कोरोनानंतरचा भारतात पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना, भारत विरुद्ध इंग्लंड मॅचकडे साऱ्यांचं लक्ष!

तब्बल एका वर्षानंतर भारतात आंतराराष्ट्रीय क्रिकेटचा सामना होत आहे. | India Vs England 1St test match

कोरोनानंतरचा भारतात पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना, भारत विरुद्ध इंग्लंड मॅचकडे साऱ्यांचं लक्ष!
India Vs ENgland
Follow us
| Updated on: Feb 05, 2021 | 8:00 AM

चेन्नई : तब्बल एका वर्षानंतर भारतात आंतराराष्ट्रीय क्रिकेटचा सामना होत आहे (International Cricket Match) . कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेले एक वर्षभर भारतात आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला नव्हता. अखेर आजपासून चेन्नईत भारत विरुद्ध इंग्लंड (India Vs England) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळवला जाणार आहे. (India Vs England 1St test match M A Chidambaram Stadium Chennai)

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम क्रिकेट स्टेडिअमवर होणाऱ्या सामन्यासाठी प्रेक्षक नसणार आहेत. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत हा सामना खेळवला जाणार आहे. परंतु सरकारच्या नव्या नियमांनुसार भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय आणि तमिळनाडू क्रिकेट असोसिएशनने दुसऱ्या टेस्ट मॅचसाठी स्टेडियमच्या क्षमतेच्या 50 टक्के प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची मुभा दिली आहे.

टीम इंडिया मायदेशात खेळणार आहे. यामुळे टीम इंडियासाठी हा प्लस पॉइंट आहे. त्यात नियमित कर्णधार विराट कोहली, दुखापतग्रस्त गोलंदाज इशांत शर्मा आणि ओपनर के एल राहुल यांचेही संघात पुनरागमन झाले आहे. हार्दिक पंड्यानेही कमबॅक केलं आहे. त्यामुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी द्यायची, असा प्रश्न कर्णधार कोहली आणि टीम मॅनेजमेंट समोर आहे.

टीम इंडियाचे सर्वच खेळाडू हे ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून चांगल्या फॉर्मात आहेत. त्यात अनुभवी विराट आणि इशांतचे पुनरागमन झाले आहे. यामुळे बॅटिंग आणि बोलिंग साईड आणखी मजबूत झाली आहे. त्यामुळे इंग्लंडसमोर टीम इंडियाचे तगडे आव्हान असणार आहे.

तसेच इंग्लंडचा ऑल राऊंडर बेन स्टोक्स आणि वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर यांचंही कमबॅक झालं आहे. स्टोक्स बॅटिंग आणि बोलिंग अशा दोन्ही आघांड्यावर दमदार कामगिरी करतो. तो आयपीएलमध्ये भारतात खेळला आहे. यामुळे त्याला इथल्या खेळपट्ट्यांची जाण आहे. यामुळे स्टोक्सला रोखण्याचे आवाहन भारतीय गोलंदाजांसमोर असणार आहे. तसेच आर्चर हा इंग्लंडच्या मुख्य गोलंदाजांपैकी एक आहे. यामुळे आर्चरपासून सावध पवित्रा घ्यावा लागणार आहे. तसंच जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांच्यापासूनही भारतीय बॅट्समनला धोका आहे. एकहाती सामना फिरवण्याची क्षमता या दोन्ही गोलंदाजांकडे आहेत.

सामना कधी, कुठे आणि केव्हा

आजपासून (5 फेब्रुवारी) कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामन्याचे आयोजन चेन्नईतील एम ए चिदंबरम (M A Chidambaram)  स्टेडियममध्ये करण्यात आले आहे. या सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. कोरोनानंतर पहिल्यांदाच टीम इंडिया भारतात खेळणार आहे. इंग्लंड आणि टीम इंडियाने गत कसोटी मालिकेत यजमान संघाचा त्यांच्याच भूमित पराभव केला आहे. या उभय संघाचा विश्वास वाढलेला आहे. यामुळे दोन्ही संघांमध्ये या कसोटी मालिकेसाठी उत्साहाचं वातावरण आहे.

(India Vs England 1St test match M A Chidambaram Stadium Chennai)

हे ही वाचा :

India vs England 2021 | क्रिकेट चाहत्यांसाठी गुड न्यूज, स्टेडियममध्ये उपस्थित राहून सामना पाहता येणार

Special Story | टीम इंडिया की इंग्लंड, कसोटी मालिकेत वरचढ कोण? पाहा आकडेवारी

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.