भारत vs बांगलादेश, 2nd ODI Live Score: अरेरे, जखमी रोहित शर्मा लढला, पण टीम इंडिया 5 रन्सने हरली

| Updated on: Dec 07, 2022 | 8:11 PM

भारत vs बांगलादेश 2nd ODI लाइव्ह स्कोर अपडेट्स : दोन्ही टीमसाठी विजय महत्त्वाचा

भारत vs बांगलादेश, 2nd ODI Live Score: अरेरे, जखमी रोहित शर्मा लढला, पण टीम इंडिया 5 रन्सने हरली
India vs Bangladesh 2nd ODI MatchImage Credit source: twitter

IND vs BAN, 2nd ODI, LIVE Score: दुसऱ्या वनडे मध्ये टीम इंडियाचा अवघ्या 5 रन्सनी पराभव झाला. टीम इंडियाने अखेरच्या चेंडूपर्यंत लढत दिली. जखमी रोहित शर्मा अखेरपर्यंत मैदानावर उभा होता. त्याच्या बॅटिंगमुळे टीम इंडियाच्या विजयाची आस निर्माण झाली होती. शेवटच्या चेंडूवर 6 रन्सची गरज होती. पण रोहितला षटकार मारता आला नाही. बांग्लादेशने विजयासाठी 272 धावांचे लक्ष्य दिले होते. टीम इंडियाने 9 बाद 266 धावा केल्या. रोहितने 28 चेंडूत नाबाद 51 धावा फटकावल्या. यात 3 चौकार आणि 5 षटकार होते.

भारताची प्लेइंग XI: रोहित शर्मा (कॅप्टन), शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, वाशिंगटन सुंदर, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, दीपक चाहर, मोहम्मद सिराज, उमरान मलिक

बांग्लादेशची प्लेइंग XI: नजमुल संटो, लिटन दास (कॅप्टन), अनामुल हक, शाकिब अल हसन, मुस्फिकुर रहीम, महमुदुल्लाह, अफीफ हुसैन, मेहदी हसन, इबादत हुसैन, नसुम अहमद, मुस्तफिजुर रहमान

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 07 Dec 2022 07:54 PM (IST)

    Ind vs Ban Live score: टीम इंडिया 5 रन्सने हरली

    टीम इंडियाने अखेरच्या चेंडूपर्यंत लढत दिली. पण टीम इंडिया अखेर 5 रन्सने हरली. जखमी रोहित शर्मा अखेरपर्यंत मैदानावर उभा होता. त्याच्या बॅटिंगमुळे टीम इंडियाच्या विजयाची आस निर्माण झाली होती. शेवटच्या चेंडूवर 6 रन्सची गरज होती. पण रोहितला षटकार मारता आला नाही. बांग्लादेशने विजयासाठी 272 धावांचे लक्ष्य दिले होते. टीम इंडियाने 9 बाद 266 धावा केल्या. रोहितने 28 चेंडूत नाबाद 51 धावा फटकावल्या. यात 3 चौकार आणि 5 षटकार होते.

  • 07 Dec 2022 07:45 PM (IST)

    Ind vs Ban Live score: रोहितने मारल्या दोन सिक्स

    महमुदुल्लाहच्या 49 व्या ओव्हरमध्ये रोहित शर्माने 2 सिक्स मारल्या. टीम इंडियाला 6 चेंडूत 20 धावांची गरज. रोहित शर्मा मैदानात. मोहम्मद सिराज आऊट झाला.

  • 07 Dec 2022 07:40 PM (IST)

    Ind vs Ban Live score: 48 वी मेडन ओव्हर

    मुस्तफिजूर रहमानच्या 48 व्या ओव्हरमध्ये एकही धाव निघाली नाही. मोहम्मद सिराजने ओव्हर वाया घालवली. टीम इंडियाला आता 12 चेंडूत 40 धावांची गरज आहे.

  • 07 Dec 2022 07:28 PM (IST)

    Ind vs Ban Live score: रोहित शर्माने धुतलं

    इबादत होसैन टाकत असलेल्या 46 व्या षटकात रोहित शर्माने दोन सिक्स मारले. टीम इंडियाच्या 8 बाद 231 धावा झाल्या आहेत. या ओव्हरमध्ये 18 धावा निघाल्या.

