India vs England 1st Test | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड आमनेसामने, कोण ठरणार वरचढ?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (india vs england 1st) यांच्यात आजपासून (5 फेब्रुवारी) चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये (m a chidambaram) पहिली कसोटी मॅच खेळवण्यात येणार आहे.

India  vs England 1st Test  | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड आमनेसामने, कोण ठरणार वरचढ?
विराट कोहली आणि जो रुट
Follow us
| Updated on: Feb 05, 2021 | 8:24 AM

चेन्नई :  टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (India vs England 2021) यांच्यात आजपासून (5 फेब्रुवारी) कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामन्याचे  आयोजन चेन्नईतील एम ए चिदंबरम (M A Chidambaram)  स्टेडियममध्ये करण्यात आले आहे. या सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.  कोरोनानंतर पहिल्यांदाच  टीम इंडिया भारतात खेळणार आहे. इंग्लंड आणि टीम इंडियाने गत कसोटी मालिकेत यजमान संघाचा त्यांच्याच भूमित पराभव केला आहे. या उभय संघाचा विश्वास वाढलेला आहे. यामुळे दोन्ही संघांमध्ये या कसोटी मालिकेसाठी उत्साहाचं वातावरण आहे.  या कसोटी निमित्ताने दोन्ही संघांची जमेची  बाजू  आपण पाहणार आहोत. (india vs england 1st test chennai m a chidambaram stadium match preview)

महत्वाच्या खेळाडूंचे पुनरागमन

टीम इंडिया मायदेशात खेळणार आहे. यामुळे टीम इंडियासाठी हा प्लस पॉइंट आहे. त्यात नियमित कर्णधार विराट कोहली, दुखापतग्रस्त गोलंदाज इशांत शर्मा आणि ओपनर के एल राहुल यांचेही संघात पुनरागमन झाले आहे. हार्दिक पंड्यानेही कमबॅक केलं आहे. त्यामुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये  कोणाला संधी द्यायची, असा प्रश्न कर्णधार कोहली आणि टीम मॅनेजमेंट समोर आहे.

टीम इंडियाचे सर्वच खेळाडू हे ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून चांगल्या फॉर्मात आहेत. त्यात अनुभवी विराट आणि इशांतचे पुनरागमन झाले आहे. यामुळे बॅटिंग आणि बोलिंग साईड आणखी मजबूत झाली आहे. त्यामुळे इंग्लंडसमोर टीम इंडियाचे तगडे आव्हान असणार आहे.

तसेच इंग्लंडचा ऑल राऊंडर  बेन स्टोक्स  आणि वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर यांचंही कमबॅक झालं आहे. स्टोक्स बॅटिंग आणि बोलिंग अशा दोन्ही आघांड्यावर दमदार कामगिरी करतो. तो आयपीएलमध्ये भारतात खेळला आहे. यामुळे त्याला इथल्या खेळपट्ट्यांची जाण आहे. यामुळे स्टोक्सला रोखण्याचे आवाहन भारतीय गोलंदाजांसमोर असणार आहे. तसेच आर्चर हा इंग्लंडच्या मुख्य गोलंदाजांपैकी एक आहे. यामुळे आर्चरपासून सावध पवित्रा घ्यावा लागणार आहे.

जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट बोर्ड

जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट बोर्ड हे इंग्लंडचे महत्वाचे गोलंदाज आहेत. या दोघांनी मिळून कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 1100 पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत. अँडरसनचा हा 5 वा भारत दौरा आहे. यामुळे या दोन्ही गोलंदाजांविरुद्ध खेळण्यासाठी रणनिती आखून खेळणं गरजेचं असणार आहे.

कसोटीनिहाय आकडेवारी

उभयसंघात आतापर्यंत एकूण 122 कसोटी सामने खेळण्यात आले आहेत. यापैकी 47 सामने हे इंग्लंडने जिंकले आहेत. तर टीम इंडियाने 26 मॅचमध्ये इंग्लंडचा पराभव केला आहे. तसेच 49 सामने हे अनिर्णित राहिले आहेत.

चेन्नईमधील आकडेवारी

इंग्लंडच्या 2021 या दौऱ्यातील कसोटी मालिकेतील पहिले 2 सामने चेन्नईमधील एम ए चिदंबरमध्ये खेळण्यात येणार आहेत. या चेन्नईमध्ये टेस्ट सामन्यात दोन्ही संघांचा 9 वेळा आमनासामना झाला आहे. या 9 पैकी 5 सामन्यात भारताने इंग्लंडला पराभूत केलं आहे. तर इंग्लंडने 3 सामन्यात विजय मिळवला आहे. उर्वरित 1 सामना हा अनिर्णित राहिला आहे.

खेळपट्टीचं गणित

नवीन क्यूरेटरने चेन्नईच्या मैदानातील खेळपट्टीची जबाबदारी स्वीकारली आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या वृत्तानुसार, पीचवर थोड्या प्रमाणात गवत आहे. यामुळे सामन्याच्या दिवशी सकाळी खेळपट्टी कशी असेल हे पाहणे मजेदार ठरणार आहे. ही खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल ठरेल असं म्हटलं जात आहे. यामुळे या सामन्यात दोन्ही संघापैकी कोणत्या संघाचे फिरकी गोलंदाज यशस्वी ठरणार याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असणार आहे.

पहिल्या 2 कसोटींसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रिद्धीमान साहा, हार्दिक पंड्या, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्सर पटेल.

टीम इंडियाविरोधातील पहिल्या 2 टेस्टसाठी इंग्लंड टीम : जो रूट (कर्णधार), रोरी बर्न्स, डॉम सिबले, बेन स्टोक्स, जॉस बटलर, जोफ्रा आर्चर, मोईन अली, जॅक क्रॉले, ओली स्टोन, ख्रिस वोक्स, बेन फोक्स, जेम्स एंडरसन, डॉम बेस, डॅन लॉरेन्स, स्टुअर्ट ब्रॉड आणि जॅक लीच.

संबंधित बातम्या :

India vs England 2021 | क्रिकेट चाहत्यांसाठी गुड न्यूज, स्टेडियममध्ये उपस्थित राहून सामना पाहता येणार

Special Story | टीम इंडिया की इंग्लंड, कसोटी मालिकेत वरचढ कोण? पाहा आकडेवारी

(india vs england 1st test chennai m a chidambaram stadium match preview)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.