India vs England 2021 | विराटच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहणं ही माझी जबाबदारी : अजिंक्य रहाणे

अजिंक्य रहाणे (ajinkya rahane) व्हिडीओ कॉनफरन्सिंगद्वारे झालेल्या पत्रकार परिषदेला उपस्थित होता. यावेळेस तो बोलत होता.

India vs England 2021 | विराटच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहणं ही माझी जबाबदारी : अजिंक्य रहाणे
यानंतर नाव येत भारतीय कसोटी संघाचा सध्याचा उपकर्णधार मराठमोळ्या अजिंक्य रहाणेच. रहाणेने जेव्हा जेव्हा शतक ठोकलंय भारतीय संघाने पराभव पाहिलाच नाही. त्याने 12 कसोटी सामन्यांत शतक लगावले असून सर्व सामने टीम इंडिया जिंकली आहे.
Follow us
| Updated on: Feb 04, 2021 | 4:20 PM

चेन्नई : “उपकर्णधार म्हणून विराट कोहलीच्या (Virat Kohli) पाठीशी भक्कमपणे उभं राहणं ही माझी जबाबदारी आहे. माझं काम आता आणखी सोपं झालं आहे. जेव्हा विराट माझ्यासोबत चर्चा करेल, तेव्हा मी नक्कीच सहकार्य करेन. विराट ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत कौटुंबिक कारणांमुळे भारतात परतला होता. यामुळे मला कर्णधारपदाची जबाबदारी मिळाली. ऑस्ट्रेलियामध्ये मिळवलेला विजय हा भूतकाळ होता. आता आपण वर्तमानात आहोत. इंग्लंडने श्रीलंकेवर कसोटी मालिकेत विजय मिळवला. यासाठी आम्ही त्यांचा सम्मान करतो.   इंग्लंड विरुद्ध आम्हाला उच्च दर्जाचा खेळ करायचा आहे. तसेच आम्ही कोणालाच गृहीत धरणार नाहीत”, असं टीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane)  म्हणाला. रहाणे व्हिडीओ कॉनफरन्सिंगद्वारे झालेल्या पत्रकार परिषदेला उपस्थित होता. यावेळेस तो बोलत होता. (India vs England 2021 My responsibility is to stand with captain Virat kohli said ajinkya rahane)

न्यूझीलंडचं कौतुक

“न्यूझीलंडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या (World Test Championship) अंतिम सामन्यात धडक मारली आहे. अंतिम फेरीत पोहचण्यासाठी ते प्रबळ दावेदार होते. त्यांनी फार चांगली कामगिरी केली. तर दुसऱ्या संघ अजून ठरलेला नाही. यासाठी टीम इंडिया स्पर्धेत आहे. पण या स्पर्धेला अजून खूप महिने बाकी आहेत. आमचं लक्ष सध्या खेळण्यात येणाऱ्या मालिकेवर असणार आहे. आम्ही एका वेळी एकच सामन्याकडे लक्ष देणार आहोत”, असंही रहाणेने नमूद केलं.

फिरकीपटूंसाठी खेळपट्टी अनुकूल

चेन्नईची खेळपट्टी ही फिरकीपटूंसाठी अनुकूल ठरेल, म्हणजेच त्यांना विकेट्स घेण्यासाठी मदतशीर ठरेल, असा अंदाज रहाणेने व्यक्त केला. टीम इंडियाकडे अक्षर पटेल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि अनुभवी रवीचंद्रन अश्विनसारखे फिरकीपटू आहेत. यामुळे ही चौकडी कशी कामगिरी करते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

अक्षर पटेलच्या पदार्पणाबाबत काय म्हणाला?

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी फिरकीपटू अक्षर पटेलला संधी देण्यात आली आहे. त्याला पदार्पणाची संधी देण्यात येईल का असा प्रश्न रहाणेला विचारण्यात आला. यावर रहाणे म्हणाला की, ” याबाबतचा निर्णय ठरवून घेतला जाईल. भारतातील खेळपट्ट्यांवर नेहमीच फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल राहिल्या आहेत. यामुळे वेट अॅन्ड वॉचची भूमिका घेऊ.

दरम्यान 5 फेब्रुवारीपासून टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेत एकूण 4 सामने खेळण्यात येणार आहेत. यातील पहिले 2 सामने हे चेन्नईत तर उर्वरित सामन्यांचं आयोजन हे अहमदाबादमध्ये केलं आहे.

कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिली कसोटी | एम ए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई | 5-9 फेब्रुवारी | सकाळी 9 वाजून 30 मिनिटं.

दूसरी कसोटी | एम ए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई | 13-17 फेब्रुवारी | सकाळी 9 वाजून 30 मिनिटं.

तिसरी कसोटी | मोटेरा स्टेडियम, अहमदाबाद | 24 ते 28 फेब्रुवारी | दुपारी 2 वाजून 30 मिनिटं.

चौथी कसोटी | मोटेरा स्टेडियम, अहमदाबाद | 4 ते 8 मार्च | सकाळी 9 वाजून 30 मिनिटं.

पहिल्या 2 कसोटींसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रिद्धीमान साहा, हार्दिक पंड्या, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्सर पटेल.

पहिल्या 2 टेस्टसाठी इंग्लंड टीम : जो रूट (कर्णधार), रोरी बर्न्स, डॉम सिबले, बेन स्टोक्स, जॉस बटलर, जोफ्रा आर्चर, मोईन अली, जॅक क्रॉले, ओली स्टोन, ख्रिस वोक्स, बेन फोक्स, जेम्स एंडरसन, डॉम बेस, डॅन लॉरेन्स, स्टुअर्ट ब्रॉड आणि जॅक लीच.

संबंधित बातम्या :

India vs England 2021 | विराटने क्रिकेट सुरु ही केलं नव्हतं तेव्हापासून करतोय बोलिंग, जेम्स अँडरसन टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरणार?

India vs England 2021 | कसोटी, टी 20 आणि एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक, दोन्ही संघ, Full schedule

India vs England | विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराला सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी

(India vs England 2021 My responsibility is to stand with captain Virat kohli said ajinkya rahane)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.