  • 07 Dec 2022 07:24 PM (IST)

    Ind vs Ban Live score: दीपक चाहर बाद

    दीपक चाहर बाद होणारा टीम इंडियाचा आठवा फलंदाज ठरला. इबादत होसैनच्या गोलंदाजीवर त्याने नजमुलकडे सोपा झेल दिला. त्याने 18 चेंडूत 11 धावा केल्या. टीम इंडियाला विजयासाठी 50 पेक्षा जास्त धावांची गरज आहे. त्यांचे दोन विकेट अजून शिल्लक आहे.

  • 07 Dec 2022 07:15 PM (IST)

    Ind vs Ban Live score: टीम इंडिया अडचणीत, सातवा विकेट

    43 ओव्हर्समध्ये टीम इंडियाच्या 7 बाद 208 धावा झाल्या आहेत. शार्दुल ठाकूर 7 रन्सवर शाकीब अल हसनच्या गोलंदाजीवर बाद झाला. आता दीपक चाहर, रोहित शर्माची जोडी मैदानात आहे.

  • 07 Dec 2022 06:49 PM (IST)

    Ind vs Ban Live score: टीम इंडिया अडचणीत, सहावी विकेट

    टीम इंडिया अडचणीत आली आहे. अक्षर पटेलच्या रुपाने सहावी विकेट गेली आहे. इबादत होसैनने त्याला शाकीब अल हसनकरवी झेलबाद केलं. अक्षरने 56 चेंडूत 56 धावा केल्या. यात दोन चौकार आणि तीन षटकार आहेत. 38.3 ओव्हर्समध्ये टीम इंडियाच्या 6 बाद 189 धावा झाल्या आहेत.

  • 07 Dec 2022 06:40 PM (IST)

    Ind vs Ban Live score: अक्षर पटेलची हाफ सेंच्युरी

    अक्षर पटेलने 50 चेंडूत नाबाद 50 धावा केल्या आहेत. यात 1 फोर, 3 सिक्स आहेत. श्रेयस अय्यरसोबत मिळून त्याने पाचव्या विकेटसाठी 107 धावांची भागीदारी केली. 36 ओव्हर अखेरीस टीम इंडियाच्या 5 बाद 181 धावा झाल्या आहेत. आता शार्दुल ठाकूर फलंदाजीसाठी आला आहे.

  • 07 Dec 2022 06:37 PM (IST)

    Ind vs Ban Live score: टीम इंडियाची मोठी विकेट

    35 ओव्हर अखेरीस टीम इंडियाची 173/5 अशी स्थिती आहे. सेट झालेला श्रेयस अय्यर आऊट झाला. त्याने 102 चेंडूत 82 धावा केल्या. यात 6 फोर आणि 3 सिक्स आहेत.

  • 07 Dec 2022 05:59 PM (IST)

    Ind vs Ban Live score: श्रेयसची हाफ सेंच्युरी, अय्यर-अक्षरची जमली जोडी

    श्रेयस अय्यरने हाफ सेंच्युरी झळकवली आहे. 26 ओव्हर अखेरीस टीम इंडियाच्या 4 बाद 122 धावा झाल्या आहेत. श्रेयस 73 चेंडूत 54 आणि अक्षर पटेल 22 चेंडूत 21 धावांवर खेळतोय. दोघांमध्ये 50 पेक्षा जास्त धावांची भागीदारी झालीय.

  • 07 Dec 2022 05:43 PM (IST)

    Ind vs Ban Live score: टीम इंडियाच्या 100 धावा पूर्ण

    22 ओव्हर्समध्ये टीम इंडियाच्या 4 बाद 100 धावा झाल्या आहेत. श्रेयस अय्यर 44 आणि अक्षर पटेल 10 रन्सवर खेळतोय.

