India vs England 1st Test, 4th Day Highlights | चौथ्या दिवसखेर टीम इंडियाच्या 1 बाद 39 धावा, पाचव्या दिवशी विजयासाठी आणखी 381 धावांची आवश्यकता
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (India vs England 1st Test) यांच्यात चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये पेटीएम टेस्ट सीरिजमधील पहिला सामना खेळवण्यात येत आहे.
चेन्नई : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (India vs England 1st Test) यांच्यात चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये पहिला कसोटी सामना खेळण्यात येत आहे. या सामन्यातील आजचा (8 फेब्रुवारी) चौथा दिवसाचा खेळ संपला आहे. खेळ संपला तेव्हा शुबमन गिल आणि चेतेश्वर पुजारा मैदानात खेळत होते. इंग्लंडने टीम इंडियाला विजयासाठी 420 धावांचे आव्हान दिले आहे. इंडियाने दिवसखेर 1 विकेट गमावून 39 धावा केल्या आहेत. यामुळे पाचव्या आणि शेवटच्या दिवशी टीम इंडियाला विजयासाठी 90 ओव्हरमध्ये आणखी 381 धावांचे आव्हान असणार आहे. तर इंग्लंडलाही जिंकण्यासाठी 9 विकेट्स घ्याव्या लागणार आहेत. त्यामुळे पाचव्या दिवशी नक्की काय निकाल लागणार याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असणार आहे. (india vs england 2021 1st test day 4 live cricket score updates online in marathi at ma chidambaram stadium chennai) लाईव्ह स्कोअरकार्ड
Key Events
टीम इंडियाचा पहिला डाव 337 धावांवर आटोपला आहे. यामुळे इंग्लंडला दुसऱ्या डावात 241 धावांची मोठी आघाडी मिळाली आहे. टीम इंडियाकडून रिषभ पंतने सर्वाधिक 91 धावांची खेळी केली. चेतेश्वर पुजाराने 73 धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदरने नाबाद 85 धावा केल्या.
अश्विनने दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना इंग्लंडच्या 6 फलंदाजांना आऊट केलं. कसोटीमध्ये अश्विनने 28 वेळा 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.
LIVE Cricket Score & Updates
-
चौथ्या दिवसाचा खेळ समाप्त
चेन्नई कसोटीतील चौथ्या दिवसाचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी इंग्लंडने भारतासमोर विजयासाठी 420 धावांचे विक्रमी लक्ष्य ठेवले आहे. याचा पाठलाग करताना भारताने दुसर्या डावात 1 विकेट गमावून 39 धावा केल्या आहेत. त्यामुळे टीम इंडियाला विजयासाठी पाचव्या दिवशी आणखी 381 धावांची गरज असणार आहे.
-
टीम इंडियाला पहिला धक्का
दुसऱ्या डावात टीम इंडियाला पहिला धक्का बसला आहे. रोहित शर्माने पुन्हा एकदा निराशा केली आहे. रोहितला जॅक लीचने 12 धावांवर आऊट केलं.
-
-
टीम इंडियाच्या बॅटिंगला सुरुवात
टीम इंडियाच्या दुसऱ्या डावातील बॅटिंगला सुरुवात झाली आहे. रोहित शर्मा आणि शुबमन गिल ही सलामी जोडी मैदानात खेळत आहेत. इंग्लंडने विजयासाठी 420 धावांचे तगडे आव्हान दिले आहे.
-
इंग्लंडचा दुसरा डाव 178 धावांवर आटोपला
टीम इंडियाच्या गोलंजदाजांनी इंग्लंडला दुसऱ्या डावात 178 धावांवर गुंडाळले आहे. फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. इंग्लंडकडे दुसऱ्या डावात 241 धावांची आघाडी होती. यामुळे टीम इंडियाला विजयासाठी 420 धावांचे आव्हान मिळाले आहे.
-
इंग्लंडला 9 वा धक्का
इंग्लंडने नववी विकेट गमावली आहे. अश्विनने जोफ्रा आर्चरला 5 धावांवर आऊट केलं. यासह अश्विनने इंग्लंडच्या 5 फलंदाजांना बाद केलं.
-
-
इंग्लंडला 8 वा धक्का
इंग्लंडला 8 वा झटका बसला आहे. अश्विनने डोमिनिक बेसला 25 धावांवर एलबीडबल्यू आऊट केलं आहे. -
इंग्लंडला 7 वा धक्का
इंग्लंडने 7 वी विकेट गमावली आहे. शाहबाज नदीमच्या गोलंदाजीवर रिषभ पंतने जोस बटलरला स्टपिंग आऊट केलं आहे. बटलरने 24 धावा केल्या.
-
इंग्लंडला सहावा धक्का
इंग्लंडने सहावी विकेट गमावली आहे. शाहबाज नदीमने ओली पोपला 28 धावांवर बाद केलं.
-
टी ब्रेक
इंग्लंडने टी ब्रेकपपर्यंत 5 विकेट्स गमावून 119 धावा केल्या आहेत. इंग्लंडने एकूण 360 धावांची आघाडी घेतली आहे. ओली पोप आणि जोस बटलर मैदानात नाबाद खेळत आहेत.
-
इंग्लंडकडे 350 पेक्षा अधिक धावांचा आघाडी
इंग्लंडने दुसऱ्या डावात 350 पेक्षा अधिक धावांची आघाडी घेतली आहे. ओली पोप आणि जोस बटलर मैदानात खेळत आहेत.
-
इंग्लंडला मोठा धक्का
इंग्लंडला पाचवा झटका बसला आहे. यॉर्कर किंग जसप्रीत बुमराहने कर्णधार जो रुटला एलबीडबल्यू आऊट केलं. रुटने 32 चेंडूत 7 चौकारांसह 40 धावांची खेळी केली.
