळत आहे

    भारतीय संघाने 114 षटकात 7 गडी गमावून 329 धावा केल्या आहेत. सध्या रविचंद्रन अश्विन 32 आणि कुलदीप यादव 10 धावा करून क्रीजवर आहेत. टीम इंडियाला 400 धावांच्या पुढे नेण्याची जबाबदारी रविचंद्रन अश्विन आणि कुलदीप यादव यांच्यावर आहे.

  • 15 Dec 2022 10:40 AM (IST)

    भारत 111 षटकांनंतर 320

    भारतीय संघाने 111 षटकात 7 गडी गमावून 320 धावा केल्या आहेत. सध्या रविचंद्रन अश्विन 28 आणि कुलदीप यादव 10 धावा करून खेळत आहेत. मेहदी हसन मिराजच्या शेवटच्या षटकात केवळ एक धाव झाली.

  • 15 Dec 2022 10:09 AM (IST)

    IND vs BAN 1st Test Live: टीम इंडियाच्या 300 धावा पूर्ण

    भारताच्या 300 धावा 102.2 षटकात पूर्ण झाल्या. अश्विनने मेहदी हसन मिराजचा एकल चेंडू घेत संघाची धावसंख्या 7 गडी बाद 300 अशी केली. सध्या अश्विन 18 धावा करून खेळत आहे तर कुलदीप यादवचे खातेही उघडलेले नाही.

  • 15 Dec 2022 10:08 AM (IST)

    श्रेयस अय्यरचे शतक हुकले

    श्रेयस अय्यरचे शतक हुकले

    श्रेयस अय्यरचे शतक हुकले. त्याने 192 चेंडूत 86 धावांची शानदार खेळी केली. डावाच्या 98व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर इबादत हुसेनने त्याला बोल्ड केले. श्रेयसने आपल्या खेळीत 10 चौकार मारले. 293 च्या सांघिक स्कोअरवर भारताची 7वी विकेट पडली. कुलदीप यादव फलंदाजीला आला.

  • 15 Dec 2022 09:31 AM (IST)

    LIVE । IND vs BAN 1st Test : श्रेयस आणि अश्विन उतरले

    दुसऱ्या दिवसाच्या खेळाची सुरुवात. श्रेयस अय्यर आणि रविचंद्रन अश्विन फलंदाजीला आले, तैजुल इस्लाम दुसऱ्या दिवसाचे पहिले षटक करतोय. सध्या श्रेयस अय्यर ८२ धावा करून नाबाद आहे.

  • 15 Dec 2022 09:03 AM (IST)

    LIVE । IND vs BAN 1st Test : पुजाराचे शतक हुकले

    या सामन्याच्या पहिल्या डावात टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराचे शतक हुकले. त्याने 203 चेंडूत 90 धावा केल्या. त्याच्या संयमी खेळीत 11 चौकारांचा समावेश होता.

  • 15 Dec 2022 08:57 AM (IST)

    IND vs BAN 1st Test : श्रेयस अय्यर शतकाच्या जवळ, दुसऱ्या दिवसाचा खेळ काही वेळात सुरू होईल

    श्रेयस अय्यर शतकाच्या जवळ, दुसऱ्या दिवसाचा खेळ काही वेळात सुरू होईल

    खेळाची सुरुवात कशी होणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

  • 14 Dec 2022 04:36 PM (IST)

    IND vs BAN: पहिल्यादिवशी टीम इंडियाचा स्कोर 278/6

    चेतेश्वर पुजारा आणि श्रेयस अय्यरच्या अर्धशतकाच्या बळावर टीम इंडियाने कसोटीच्या पहिल्यादिवशी पाचव्या विकेटसाठी 149 धावांची भागीदारी केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियाच्या 6 बाद 278 धावा झाल्या आहेत. पुजाराने 203 चेंडूत 90 धावा आणि श्रेयस अय्यरने 169 चेंडूत 82 रन्स केल्या आहेत.

  • 14 Dec 2022 03:23 PM (IST)

    चेतेश्वर पुजारा आणि श्रेयस अय्यर यांच्यातील 100 धावांची भागीदारी पूर्ण

    चेतेश्वर पुजारा आणि श्रेयस अय्यर यांच्यातील 100 धावांची भागीदारी पूर्ण झाली आहे. दोन्ही फलंदाज जबरदस्त चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहेत. टीम इंडिया पहिल्या दिवशी मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत आहे.

  • 14 Dec 2022 03:13 PM (IST)

    india vs bangladesh live score : भारताने 65 षटकात 4 गडी गमावून 207 धावा केल्या

    भारताने 65 षटकात 4 गडी गमावून 207 धावा केल्या आहेत. चेतेश्वर पुजारा 63 आणि श्रेयस अय्यर 53 धावा करून खेळत आहेत.