  • 07 Dec 2022 05:31 PM (IST)

    Ind vs Ban Live score: टीमला गरज असताना केएल राहुल स्वस्तात बाद

    केएल राहुलच्या रुपाने टीम इंडियाची चौथी विकेट गेली आहे. मेहदी हसन मिराजने त्याला LBW आऊट केलं. राहुलने 28 चेंडूत 14 धावा केल्या. यात एकही चौकार किंवा षटकार नाहीय. 19 ओव्हर्समध्ये 4 बाद 65 धावा झाल्या आहेत.

  • 07 Dec 2022 05:11 PM (IST)

    Ind vs Ban Live score: 15 ओव्हर्सनंतर अशी आहे स्थिती

    15 ओव्हर्सनंतर टीम इंडियाच्या 3 बाद 56 धावा झाल्या आहेत. तीन प्रमुख फलंदाज तंबूत परतलेत. श्रेयस अय्यर आणि केएल राहुलची जोडी मैदानात आहे. अय्यर 38 चेंडूत 22 आणि राहुल 17 चेंडूत 8 धावांवर खेळतोय.

  • 07 Dec 2022 04:52 PM (IST)

    Ind vs Ban Live score: भारताला तिसरा धक्का

    भारताला तिसरा धक्का बसला आहे. वॉशिंग्टन सुंदर शाकीब हसनच्या गोलंदाजीवर लिट्टन दासकडे झेल देऊन तंबूत परतला. त्याने 19 चेंडूत 11 धावा केल्या. 10.2 ओव्हर्समध्ये टीम इंडियाच्या 3 बाद 39 धावा झाल्या आहेत.

  • 07 Dec 2022 04:39 PM (IST)

    Ind vs Ban Live score: रोहित शर्मा मैदानात नाही उतरला

    7 ओव्हर अखेरीस टीम इंडियाच्या 2 बाद 25 धावा झाल्या आहेत. रोहित शर्मा दुखापतीमुळे फलंदाजीसाठी मैदानात उतरला नाही.

  • 07 Dec 2022 04:37 PM (IST)

    Ind vs Ban Live score: भारताची खराब सुरुवात, दोन प्रमुख फलंदाज तंबूत

    विराट कोहली आणि शिखर धवन तंबूत परतले आहेत. विराट 5 आणि शिखर 8 रन्सवर आऊट झाला. विराटला इबादत होसेनने क्लीन बोल्ड केलं. शिखर धवनने मुस्तफीझूर रहमानच्या गोलंदाजीवर मेहदी हसन रजाकडे झेल दिला. आता श्रेयस अय्यर आणि वॉशिंग्टन सुंदरची जोडी मैदानात आहे. 6.3 ओव्हर्समध्ये टीम इंडियाची 24/2 स्थिती आहे.

  • 07 Dec 2022 03:38 PM (IST)

    Ind vs Ban Live score: पुन्हा मेहदी हसन मिराज टीम इंडियाला नडला

    50 व्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर मेहदी हसन मिराजने शानदार शतक झळकावलं. त्याने 83 चेंडूत नाबाद 100 धावा केल्या. यात 8 चौकार आणि 4 षटकार आहेत. दुसऱ्याबाजूला महमुदुल्लाहने 96 चेंडूत 77 धावा फटकावल्या. दोघांनी सातव्या विकेटसाठी 148 धावांची भागीदारी केली. एकवेळ बांग्लादेशची स्थिती 6 बाद 69 होती. तिथून दोघांनी बांग्लादेशचा डाव सावरला. या दोघांमुळे बांग्लादेशने निर्धारित 50 ओव्हर्समध्ये 7 बाद 271 धावा केल्या.

  • 07 Dec 2022 03:17 PM (IST)

    Ind vs Ban Live score: अखेर महमुदुल्लाह OUT

    उमरान मलिकने अखेर महमुदुल्लाहचा अडसर दूर केला. विकेटकीपर केएल राहुलने त्याचा जबरदस्त झेल घेतला. 96 चेंडूत 77 धावा करताना त्याने 7 चौकार लगावले. 47 ओव्हरअखेरीस बांग्लादेशची 231/7 अशी स्थिती आहे. उमरान मलिकला या ओव्हरमध्ये तीन चौकार मारले.

