माही मार रहा है! बांगलादेशविरुद्ध षटकार ठोकून धोनीचं शतक पूर्ण
कार्डिफ, इंग्लंड : पहिल्या सराव सामन्यात पराभव झाल्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात अत्यंत संयमी फलंदाजी केली. कार्डिफच्या मैदानावरील या सामन्यात भारताने बांगलादेशला विजयासाठी तब्बल 360 धावांचं आव्हान दिलंय. महेंद्र सिंह धोनी (113) आणि केएल राहुल (108) यांच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने ही मजल मारली. कर्णधार विराट कोहलीनेही यामध्ये 47 धावांचं योगदान दिलं. विश्वचषकापूर्वी बांगलादेशविरुद्ध भारताचा […]
कार्डिफ, इंग्लंड : पहिल्या सराव सामन्यात पराभव झाल्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात अत्यंत संयमी फलंदाजी केली. कार्डिफच्या मैदानावरील या सामन्यात भारताने बांगलादेशला विजयासाठी तब्बल 360 धावांचं आव्हान दिलंय. महेंद्र सिंह धोनी (113) आणि केएल राहुल (108) यांच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने ही मजल मारली. कर्णधार विराट कोहलीनेही यामध्ये 47 धावांचं योगदान दिलं.
विश्वचषकापूर्वी बांगलादेशविरुद्ध भारताचा हा सराव सामना आहे. शिखर धवन आणि रोहित शर्मा ही सलामी जोडी स्वस्तात माघारी परतल्यानंतर विराट कोहलीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. 47 धावा करुन विराट माघारी परतल्यानंतर धोनी आणि केएल राहुलने मजबूत भागीदारी केली. शतकी खेळी करुन बाद झाल्यानंतर राहुलनंतर धोनीने 78 चेंडूत 113 धावा ठोकल्या.
आयपीएलमध्ये धोनीचा फॉर्म सर्वांनीच पाहिला होता. पण वन डेमध्येही धोनीचा हा फॉर्म दिसल्याने विश्वचषकापूर्वी भारतासाठी ही मोठी दिलासादायक गोष्ट आहे. गेल्या सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. त्या सामन्यात फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले होते. पण या सामन्यात चुका दुरुस्त करत मोठी धावसंख्या उभी केली.