  • 14 Dec 2022 02:37 PM (IST)

    ind vs bangladesh live score : या सामन्यात टीम इंडियाने जबरदस्त कमबॅक केले

    या सामन्यात टीम इंडियाने जबरदस्त कमबॅक केले आहे. श्रेय अय्यर आणि चेतेश्वर पुजारा यांनी आपापली अर्धशतके येथे पूर्ण केली आहेत. दोघांमध्ये 93 धावांची भागीदारीही झाली आहे. आता भारताची धावसंख्या 64.2 षटकात 205/4 झाली आहे.

  • 14 Dec 2022 02:05 PM (IST)

    ind vs bangladesh live score : श्रेयस अय्यर 41 आणि चेतेश्वर पुजारा 42 धावांवर नाबाद आहेत

    भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्यात पहिल्याच दिवशी टी-ब्रेक झाला आहे. भारताची धावसंख्या 174/4 झाली आहे, श्रेयस अय्यर 41 आणि चेतेश्वर पुजारा 42 धावांवर नाबाद आहेत. दोन्ही खेळाडूंमध्ये 62 धावांची भागीदारी आहे.

  • 14 Dec 2022 01:46 PM (IST)

    bangladesh vs india live : टीम इंडीया विरुद्ध बांगलादेश : श्रेयस आणि पुजाराने टीम इंडियाचा डाव सांभाळला

    सुरुवातीच्या 4 विकेट्स गमावल्यानंतर टीम इंडियाने पुन्हा एकदा सामन्यात पुनरागमन केले आहे. भारताची धावसंख्या आता 164 झाली आहे. टीम इंडियाची धुरा सांभाळणारा चेतेश्वर पुजारा आणि श्रेयस अय्यर यांच्यात महत्त्वाची भागीदारी झाली आहे. दोन्ही खेळाडूंनी आतापर्यंत 52 धावा जोडल्या आहेत.

  • 14 Dec 2022 12:56 PM (IST)

    bangladesh india live score : भारत विरुद्ध बांगलादेश : षटकांत 4 गडी गमावून टीम इंडियाने 128 धावा केल्या

    भारतीय संघाने 40 षटकांत 4 गडी गमावून 128 धावा केल्या आहेत. सध्या चेतेश्वर पुजारा 71 चेंडूत 27 तर श्रेयस अय्यर 26 चेंडूत 10 धावा करून खेळत आहे.

  • 14 Dec 2022 12:45 PM (IST)

    bangladesh india live score : भारत विरुद्ध बांगलादेश : श्रेयस अय्यर 8 आणि चेतेश्वर पुजारा 26 धावा केल्यानंतर क्रीजवर

    दुसऱ्या सत्रात टीम इंडिया हळूहळू धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. भारताची धावसंख्या 125/4 झाली असून आता 38 षटके झाली आहेत. टीम इंडियाकडून श्रेयस अय्यर 8 आणि चेतेश्वर पुजारा 26 धावा केल्यानंतर क्रीजवर आहेत.

  • 14 Dec 2022 12:17 PM (IST)

    india vs bangladesh live score today :भारत विरुद्ध बांगलादेश : टीमची चौथी विकेट पडली

    विकेट : भारतीय संघाला ऋषभ पंतच्या रूपाने चौथा धक्का बसला. डावाच्या 32व्या षटकातील चौथ्या चेंडूवर तो मेहदी हसन मिराजच्या गोलंदाजीवर बाद झाला. पंतने 45 चेंडूंच्या खेळीत 6 चौकार आणि 2 षटकार मारले. श्रेयस अय्यर फलंदाजीला आला.

  • 14 Dec 2022 12:09 PM (IST)

    bangladesh india live score : भारत विरुद्ध बांगलादेश :ऋषभ पंतने आतापर्यंत 2 षटकार मारले

    या सामन्यात ऋषभ पंतने आतापर्यंत 2 षटकार मारले आहेत. चेतेश्वर पुजारा दुसऱ्या टोकाला फलंदाजी करत आहे, त्याने 47 चेंडूत 22 धावा केल्या आहेत.

  • 14 Dec 2022 12:05 PM (IST)

    bangladesh india live score : भारत विरुद्ध बांगलादेश : टीम इंडियाची धावसंख्या 100 च्या पुढे….