  • 07 Dec 2022 03:04 PM (IST)

    Ind vs Ban Live score: बांग्लादेशच्या 200 धावा पूर्ण

    45 ओव्हर्सचा खेळ पूर्ण झालाय. बांग्लादेशच्या 6 बाद 203 धावा झाल्या आहेत. महमुदुल्लाह 89 चेंडूत 65 आणि मिराज 70 चेंडूत 65 धावांवर खेळतोय. ही जोडी फोडणं भारतीय गोलंदाजांना जमलेलं नाही.

  • 07 Dec 2022 02:40 PM (IST)

    Ind vs Ban Live score: 40 ओव्हर्सचा खेळ पूर्ण

    40 ओव्हर्सचा खेळ पूर्ण झालाय. बांग्लादेशच्या 6 बाद 170 धावा झाल्या आहेत. महमुदुल्लाह 70 चेंडूत 47 आणि मिराज 59 चेंडूत 53 धावांवर खेळतोय.

  • 07 Dec 2022 02:31 PM (IST)

    मेहदी हसनचे 55 चेंडूत अर्धशतक

    मेहदी हसनने 55 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याचे वनडे कारकिर्दीतील हे तिसरे अर्धशतक आहे. उमरान मलिकच्या 38व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर त्याने वैयक्तिक धावसंख्या 50 वर आणली.

  • 07 Dec 2022 02:28 PM (IST)

    IND vs BAN : महमुदुल्ला 35 आणि मेहदी हसन 45 धावांवर खेळत आहे

    बांगलादेशने 35 षटकांत 6 गडी गमावून 149 धावा केल्या आहेत. सध्या महमुदुल्ला 35 आणि मेहदी हसन 45 धावांवर खेळत आहे.

  • 07 Dec 2022 02:18 PM (IST)

    Ind vs Ban Live score : बांग्लादेशी जोडीसमोर भारतीय गोलंदाज हतबल

    महमुदुल्लाह-मिराज या बांग्लादेशच्या दोन्ही फलंदाजांची जबरदस्त बॅटिंग सुरु आहे. ते भारतीय गोलंदाजांना दाद देत नाहीयत. त्यांचा विकेट मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. 35 ओव्हर अखेर बांग्लादेशची 149/6 स्थिती आहे. महमुदुल्लाह 35 आणि मिराज 45 धावांवर खेळतोय.

  • 07 Dec 2022 02:08 PM (IST)

    Ind vs Ban Live score : टीम इंडियाच्या गोलंदाजांचा संघर्ष

    33 ओव्हर्सनंतर बांग्लादेशची 136/6 स्थिती आहे. महमुदुल्लाह-मिराजची जोडी जमली आहे. भारतीय गोलंदाजांचा संघर्ष सुरु आहे. महमुदुल्लाह 30 आणि मिराज 41 धावांवर खेळतोय.

  • 07 Dec 2022 01:54 PM (IST)

    Ind vs Ban Live score : बांग्लादेशी बॅट्समनचा प्रतिहल्ला, महमदुल्लाह -मिराजची जोडी जमली

    30 ओव्हरनंतर बांग्लादेशच्या 6 बाद 124 धावा झाल्या आहेत. महमदुल्लाह (26) आणि मेहदी हसन मिराजची (31) जोडी जमली आहे. दोघांमध्ये 50 पेक्षा जास्त धावांची भागीदारी झालीय.

  • 07 Dec 2022 01:37 PM (IST)

    Ind vs Ban Live score: टीम इंडियाची भेदक गोलंदाजी

    टीम इंडियाच्या गोलंदाजांचा भेदक मारा सुरु आहे. 25 ओव्हरनंतर बांग्लादेशची 96/6 अशी स्थिती आहे. महमदुल्लाह 17 आणि मेहदी हसन मिराज 12 धावांवर खेळतोय. वॉशिंग्टन सुंदरने 3, मोहम्मद सिराजने 2 आणि उमरान मलिकने 1 विकेट काढलाय.

