India vs England 4th Test | चौथ्या कसोटीतून ‘यॉर्कर किंग’ जसप्रीत बुमराहची तडकाफडकी माघार
जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) या निर्णयाची माहिती बीसीसीआयने ट्विटद्वारे दिली आहे.
अहमदाबाद : टीम इंडियाचा (Team India) यॉर्कर किंग जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीतून माघार घेतली आहे. बुमराहने वैयक्तिक कारणामुळे चौथ्या टेस्टमधून माघार घेतली आहे. याबाबतची माहिती बीसीसीआयने (Bcci) ट्विट करत दिली आहे. वैयक्तिक कारणांमुळे बुमराहने सुट्टीची मागणी केली होती, यामुळे त्याला रजा मंजूर करण्यात आली आहे, असं बीसीसीआयने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. त्यामुळे आता बुमराह चौथ्या कसोटीत खेळताना दिसणार नाही. दरम्यान बुमराहला इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीमध्येही विश्रांती देण्यात आली होती. दरम्यान चौथ्या कसोटीत बुमराहच्या जागी कोणत्याच खेळाडूला संघात संधी देण्यात आलेले नाही. (india vs england 2021 Jasprit Bumrah dropped out due to personal reasons from 4th Test match against England)
NEWS – Jasprit Bumrah released from India’s squad
Jasprit Bumrah made a request to BCCI to be released from India’s squad ahead of the fourth Test owing to personal reasons.
More details – https://t.co/w2wlfodmq8 #INDvENG pic.twitter.com/mREocEuCGa
— BCCI (@BCCI) February 27, 2021
जसप्रीत बुमराह टीम इंडियाच्या गोलंदाजीचा मुख्य कणा आहे. बुमराहने अनेकदा टीम इंडियासाठी निर्णायक भूमिका बजावली आहे. आपल्या भेदक माऱ्याच्या जोरावर बुमराहने भारताला एकहाती विजय मिळवून दिला आहे. बुमराहला इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत फार यश आले नाही. मात्र तरीही त्याने पाहुण्यांवर नियंत्रण मिळवलं होतं.
चौथा कसोटी सामना 4 मार्चपासून
या मालिकेतील चौथा आणि अखेरचा कसोटी सामना 4 ते 8 मार्चदरम्यान खेळवण्यात येणार आहे. हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. हा सामना जिंकून इंग्लंडचा एकतर्फी मालिका पराभव करण्याचा मानस टीम इंडियाचा असेल.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप
टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात पोहचण्यासाठी इंग्लंड विरुद्धच्या चौथा कसोटी सामना जिंकावा किंवा अनिर्णित राखावा लागणार आहे. त्यामुळे टीम इंडिया या चौथ्या कसोटीत कशाप्रकारे कामगिरी करते, याकडे सर्व क्रिकेट विश्वांच लक्ष असणार आहे. या कसोटी मालिकेनंतर 5 सामन्यांची टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे. हे पाचही सामने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियवर खेळण्यात येणार आहे.
चौथ्या कसोटीसाठी टीम इंडिया
विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (व्हीसी), केएल राहुल, हार्दिक पंड्या, रिषभ पंत (विकेटकीपर), रिद्धीमान साहा (विकेटकीपर), आर अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल , वॉशिंग्टन सुंदर, ईशांत शर्मा आणि मोहम्मद सिराज.
संबंधित बातम्या :
India vs England | इंग्लंडला पराभवानंतर मोठा धक्का, स्टार खेळाडू मायदेशी परतणार
Suryakumar Yadav | मी खूप काळापासून विराटच्या नेतृत्वात खेळण्याचे स्वप्न पाहत होतो : सूर्यकुमार यादव
(india vs england 2021 Jasprit Bumrah dropped out due to personal reasons from 4th Test match against England)