India vs England 2nd Test 4th Day | फिरकीसमोर इंग्लंडचं लोटांगण, दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा दणदणीत विजय, मालिकेत 1-1 ने बरोबरीत

| Updated on: Feb 16, 2021 | 1:45 PM

टीम इंडियाने दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडवर 317 धावांनी शानदार विजय मिळवला आहे.

India vs England 2nd Test 4th Day | फिरकीसमोर इंग्लंडचं लोटांगण, दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा दणदणीत विजय, मालिकेत 1-1 ने  बरोबरीत
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीचा आजचा (5 मार्च) दुसरा दिवस आहे.

चेन्नई : टीम इंडियाने इंग्लंडवर दुसऱ्या कसोटी (india vs england 2021 2nd test day 4)  सामन्यात 317 धावांनी शानदार विजय मिळवला आहे. भारताने इंग्लंडला विजयासाठी 482 धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम इंडियाच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 164 धावांवर आटोपला. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात मोईल अलीने सर्वाधिक 43 धावा केल्या. तर टीम इंडियाकडून अक्षर पटेलने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर लोकल बॉय आर अश्विनने 3 तर कुलदीप यादवने 2 विकेट्स मिळवल्या. या विजयासह टीम इंडियाने 4 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी केली आहे. (india vs england 2021 2nd test day 4 live cricket score updates online in marathi at ma chidambaram stadium chennai) लाईव्ह स्कोअरकार्ड

Key Events

अक्षर पटेलचं अविस्मरणीय पदार्पण

अक्षर पटेलचं अविस्मरणीय पदार्पण ठरलं. पटेलने पहिल्या डावात 2 विकेट्स घेतल्या. तर दुसऱ्या डावात शानदार गोलंदाजी करत 5 विकेट्स घेतल्या. अक्षर पदार्पणात 5 विकेट्स घेणारा 9 वा भारतीय ठरला.

टीम इंडियाचा 317 धावांनी शानदार विजय

टीम इंडियाने इंग्लंडवर दुसऱ्या कसोटीत 317 धावांनी शानदार विजय मिळवला. भारताने इंग्लंडला विजयासाठी 482 धावांचे आव्हान दिले होते. टीम इंडियाच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 164 धावांवर आटोपला. या विजयासह टीम इंडियाने 4 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी केली आहे.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 16 Feb 2021 01:44 PM (IST)

    अश्विन ठरला मॅन ऑफ द मॅच

    अष्टपैलू कामगिरी करणारा अश्विनला मॅन ऑफ द मॅच पुरस्कारने गौरवण्यात आलं.

  • 16 Feb 2021 12:43 PM (IST)

    टीम इंडियाचा इंग्लंडवर शानदार विजय

    टीम इंडियाने दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने 4 सामन्यांच्या मालिकेत  1-1 ने बरोबरी केली आहे. टीम  इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 482 धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम इंडियाच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 164 धावांवर आटोपला. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात कर्णधार जो रुटने सर्वाधिक 33 धावा केल्या. तर टीम इंडियाकडून अक्षर पटेलने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर लोकल बॉय आर अश्विनने 3 तर कुलदीप यादवने 2 विकेट्स मिळवल्या.

  • 16 Feb 2021 12:15 PM (IST)

    इंग्लंडला आठवा धक्का

    इंग्लंडला आठवा धक्का बसला आहे. अक्षर पटेलने कॅप्टन जो रुटला आऊट केलं आहे. यामुळे आता टीम इंडियाला विजयासाठी अवघ्या 2 विकेट्सची आवश्यकता आहे.

  • 16 Feb 2021 11:46 AM (IST)

    पहिल्या सत्रातील खेळ संपला, भारताला विजयासाठी 3 विकेट्सची आवश्यकता

    दुसर्‍या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवसातील पहिल्या सत्रातील खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी लंचपर्यंत इंग्लंडने 116 धावा देऊन 7 विकेट्स गमावले आहेत. चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात इंग्लंडने 4 विकेट्स गमावले.  इंग्लंडवर विजय मिळवण्यासाठी भारताला आणखी 3 बळींची आवश्यकता आहे.

  • 16 Feb 2021 11:22 AM (IST)

    जो रुटला जीवनदान

    इंग्लंडंचा कर्णधार जो रुटला जीवनदान मिळालं आहे. सामन्याच्या 47 व्या ओव्हरमधील तिसऱ्या चेंडूवर मोहम्मद सिराजने रुटचा सोपा कॅच सोडला.

  • 16 Feb 2021 11:19 AM (IST)

    इंग्लंडला सहावा धक्का

    अक्षर पटेलने इंग्लंडला सहावा धक्का दिला आहे. अक्षरने ओली पोपला आऊट केलं आहे. यामुळे आता टीम इंडियाला विजयासाठी अवघ्या 4 विकेट्सची आवश्यकता आहे. दरम्यान बेन फोक्स आणि जो रुट मैदानात खेळत आहेत.

  • 16 Feb 2021 10:50 AM (IST)

    बेन स्टोक्स आऊट, इंग्लंडचा अर्ध तंबूत

    इंग्लंडने पाचवी विकेट गमावली आहे. अश्विनने बेन स्टोक्सला आऊट केलं आहे. स्टोक्सला आऊट करण्याची अश्विनची ही 10 वी वेळ ठरली.

  • 16 Feb 2021 10:16 AM (IST)

    टीम इंडियाला मोठा धक्का

    टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिल चौथ्या दिवशी क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला नाही. गिलला दुसर्‍या कसोटीच्या तिसर्‍या दिवशी क्षेत्ररक्षण करताना डाव्या हाताला दुखापत झाली. त्याचं स्कॅन करण्यात आलं आहे. सध्या तो बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

    बीसीसीआयने केलेलं ट्विट

  • 16 Feb 2021 09:58 AM (IST)

    इंग्लंडला चौथा धक्का

    अश्विनने चौथ्या दिवसातील सामन्यातील 26 व्या ओव्हरमधील पहिल्या चेंडूवर चौथा धक्का दिला आहे. अश्विनच्या बोलिंगवर विकेटकीपर रिषभ पंतने डेनियल लॉरेन्स स्टंपिग आऊट केलं. लॉरेन्सने 26 धावा केल्या. लॉरेन्स बाद झाल्याने इंग्लंडची 66-4 अशी स्थिती झाली आहे.

  • 16 Feb 2021 09:54 AM (IST)

    इंग्लंडच्या 25 ओव्हरपर्यंत 3 बाद 66 धावा

    इंग्लंडने 25 ओव्हरपर्यंत 3 विकेट्स गमावून 66 धावा केल्या आहेत. डॅनियल लॉरेन्स आणि कॅप्टन जो रुट खेळत आहेत.
  • 16 Feb 2021 09:34 AM (IST)

    चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात

    टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीतील चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. इंग्लंडकडून डॅनियल लॉरेन्स आणि कॅप्टन जो रुट खेळत आहेत.

  • 16 Feb 2021 08:37 AM (IST)

    दुसऱ्या कसोटीतील चौथा दिवस

    दुसऱ्या कसोटीतील आजचा चौथा दिवस आहे. इंग्लंड चौथ्या दिवसाच्या खेळाला 53-3 धावसंख्येवरुन सुरुवात करणार आहेत. इंग्लंडला विजयासाठी आणखी 429 धावांची आवश्यकता आहे. तर टीम इंडियाला अवघ्या 7 विकेट्सची गरज आहे.

Published On - Feb 16,2021 1:44 PM

Follow us
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.