Video | इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातून कृणाल पांड्या आणि प्रसिद्ध कृष्णाचं एकदिवसीय पदार्पण
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात पहिला एकदिवसीय सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यातून कृणाल पांड्या (krunal pandya) आणि प्रसिद्ध कृष्णाने ( prasidh krishna) एकदिवसीय पदार्पण केलं आहे.
पुणे : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे क्रिकेट स्टेडियममध्ये पहिला सामना खेळवण्यात (India vs England 1st Odi) येत आहे. इंग्लंडने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याच्या निर्णय घेतला आहे. त्यामुळे टीम इंडिया प्रथम फलंदाजी करत आहे. दरम्यान या पहिल्या सामन्यातून टीम इंडियाकडून 2 खेळाडूंनी पदार्पण केलं आहे. टीम मॅनेजमेंटने अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या (krunal pandya) आणि प्रसिद्ध कृष्णाला (prasidh krishna) संधी दिली आहे. यानिमित्ताने दोघांचे पदार्पण ठरलं आहे. (india vs england 1st odi prasidh krishna and krunal pandya makes his odi debut)
ODI debut for @krunalpandya24 ?International debut for @prasidh43 ?#TeamIndia @Paytm #INDvENG pic.twitter.com/Hm9abtwW0g
— BCCI (@BCCI) March 23, 2021
हार्दिक पांड्याने आपला मोठा बंधू कृणालला टीम इंडियाची कॅप देऊन संघात स्वागत केलं. तसेच प्रसिद्ध कृष्णालाही कॅप देण्यात आली. टीम इंडियाकडून कृणाल एकदिवसीय सामन्यांमध्ये पदार्पण करणारा 233 वा, तर प्रसिद्ध 234 वा भारतीय ठरला आहे.
…अन कृणाल भावूक झाला
हार्दिकने कृणालला भारतीय संघाची कॅप दिली. यावेळेस कृणाल भावूक झाला. त्याने आकाशाकडे पाहत आपल्या वडीलांना अभिवादन केलं. तसेच कृणालने हार्दिकला मिठी मारली.
Some brotherly love ??
A moment to cherish for the duo ?#TeamIndia #INDvENG @Paytm pic.twitter.com/UYwt5lmlQq
— BCCI (@BCCI) March 23, 2021
या दोन्ही खेळाडूंनी नुकत्याच झालेल्या विजय हजारे स्पर्धेत शानदार कामगिरी केली होती. या कामिगिरीच्या जोरावर या दोघांना एकदिवसीय मालिकेसाठी संधी देण्यात आली. कृणालने या स्पर्धेतील एकूण 5 सामन्यात 2 शतक आणि 2 अर्धशतकांसह 388 धावा केल्या होत्या. तसेच प्रसिद्धनेही आपल्या फिरकीने 7 सामन्यांमध्ये 14 विकेट्स मिळवल्या होत्या.
कृणाल बॅटिंगसोबत बोलिंगही करतो. त्यामुळे कृणालकडून अष्टपैलू कामगिरीची अपेक्षा असणार आहे. तसेच प्रसिद्धकडूनही चांगली गोलंदाजी अपेक्षित असणार आहे.
अशी आहे टीम इंडिया
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, हार्दिर पांड्या, कृणाल पांड्या, शार्दुल ठाकूर, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा
इंग्लंडची टीम
इयॉन मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स, जॉस बटलर, सॅम बिलिंग्स, मोईन अली, सॅम करन, टॉम करन, आदिल रशीद आणि मार्क वुड
संबंधित बातम्या :
Prasidh Krishna | आयपीएलमध्ये 2018 साली पदार्पण, 3 वर्षांनी टीम इंडियामध्ये संधी, कोण आहे प्रसिद्ध कृष्णा?
Live India vs England 2021, 1st odi, LIVE Score | टीम इंडियाच्या बॅटिंगला सुरुवात, रोहित-शिखर सलामी जोडी मैदानात
(india vs england 1st odi prasidh krishna and krunal pandya makes his odi debut)