    ऋषभ पंतने आपल्या शैलीत फलंदाजीला सुरुवात केली आहे, त्यामुळे टीम इंडियाची धावसंख्या 100 च्या पुढे गेली आहे. आतापर्यंत ऋषभ पंतने 38 चेंडूत 36 धावा केल्या आहेत. तसेच चेतेश्वर पुजारासह पंतने आतापर्यंत 50 धावांची भागीदारी केली आहे.

  • 14 Dec 2022 12:02 PM (IST)

    bangladesh india live score : भारत विरुद्ध बांगलादेश :पंतचा झेल सुटला

    दुपारच्या जेवणानंतर खेळ सुरू, ऋषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा फलंदाजीला आले आहेत. दुसऱ्या सत्रातील पहिले षटक इबादत हुसेन करत आहे. ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर पंतचा झेल नुरुल हसनने चुकवला आणि चौकार मारला. या षटकात एकूण ५ धावा झाल्या.

  • 14 Dec 2022 11:26 AM (IST)

    india vs bangladesh score : पुजारा आणि पंतकडून डाव सावरण्याचा प्रयत्न

    तैजुल इस्लामच्या डावातील 26 व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर ऋषभ पंतने चौकार ठोकला. त्यानंतर पुजाराने चौथा चेंडू चौकारासाठी पाठवला. या षटकात एकूण 9 धावा झाल्या. उपाहारापर्यंत भारताने 26 षटकांत 3 गडी गमावून 85 धावा केल्या आहेत. सध्या पंत २९ धावांवर आहे तर पुजारा १२ धावा करून क्रीजवर आहे.

  • 14 Dec 2022 11:15 AM (IST)

    bangladesh india live score : भारत विरुद्ध बांगलादेश : पंतकडून चाहत्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा…

    सध्या पंत २९ धावांवर आहे तर पुजारा १२ धावा करून क्रीजवर आहे.

  • 14 Dec 2022 11:07 AM (IST)

    india vs bangladesh score : भारतीय संघाने पहिल्या डावात 25 षटकात तीन गडी गमावून 76 धावा केल्या

    india vs bangladesh score: भारतीय संघाने पहिल्या डावात 25 षटकात तीन गडी गमावून 76 धावा केल्या आहेत. सध्या ऋषभ पंत 23 चेंडूत 24 तर चेतेश्वर पुजारा 29 चेंडूत 8 धावा करून खेळत आहे. टीम इंडियाची तिसरी विकेट विराट कोहलीच्या रूपाने पडली. विराट केवळ 1 धाव करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

  • 14 Dec 2022 11:02 AM (IST)

    bangladesh vs india live : टीम इंडिया मोठ्या भागीदारीची गरज

    केएल राहुल आणि शुबमन गिल यांनी भारताला चांगली सुरुवात देण्याचा प्रयत्न केला पण सध्या दोन्ही सलामीवीर पॅव्हेलियनमध्ये पोहोचले आहेत. एवढेच नाही तर विराट कोहलीही आऊट झाला. सध्या चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत यजमान संघाच्या गोलंदाजांचा सामना करत आहेत.

  • 14 Dec 2022 11:00 AM (IST)

    bangladesh india live score : भारत विरुद्ध बांगलादेश :पंतने तैजुलला चौकार मारला

    तैजुल इस्लामच्या डावातील २२व्या षटकातील पहिल्या चेंडूवर यष्टिरक्षक ऋषभ पंतने चौकार ठोकला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये खेळत त्याने शॉर्ट बॉल सीमापार पाठवला. भारतीय संघाने 22 षटकात तीन गडी गमावून 55 धावा केल्या आहेत. सध्या चेतेश्वर पुजारा 5 तर ऋषभ पंत 6 धावा करून खेळत आहे.

  • 14 Dec 2022 10:52 AM (IST)

    bangladesh india live score : भारत विरुद्ध बांगलादेश : मधल्या फळीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा

    भारतीय संघाने 20 षटकात 3 गडी गमावून 48 धावा केल्या आहेत. सध्या चेतेश्वर पुजारा 4 धावा करून क्रीजवर आहे, तर ऋषभ पंतचे खाते अजून उघडलेले नाही. टीम इंडियाची पहिली विकेट 41 धावांवर पडली, पण पुढच्या सात धावा करताना 3 विकेट गमावल्या. सध्या पुजारा आणि पंत यांनी मिळून मोठी भागीदारी करणे आणि संघाला चांगली धावसंख्या उभारण्यास मदत करणे अपेक्षित आहे.

  • 14 Dec 2022 10:45 AM (IST)

    bangladesh india live score : भारत विरुद्ध बांगलादेश : तैजुलची ही दुसरी विकेट आहे

    तैजुलने आजच्या मॅचमध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. त्याने आतापर्यंत दोन विकेट घेतल्या आहेत. तसेच त्याने आतापर्यंत चार मेडन ओव्हर टाकली आहे.

