चेन्नई : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात पेटीएम कसोटी मालिकेतील पहिला सामना चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ समाप्त झाला आहे. इंग्लंडने तिसऱ्या सत्रात 4 विकेट्स गमावून 100 धावा केल्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडचा स्कोअर 8 बाद 555 इतका होता. इंग्लंडकडून कर्णधार जो रुटने सर्वाधिक 218 धावांची खेळी केली. (india vs england 2021 1st test day 2 live cricket score updates online in marathi at ma chidambaram stadium chennai) लाईव्ह स्कोअरकार्ड
चेन्नई कसोटीत इंग्लंडने पहिल्या डावात दुसऱ्या दिवसखेर 550 धावांचा टप्पा ओलांडला आहे. इंग्लंडने दुसऱ्या दिवसखेर 8 विकेट्स गमावून 555 धावा केल्या. इंग्लंडकडून तिसर्या विकेटसाठी इंग्लंडने 200 धावा, चौथ्या विकेटसाठी 124 धावा आणि 5 व्या विकेटसाठी 86 धावांची भागीदारी करण्यात आली.
जो रुटने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 100 व्या सामन्यात एकूण द्विशतक झळकावलं. रुटने 377 चेंडूत 19 फोर आणि 2 सिक्ससह 218 धावांची खेली केली. रुट गेल्या काही काळापासून सातत्याने धमाकेदार कामगिरी करत आहेत. रुटच्या या खेळीमुळे इंग्लंडच्या क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
दुसऱ्या दिवसाचा खेळ समाप्त झाला आहे. दुसऱ्या दिवसावरही इंग्लंडंच वर्चस्व राहिलं. इंग्लंडने दिवसखेर 8 विकेट्स गमावून 555 धावा केल्या. इंग्लंडने 263 धावांपासून दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. इंग्लंडने पहिल्य सत्रात 92 तर दुसऱ्या सेशनमध्ये 99 धावा केल्या. तसेच तिसऱ्या आणि शेवटच्या सेशनमध्ये 100 धावा केल्या. इंग्लंडकडून जो रुटने सर्वाधिक धावा केल्या. रुटने 218 धावांची खेळी केली. तर खेळ संपला तेव्हा जॅक लीच आणि डॉम बेस नाबाद खेळत होते. तर टीम इंडियाकडून इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, शाहबाज नदीम आणि रवीचंद्रन अश्विनने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
इशांत शर्माने सलग 2 चेंडूवर इंग्लंडला 7 वा आणि 8 वा धक्का दिला. दरम्यान इशांत शर्माला कसोटीमधील 300 विकेट्सचा टप्पा पूर्ण करण्यासाठी 1 विकेटची आवश्यकता आहे.
इंग्लंडने 500 धावांचा टप्पा ओलांडला आहे. डोमिनिक बेस आणि जो रुट मैदानात खेळत आहेत.
इंग्लंडने सहावी विकेट गमावली आहे. कर्णधार जो रुट द्विशतकी खेळीनंतर आऊट झाला आहे. शाहबाज नदीमने रुटला एलबीडब्लयु आऊट केलं. रुटने 377 चेंडूत 19 फोर आणि 2 सिक्ससह 218 धावांची खेली केली.
इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत परतला आहे. ओली पोपच्या रुपात इंग्लंडला पाचवा धक्का बसला आहे. पोपने 34 धावांची खेळी केली.
तिसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात झाली आहे. इंग्लंडने या सामन्यात मजबूत स्थितीत पोहचली आहे. कर्णधार जो रुटच्या द्विशतकाच्या जोरावर इंग्लंडने 450 पार मजल मारली आहे. तर टीम इंडियाचे गोलंदाजांना विकेटसाठी संघर्ष करावा लागतोय.
इंग्लंडने टी ब्रेक पर्यंत 4 विकेट्स गमावून 454 धावा केल्या आहेत. इंग्लंडने पहिल्या सत्रात एकही विकेट न गमावता 92 धावा केल्या. तर दुसऱ्या सेशनमध्ये 1 विकेट गमावून 99 धावा केल्या. कर्णधार जो रुटने शानदार द्विशतक लगावलं.