  • 07 Dec 2022 01:13 PM (IST)

    Ind vs Ban Live score : सुंदरने बांग्लादेशची वाट लावली

    वॉशिंग्टन सुंदरने 19 व्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर मुशाफिकूर रहिमला आऊट केलं. सुंदरच्या गोलंदाजीवर त्याने शिखर धवनकडे झेल दिला. त्याने 24 चेंडूत 12 धावा केल्या. त्यानंतर सुंदरने अतीफ होसैनला शुन्यावर बोल्ड केलं. 19.2 ओव्हर्सनंतर बांग्लादेशची 71/6 अशी स्थिती आहे.

  • 07 Dec 2022 12:59 PM (IST)

    Ind vs Ban Live score : सुंदरच्या फिरकीची कमाल, सेट बॅट्समन OUT

    वॉशिंग्टन सुंदरने 17 व्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर शाकीब अल हसनला आऊट केलं. शाकीबने फटकेबाजीच्या नादात शिखर धवनकडे सोपा झेल दिला. त्याने 20 चेंडूत 8 धावा केल्या. बांग्लादेशची 66/4 अशी स्थिती आहे.

  • 07 Dec 2022 12:51 PM (IST)

    Ind vs Ban Live score: 15 ओव्हर्सनंतर अशी आहे स्थिती

    15 ओव्हर्सचा खेळ पूर्ण झालाय. बांग्लादेशची 63/3 अशी स्थिती आहे. शाकीब अल हसन 6 आणि मुशाफीकूर रहीम 10 धावांवर खेळतोय.

  • 07 Dec 2022 12:40 PM (IST)

    Ind vs Ban Live score : बांग्लादेशला तिसरा झटका

    उमरान मलिकने बांग्लादेशला तिसरा झटका दिला आहे. नजमुल हौसेन शांटोला त्याने क्लीन बोल्ड केलं. शांटोने 35 चेंडूत 21 धावा केल्या. यात 3 चौकार होते. बांग्लादेशची 13.1 षटकात 52/3 अशी स्थिती आहे.

  • 07 Dec 2022 12:31 PM (IST)

    Ind vs Ban Live score : 12 ओव्हर्सचा खेळ पूर्ण

    12 ओव्हर्समध्ये बांग्लादेशच्या 2 बाद 47 धावा झाल्या आहेत. बांग्लादेशचे दोन्ही ओपनर तंबूत परतले आहेत. नजमुल शांटो 16 आणि शाकीब हसन 5 धावांवर खेळतोय.

  • 07 Dec 2022 12:19 PM (IST)

    ind vs ban live streaming channel: बांगलादेशची दुसरी विकेट पडली, 10 षटकाचा खेळ संपला

    10व्या षटकात मोहम्मद सिराजने लिटन दासला बोल्ड केले. ओव्हरचा दुसरा चेंडू इनस्विंगर होता.

  • 07 Dec 2022 12:14 PM (IST)

    आठ षटकानंतर बांगलादेशची धावसंख्या 38

    बांगलादेशच्या डावाची 8 षटके संपली असून धावसंख्या 38 वर पोहोचली आहे. नझमुल हुसैन आणि लिटन दास हे दोन खेळाडू क्रीजवर..

  • 07 Dec 2022 12:10 PM (IST)

    ind vs ban streaming : दीपक चहरचं महागड षटक

    दीपक चहरने पाचव्या षटकात नऊ धावा दिल्या. ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर लिटन दासने कव्हर्सवर चेंडू खेळला आणि चौकार मारला.

  • 07 Dec 2022 12:06 PM (IST)

    ind vs ban Live score : मोहम्मद सिराजने बांगलादेशची पहिली विकेट घेतली

    मोहम्मद सिराजने बांगलादेश टीमचा पहिला खेळाडू बाद केला आहे. अनामूल हक अकरा धावांवरती बाद केले आहे. मोहम्मद सिराजने त्याला सिराजने एलबीडब्ल्यू आऊट केले.

  • 07 Dec 2022 12:03 PM (IST)

    ind vs bangladesh live streaming : टीम इंडियाला धक्का रोहित शर्मा जखमी, बांगलादेशची पहिली विकेट पडली

    कॅच घेण्याचा प्रयत्न करीत असताना रोहित शर्मा जखमी झाला. त्यामुळे तो पुन्हा पॅव्हेलियनमध्ये परतला

Published On - Dec 07,2022 11:54 AM

Follow us
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.