India vs England | विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराला सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 फेब्रुवारीपासून कसोटी मालिका खेळण्यात येणार आहे.

India vs England |  विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराला सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी
चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली
Follow us
| Updated on: Feb 02, 2021 | 8:19 PM

चेन्नई : ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमित चितपट केल्यानंतर टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध खेळण्यासाठी (India vs England 2021) सज्ज आहे. इंग्लंडच्या या भारत दौऱ्याची सुरुवात कसोटी मालिकेपासून होणार आहे. या कसोटी मालिकेतून टीम इंडियाचा नियमित कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) पुनरागमन केलं आहे. या मालिकेत विराट आणि टीम इंडियाचा तारणहार चेतेश्वर पुजाराला (Cheteshwar Pujara) मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे. (india vs england 2021 virat kohli and cheteshwar pujara have chance to break sachin tendulkar record)

काय आहे विक्रम?

इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेत मायदेशात टीम इंडियाकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिनच्या नावे आहे. हा विक्रम मोडीत काढण्यासाठी विराटला 117 तर पुजाराला 121 धावांची आवश्यकता आहे. सचिनने इंग्लंड विरुद्ध भारतात 15 कसोटींमध्ये 3 शतक आणि 5 अर्धशतकांसह 960 धावा केल्या आहेत. सचिनने इंग्लंडविरुद्धचा अखेरचा सामना 2012 मध्ये खेळला होता.

तर विराटने इंग्लंड विरुद्ध मायदेशात एकूण 9 सामन्यांमध्ये 843 धावा केल्या आहेत. तर पुजारानेही 9 कसोटींमध्ये 839 धावा चोपल्या आहेत. यामुळे हे दोन्ही फलंदाज इंग्लंड विरुद्ध सचिनचा रेकॉर्ड ब्रेक करणार का, याकडे क्रिकेट चाहत्याचं लक्ष असणार आहे.

इंग्लंड विरुद्ध भारतात सर्वाधिक शतक

इंग्लंड विरुद्ध भारतीय भूमित कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक शतक लगावण्याचा मान पुजाराकडे आहे. पुजाराने इंग्लंड विरुद्ध 4 वेळा शतक ठोकलं आहे. तर विराटने 3 शतक झळकावले आहेत. त्यामुळे विराटकडे पुजाराचा शतकांचा विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे.

5 फेब्रुवारीपासून कसोटी मालिका

उभय संघातील कसोटी मालिकेला 5 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. यामध्ये एकूण 4 सामने खेळण्यात येणार आहेत. पहिले 2 सामने हे चेन्नईत तर उर्वरित 2 सामन्याचं आयोजन हे अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.

कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिला सामना-चेन्नई-5-9 फेब्रुवारी दूसरा सामना – चेन्नई-13ते17 फेब्रुवारी तिसरा सामना-अहमदाबाद- 24 ते 28 फेब्रुवारी चौथा सामना-अहमदाबाद-4 ते 8 मार्च

पहिल्या 2 कसोटींसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रिद्धीमान साहा, हार्दिक पंड्या, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्सर पटेल.

पहिल्या 2 टेस्टसाठी इंग्लंड टीम : जो रूट (कर्णधार), रोरी बर्न्स, डॉम सिबले, बेन स्टोक्स, जॉस बटलर, जोफ्रा आर्चर, मोईन अली, जॅक क्रॉले, ओली स्टोन, ख्रिस वोक्स, बेन फोक्स, जेम्स एंडरसन, डॉम बेस, डॅन लॉरेन्स, स्टुअर्ट ब्रॉड आणि जॅक लीच.

संबंधित बातम्या :

India vs England 2021 | कॅप्टन कोहलीच्या ‘या’ कारनाम्यांमुळे इंग्लंडच्या गोटात दहशत

India vs England | टीम इंडियाचा नेट्समध्ये जोरदार सराव, इंग्लंड विरुद्ध भिडण्यासाठी सज्ज

India vs England | इंग्लंडचा कसोटी मालिकेत 3-0 ने पराभव होणार, गौतम गंभीरची भविष्यवाणी

(india vs england 2021 virat kohli and cheteshwar pujara have chance to break sachin tendulkar record)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.