जो रुटने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 100 व्या सामन्यात द्विशतक पूर्ण केलं आहे. विशेष म्हणजे सिक्स खेचत त्याने हे द्विशतक पूर्ण केलं आहे. रुट गेल्या काही काळापासून सातत्याने धमाकेदार कामगिरी करत आहेत. रुटच्या या खेळीमुळे इंग्लंडच्या क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
इंग्लंडने 400 धावांचा टप्पा ओलांडला आहे. कर्णधार जो रुट मैदानात घट्ट पाय रोवून खेळत आहे. रुटची द्विशतकाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे.
इंग्लंडने चौथी विकेट गमावली आहे. शाहबाज नदीमने बेन स्टोक्सला चेतेश्वर पुजाराच्या हाती कॅच आऊट केलं. स्टोक्सने 118 चेंडूत 10 फोर आणि 3 सिक्ससह 82 धावा केल्या.
जो रुट आणि बेन स्टोक्स या दोघांनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली आहे. या दोघांनी दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात एकही विकेट न गमावता 92 धावा जोडल्या. दरम्यान इंग्लंड आता 400 धावांच्या दिशेने वाटचाल करत आहे.
दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात झाली आहे. इंग्लंडच्या बेन स्टोक्स आणि कर्णधार जो रुटने पहिल्या सत्रात एकूण 92 धावा केल्या. इंग्लंडने या पहिल्या सत्रावर वर्चस्व राखलं. तर टीम इंडियाच्या गोलंदाज या सत्रात विकेट घेण्यात अपयशी ठरले.
बेन स्टोक्सने सलग 2 चौकार ठोकत दमदार अर्धशतक पूर्ण केलं आहे. त्याने या खेळीमध्ये 80 चेंडूमध्ये 6 चौकार आणि 2 सिक्सर लगावले
रुटने 16 चौकार आणि 1 षटकारासह ही कामगिरी केली. रुटने एक धाव घेत 150 धावा पूर्ण केल्या. यानंतर नदीमच्या याच षटकात स्टोक्सने शानदार सिक्सर खेचला.
जो रुटने शानदार दीडशतकी खेळी केली आहे. त्याच्या या खेळीमुळे इंग्लंड मजबूत स्थितीत पोहचली आहे. रुटच्या कसोटी कारकिर्दीतील 100 वा सामना आहे.
कर्णधार जो रुट आणि बेन स्टोक्स या जोडीने चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली आहे. रुटची द्विशतकी खेळीच्या दिशेने वाटचाल.
इंग्लंडने पहिल्या डावात 300 धावांचा टप्पा ओलांडला आहे. जो रुट आणि बेन स्टोक्स ही जोडी मैदानात सेट झाली आहे. त्यामुळे ही जोडी फोडण्याचे आव्हान टीम इंडियासमोर आहे.
टीम इंडियाच्या गोलंदाजांनी पहिल्या डावातील 96 आणि 97 वी ओव्हर मेडन टाकली आहे. बुमराहने
96 व्या ओव्हरमध्ये रुटला एकही धाव करुन दिली नाही. तर अश्विनने 97 व्या ओव्हरमध्ये बेन स्टोक्सला फिरकी गोलंदाजावीर हात उघडण्याची संधी दिली नाही.
बेन स्टोक्सला जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर संघर्ष करावा लागतोय. पण अश्विनच्या फिरकीवर स्टोक्सने आक्रमक पवित्रा घेतला आहे. स्टोक्सने सामन्याच्या 95 व्या ओव्हरमधील चौथ्या चेंडूवर जोरदार सिक्स खेचला
इंग्लंडचा कर्णधार जो रुटने दुसऱ्या दिवशी खेळाला झोकात सुरुवात केली आहे. रुट दीडशतकी खेळीच्या दिशेने वाटचाल करत आहे.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पहिल्या कसोटीचा आजचा दुसरा दिवस आहे. इंग्लंड 263 धावांपासून पुढे खेळायला सुरुवात करेल. तर टीम इंडियाच्या गोलंदाजांचा इंग्लंडला गुंडाळण्याचा प्रयत्न असणार आहे.