Yuzvendra Chahal | युझवेंद्र चहलची विक्रमाला गवसणी, ‘यॉर्कर किंग’ जसप्रीत बुमराहचा रेकॉर्ड ब्रेक
इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात (india vs england 1st t 20i) युझवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) 1 विकेट घेतली.
अहमदाबाद : इंग्लंडने टीम इंडियावर पहिल्या टी 20 सामन्यात (india vs england 1st t 20i) 8 विकेट्सने शानदार विजय मिळवला. या विजयासह इंग्लंडने 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 124 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान इंग्लंडने 2 विकेट्सच्या मोबदल्यात 15.3 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. इंग्लंडकडून जेसन रॉयने सर्वाधिक 49 धावांची खेळी केली. जोस बटलरने 28 तर जॉनी बेयरस्टोने नाबाद 26 धावा केल्या. टीम इंडियाकडून युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी 1 विकेट घेतली. चहलने या एकमेव विकेटसह विक्रमाला गवसणी घातली आहे. त्याने यॉर्कर किंग जसप्रीत बुमराहचा (jasprit bumrah) रेकॉर्ड ब्रेक केला आहे. (india vs england 1st t 20i Yuzvendra Chahal became the highest wicket taker for Team India in T20 cricket)
काय आहे विक्रम?
युजवेंद्र चहल टीम इंडियाकडून टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने बुमराहला पछाडत ही कामगिरी केली आहे. चहलने इंग्लंडच्या जॉस बटलरला आऊट करत ही कामगिरी केली. बटलरची ही विकेट चहलच्या टी 20 कारकिर्दीतील 60 वी विकेट ठरली. चहलने 46 व्या टी 20 सामन्यामध्ये ही कामगिरी केली.
Breakthrough for #TeamIndia, courtesy @yuzi_chahal! ??
England lose Jos Buttler. @Paytm #INDvENG
Follow the match ? https://t.co/XYV4KmdfJk pic.twitter.com/2fad6sNaZl
— BCCI (@BCCI) March 12, 2021
टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज
युजवेंद्र चहल – 60 विकेट्स
जसप्रीत बुमराह – 59 विकेट्स
रवीचंद्रन अश्विन – 52 विकेट्स
भुवनेश्वर कुमार – 41 विकेट्स
कुलदीप यादव / रवींद्र जडेजा – 39 विकेट्स
हार्दिक पांड्या – 38 विकेट्स
100 वा आंतरराष्ट्रीय सामना
इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेतील पहिला टी 20 सामना चहलच्या कारकिर्दीतील 100 वा आंतरराष्ट्रीय सामना ठरला. चहल आतापर्यंत टीम इंडियाकडून 46 टी 20 आणि 54 एकदिवसीय सामन्यात खेळला आहे.
Congratulations & best wishes to @yuzi_chahal who will be playing his 1⃣0⃣0⃣th international game today. ??@Paytm #INDvENG #TeamIndia pic.twitter.com/iTSr6cNfC0
— BCCI (@BCCI) March 12, 2021
पहिल्या सामन्याचा धावता आढावा
इंग्लंडने टॉस जिंकून भारताला बॅटिंगसाठी भाग पाडले. टीम इंडियाकडून श्रेयस अय्यर आणि रिषभ पंतने फटकेबाजी केली. श्रेयस अय्यरने सर्वाधिक 67 धावांची खेळी केली. तर पंतने 21 रन्स केल्या. या दोघांच्या खेळीच्या जोरावर भारताने 124 धावांपर्यंत मजल मारली. यामुळे इंग्लंडला विजयासाठी 125 धावांचे माफक आव्हान मिळाले.
इंग्लंडने हे विजयी आव्हान 2 विकेट्सच्या मोबदल्यात 15.3 ओव्हरमध्ये पूर्ण केल. इंग्लंडकडून जेसन रॉयने सर्वाधिक 49 धावांची खेळी केली. जोस बटलरने 28 तर जॉनी बेयरस्टोने नाबाद 26 धावा केल्या. टीम इंडियाकडून युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
संबंधित बातम्या :
Virat Kohli | कर्णधार विराट कोहलीच्या नावावर लाजिरवाणा विक्रम, ‘या’ बाबतीत गांगुलीचा रेकॉर्ड ब्रेक
India vs England 2021, 1st T20 | जेसन रॉय-जॉस बटलरची फटकेबाजी, इंग्लंडचा भारतावर 8 विकेट्सने शानदार विजय
(india vs england 1st t 20i Yuzvendra Chahal became the highest wicket taker for Team India in T20 cricket)