India vs England, 2nd Test | दमदार शतक, शानदार रेकॉर्ड, अश्विनची विक्रमाला गवसणी
अश्विनने (R Ashwin) दुसऱ्या डावात फलंदाजी करताना 134 चेंडूत धमाकेदार शतक पूर्ण केलं.
चेन्नई : टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवीचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावात धमाकेदार शतक लगावलं. अश्विनने 134 चेंडूमध्ये हे शतक लगावलं. अश्विनच्या कसोटी कारकिर्दीतील हे 5 वं शतक ठरलं. अश्विनने एकूण 148 चेंडूत 1 सिक्स आणि 14 फोरच्या मदतीने खणखणीत 106 धावा केल्या. या खेळीसह अश्विनने टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा रेकॉर्ड ब्रेक केला. अश्विनने धोनीचा 8 व्या क्रमांकावर खेळताना सर्वाधिक शतक लगावण्याचा रेकॉर्ड मोडीत काढला. अश्विनने आतापर्यंत तिसऱ्यांदा 8 व्या क्रमांकावर खेळताना शतक लगावण्याची कामगिरी केली आहे. तर धोनीने 2 वेळा 8 व्या स्थानावर येत सेंच्युरी केली होती. (india vs england 2021 2nd test day 3 r ashwin makes many record with century)
8 व्या क्रमांकावर सर्वाधिक शतक लगावणारे भारतीय
आर अश्विन – 3
एमएस धोनी – 2
हरभजन सिंह – 2
कपिल देव – 2
तसेच अश्विन 8 व्या क्रमांकावर बॅटिंग करताना सर्वाधिक शतक लगावणारा दुसराच फलंदाज आहे. याबाबतीत न्यूझीलंडचा माजी कर्णधार डेनियल व्हिटोरी पहिल्या क्रमांकावर आहे. व्हिटोरीने 8 व्या क्रमांकावर खेळताना 4 वेळा शतक लगावलं आहे.
8 व्या क्रमांकावर सर्वाधिक शतकी खेळी करणारा फलंदाज
डेनियल व्हिटोरी – 4
आर अश्विन – 3
कामरान अकमल – 3
तिसऱ्यांदा 5 विकेट्स आणि शतक
दरम्यान अश्विनने या सामन्यात शतक आणि बोलिंग करताना 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. अश्विनची अशी कामगिरी करण्याची ही तिसरी वेळ ठरली. अशी अफलातून खेळी करणारा अश्विन दुसराच खेळाडू ठरला आहे. याबाबतीत इयन बॉथम अव्वल क्रमांकावर आहेत. बॉथम यांनी 5 वेळा वेगवेगळ्या सामन्यात शतक आणि 5 विकेट्स घेतल्या आहेत.
कसोटीत शतक आणि 5 विकेट्स घेणारे खेळाडू
इयान बॉथम – 5
आर अश्विन-3
जॅक कॅलिस-2
मुश्ताक मोहम्मद-2
शाकिब अल हसन-2
गॅरी सोबर्स-2
संबंधित बातम्या :
India vs England 2nd Test 3rd day | अश्विनची होम पीचवर धमाकेदार शतकी खेळी
अवघ्या 5 तासाच उरकला कसोटी सामना, गोलंदाजाची कमाल, विश्व विक्रमाला गवसणी
(india vs england 2021 2nd test day 3 r ashwin makes many record with century)