  • 14 Dec 2022 10:43 AM (IST)

    भारताने 48 धावांत 3 विकेट गमावल्या

    भारताला मोठा धक्का, विराट कोहली अवघ्या एक धावा करून बाद झाला. विराटला तैजुल इस्लामने एलबीडब्ल्यू आऊट केले. त्याने 5 चेंडूंचा सामना केला. तैजुलची ही दुसरी विकेट आहे. भारताने 48 धावांत 3 विकेट गमावल्या आहेत.

  • 14 Dec 2022 10:42 AM (IST)

    चेतेश्वर पुजार आणि पंत मैदानात

    टीम इंडिया अडचणीत 50 धावांमध्ये तीन खेळाडू बाद, चेतेश्वर पुजार आणि पंत मैदानात

  • 14 Dec 2022 10:40 AM (IST)

    भारताची तिसरी विकेट पडली, विराट कोहली आऊट

    भारताची तिसरी विकेट पडली, विराट कोहली आऊट

    विराट कोहली आजच्या सामन्यात फक्त एक धाव काढली

  • 14 Dec 2022 10:36 AM (IST)

    भारताची दुसरी विकेट पडली

    भारताची दुसरी विकेट पडली. कर्णधार केएल राहुल 22 धावा करून बाद झाला. त्याला वेगवान गोलंदाज खालिद अहमदने बोल्ड केले.

  • 14 Dec 2022 10:21 AM (IST)

    सात संशयितांना दरोडेखोरांना अटक

    मालेगाव : दरोड्याच्या तयारीत असलेल्या सात संशयितांना अटक, गावठी पिस्तूल, तीन काडतुसांसह धारदार शस्त्रे जप्त, पवारवाडी पोलिसांची कारवाई

  • 14 Dec 2022 10:18 AM (IST)

    टीम इंडियाची पहिली विकेट पडली

    41 धावांच्या सांघिक स्कोअरवर भारताला पहिला धक्का बसला. शुबमन गिल डावाच्या 14व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर तैजुल इस्लामच्या गोलंदाजीवर यासिर अलीच्या हाती झेलबाद झाला. गिलने 40 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने 20 धावा केल्या. चेतेश्वर पुजारा फलंदाजीला आला.

  • 14 Dec 2022 10:18 AM (IST)

    वृद्ध दांपत्यावर जीवघेणा हल्ला

    इंदापूर, पुणे : खोरोची येथील वृद्ध दांपत्यावर जीवघेणा हल्ला, हल्ल्यात वृद्धचा मृत्यू, इंदापूर पोलिसात हत्येचा गुन्हा दाखल, पुढील तपास सुरु

  • 14 Dec 2022 09:45 AM (IST)

    भारत 8 षटकांनंतर 30/0

    भारतीय संघाने 8 षटकात एकही विकेट न गमावता 30 धावा केल्या आहेत. केएल राहुल १३ आणि शुभमन गिल १६ धावा करून खेळत आहेत.

  • 14 Dec 2022 09:35 AM (IST)

    7 ओव्हर नंतर टीम इंडियाची धावसंख्या 30

    7 ओव्हर नंतर टीम इंडियाची धावसंख्या 30

    टीम इंडीयाची ओपनिंग जोडी मैदानात

  • 14 Dec 2022 09:30 AM (IST)

    राहुलने चौकार मारून खाते उघडले

    केएल राहुलने इबादत हुसेनच्या सुरुवातीच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर शानदार चौकार ठोकून आपले खाते उघडले. गिलने दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर सिंगल मारून खाते उघडले. संघाने 2 षटकांत केवळ 5 धावा केल्या आहेत.

  • 14 Dec 2022 09:28 AM (IST)

    केएल राहूल 12 धावांवर खेळत आहे

    या चौकारासह राहुल त्याच्या वैयक्तिक स्कोअर 12 पर्यंत पोहोचला आहे, त्याच्यासोबत शुबमन गिल मैदानावर उपस्थित आहे, ज्याने आतापर्यंत 18 चेंडूत 7 धावा केल्या आहेत.

  • 14 Dec 2022 09:24 AM (IST)

    राहुल आणि शुभमन सलामीला उतरले

    राहुल आणि शुभमन सलामीला उतरले

    चितगाव कसोटी सामन्यात कर्णधार केएल राहुल आणि शुभमन गिल सलामीसाठी मैदानात उतरले आहेत. इबादत हुसेन डावातील पहिले षटक करेल.

Published On - Dec 14,2022 9:18 AM

Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.