India vs England 1st test | रिषभ पंत की रिद्धीमान साहा, पहिल्या कसोटीत विकेटकीपर म्हणून कोण? विराट म्हणाला…

रिषभ पंत (Rishabh Pant) आणि रिद्धीमान साहा या दोघांनी विकेटकीपिंगसाठी प्रबळ दावेदारी सिद्ध केली आहे.

India vs England 1st test | रिषभ पंत की रिद्धीमान साहा, पहिल्या कसोटीत विकेटकीपर म्हणून कोण? विराट म्हणाला...
विराट कोहली आणि टीम इंडिया
Follow us
| Updated on: Feb 04, 2021 | 8:42 PM

चेन्नई : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यात 5 फेब्रुवारीपासून कसोटी मालिकेचा थरार रंगणार आहे. चेन्नईतील एम ए चिदंबरम (M A Chidambaram Stadium) स्टेडियममध्ये हा सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी होणार आहे. दरम्यान सामन्याला आता अवघे काही तास शिल्लक आहेत. टीम इंडियामध्ये तोडीस तोड खेळाडू आहेत. यामुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी द्याचा हा यक्षप्रश्न टीम मॅनेजमेंटसमोर आहे. यामुळे अद्याप प्लेइंग इलेव्हनची घोषणा करण्यात आलेली नाही. दरम्यान या पहिल्या कसोटीत विकेटकीपर म्हणून रिषभ पंत (Rishabh Pant) आणि रिद्धीमान साहा (Riddhiman Saha) यापैकी कोणाला संधी देणार याबाबतचे उत्तर कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) दिलं आहे. (India vs England 1st Test Rishabh Pant will be given a chance as wicketkeeper for the first Test against England says Virat Kohli)

रिषभ पंतला विकेटकीपर म्हणून पसंती

“पंतने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शानदार कामगिरी केली. त्यामुळे त्याने ऑस्ट्रेलिया विरोधातील कामगिरीसह इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत दावेदारी सिद्ध केली. पण रिद्धीमान साहाही प्रबळ दावेदार होता. पण पंतची दमदार फलंदाजी आणि विकेटकीपिंगमुळे त्याला संधी दिली जाईल.  पंत चांगल्या मानसिक स्थितीत आहे. त्यामुळे आम्ही पंतलाच कंटिन्यू करत आहोत. आयपीएलनंतर त्याने फार चांगली कामगिरी केली. त्याने फिटनेसवर फार मेहनत घेतली”, अशा शब्दात विराटने पंतचं कौतुक केलं. विराट कसोटी सामन्याच्या पूर्व संध्येला आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होता.

मयंकला डच्चू तर गिलला पसंती

ऑस्ट्रेलियामध्ये रोहित शर्मा आणि शुबमन गिलने चांगली भागीदारी केली. पण मयंक अग्रवालच्या  कामगिरीकडे दुर्लक्ष करणे सोपे नव्हते. आम्ही रोहित आणि गिल या सलामी जोडीला आणखी काही वेळ देणार आहोत. हे दोघे टीम इंडियाला चांगली सुरुवात देतील, असा आशावाद कोहलीने यावेळेस व्यक्त केला.

कुलदीप यादव की अक्षर पटेल?

“कुलदीपला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत संधी देण्यात आली नाही. कुलदीपने आपल्या गोलंदाजीमध्ये चांगले अपेक्षित बदल केले आहेत. त्याने केवळ स्कील्सबाबतच नाही तर फिटनेसवर मेहनत घेतली आहे. त्याला भविष्यात अधिक संधी मिळतील”, असं विराटने नमूद केलं.

पहिल्या 2 कसोटींसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रिद्धीमान साहा, हार्दिक पंड्या, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्सर पटेल.

टीम इंडियाविरोधातील पहिल्या 2 टेस्टसाठी इंग्लंड टीम : जो रूट (कर्णधार), रोरी बर्न्स, डॉम सिबले, बेन स्टोक्स, जॉस बटलर, जोफ्रा आर्चर, मोईन अली, जॅक क्रॉले, ओली स्टोन, ख्रिस वोक्स, बेन फोक्स, जेम्स एंडरसन, डॉम बेस, डॅन लॉरेन्स, स्टुअर्ट ब्रॉड आणि जॅक लीच.

संबंधित बातम्या :

India vs England 1st Test Preview | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड आमनेसामने, कोण ठरणार वरचढ?

India vs England, 1st Test, Live Streaming : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड कसोटी लाईव्ह स्ट्रीमिंग, कधी, कुठे?

(India vs England 1st Test Rishabh Pant will be given a chance as wicketkeeper for the first Test against England says Virat Kohli)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.