-
इंग्लंडला चौथा झटका
अश्विनने आक्रमक फलंदाज बेन स्टोक्सला रिषभ पंतच्या हाती कॅच आऊट केलं आहे. स्टोक्सने 7 धावा केल्या. इंग्लंडकडे 300 पेक्षा अधिक धावांची आघाडी आहे.
-
इंग्लंडला तिसरा झटका
इंग्लंडने तिसरी विकेटने गमावली आहे. इशांत शर्माने डॅनियल लॉरेन्सला एलबीडबल्यू आऊट केलं आहे. लॉरेन्सने 47 चेंडूत 1 चौकारसह 18 धावा केल्या.
-
इंग्लंडच्या 50 धावा पूर्ण
इंग्लंडच्या दुसऱ्या डावातील 50 धावा पूर्ण झाल्या आहेत. 2 विकेट्स गमावून इंग्लंडने या 50 धावा केल्या आहेत.
-
इंग्लंडला दुसरा धक्का
अश्विनने डोमिनिक सिबलेला चेतेश्वर पुजाराच्या हाती कॅच आऊट केलं. सिबलेने 37 बोलमध्ये 16 धावा केल्या.
-
दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात
लंचनंतर दुसऱ्या सत्रातील खेळाल सुरुवात झाली आहे. डॉमिनिक सिबले आणि डॅनियल लॉरेन्स मैदानात खेळत आहेत. इंग्लंडने 250 पेक्षा अधिक धावांची आघाडी घेतली आहे.
-
इंग्लंडला पहिला धक्का
इंग्लंडच्या दुसऱ्या डावातील फलंदाजीला सुरुवात झाली आहे. अश्विनने या दुसऱ्या डावातील पहिल्याच चेंडूवर इंग्लंडला धक्का दिला आहे. अश्विनने रोरी बर्न्सला अजिंक्य रहाणेच्या कॅच आऊट केलं आहे. दरम्यान इंग्लंडला दुसऱ्या डावात 241 धावांची मोठी आघाडी मिळाली आहे.
-
टीम इंडिया पहिल्या डावात 337 धावांवर ऑलआऊट
टीम इंडियाचा पहिला डाव 337 धावांवर आटोपला आहे. यामुळे इंग्लंडला दुसऱ्या डावात 241 धावांची मोठी आघाडी मिळाली आहे. टीम इंडियाकडून रिषभ पंतने सर्वाधिक 91 धावांची खेळी केली. चेतेश्वर पुजाराने 73 धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदरने नाबाद 85 धावा केल्या.
-
टीम इंडियावर फॉलोऑनची टांगती तलवार
टीम इंडियाने चौथ्या दिवशी झटपट 3 विकेट्स गमावल्या. त्यामुळे टीम इंडियाची 323-9 अशी स्थिती झाली आहे. टीम इंडियावर फॉलोऑनचं संकट घोंगावतंय. हे संकट टाळण्यासाठी टीम इंडियाला 379 धावा करणं बंधनकारक आहे.
-
इशांत शर्मा आऊट, भारताला नववा झटका
भारताला नववा धक्का बसला आहे. इशांत शर्मा 4 धावा करुन तंबूत परतला आहे.
-
टीम इंडियाला आठवा धक्का
शाहबाज नदीमला भोपळाही फोडता आला नाही. नदीम बाद झाल्याने टीम इंडियाचा स्कोअर 8 बाद 312 असा झाला आहे.
-
टीम इंडियाला सातवा धक्का
टीम इंडियाने सातवी विकेट गमावली आहे. रविचंद्रन अश्विन 31 धावांवर बाद झाला.
-
भारताच्या 300 धावा पूर्ण
टीम इंडियाने 300 धावांचा टप्पा ओलांडला आहे. भारत अजूनही 278 धावांनी पिछाडीवर आहे.
-
वॉशिंग्टनचे ‘सुंदर’ अर्धशतक
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत वॉशिंग्टन सुंदरने शानदार अर्धशतक झळकावलं आहे. हे अर्धशतक त्याच्या कसोटी कारकिर्दीतील दुसरं अर्धशतक ठरलं आहे.
-
सातव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी
रवीचंद्रन अश्विन आणि वॉशिंंग्टन सुंदर या जोडीने सातव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली आहे.
-
पहिल्याच ओव्हरमध्ये ‘सुंदर’ चौकार
इंग्लंडने चेन्नई कसोटीच्या चौथ्या दिवशी फिरकीसह गोलंदाजीला सुरुवात कली. डॉम बेसने ही चौथ्या दिवसातील पहिली ओव्हर टाकली. या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर वॉशिंग्टन सुंदरने एक शानदार चौकार लगावला.
-
चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात
चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. रवीचंद्रन अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदरने 257-6 या धावसंख्येपासून पुढे खेळायला सुरुवात केली आहे. या जोडीकडून मोठ्या भागीदारीरी आशा असणार आहे.
-
पहिल्या कसोटीतील आजचा चौथा दिवस
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या टेस्टमधील आजचा चौथा दिवस आहे. भारताने तिसऱ्या दिवसखेर 6 विकेट्स गमावून 257 धावा केल्या. त्यामुळे टीम इंडिया अजूनही 321 धावांनी पिछाडीवर आहे. रवीचंद्रन अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदर ही जोडी नाबाद आहे. या जोडीकडून टीम इंडियाला मोठ्या भागीदारीची अपेक्षा आहे.
Published On - Feb 08,2021 5:25 PM