Ishan Kishan | किशनच्या खेळीने ‘गब्बरचं’ टेन्शन वाढलं, संघातील स्थान कायम राखण्यासाठी शिखरसमोर इशानचं आव्हान
इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात पदार्पणवीर इशान किशनने (Ishan Kishan) 56 धावांची अफलातून खेळी केली. इशानला या सामन्यात शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) जागी संधी देण्यात आली होती. इशानने केलेल्या या खेळीमुळे शिखरसमोरील आव्हान वाढले आहे.
अहमदाबाद : टीम इंडियाने इंग्लंडवर दुसऱ्या टी 20 सामन्यात (india vs england 2nd t 20) 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. इंग्लंडने विजयासाठी 165 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान भारताने 17.5 ओव्हरमध्ये 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. टीम इंडियाकडून विराट कोहलीने (virat kohli) नाबाद 74 धावा केल्या. तर इशान किशनने (ishan kishan) पदार्पणात अर्धशतकी खेळी केली. इशानने 56 धावांची खेळी केली. इशानला या सामन्यात गब्बर शिखर धवनच्या (shikhar dhawan) जागी संधी देण्यात आली होती. इशानने या संधीचे सोनं करत अर्धशतकी खेळी साकारली. इशानच्या या कामगिरीमुळे धवनचं टेन्शन नक्कीच वाढलं आहे. (india vs england 2nd t 20 Ishan Kishan increased the tension of Shikhar Dhawan)
5⃣0⃣ on debut! ??
What a way to kickstart your international career! ??
A half-century in 28 balls for @ishankishan51! ??@Paytm #INDvENG #TeamIndia
Follow the match ? https://t.co/gU4AGqh8Um pic.twitter.com/NOfhS3E4F7
— BCCI (@BCCI) March 14, 2021
गब्बरच्या टेन्शनमध्ये वाढ
इशानने एकूण 32 चेंडूत 5 चौकार आणि 4 सिक्ससह शानदार 56 धावांची खेळी केली. इशान टी 20 पदार्पणात अर्धशतकी कामगिरी करणारा दुसरा भारतीय ठरला. इशानने केलेल्या कामगिरीमुळे शिखरचे संघातील सलामीची जागा धोक्यात आली आहे. इशानने या खेळीसह शिखरला आव्हान दिले आहे. त्यामुळे शिखरसमोर संघातील स्थान कायम राखण्यासाठी चांगली कामगिरी करण्याचे आव्हान असणार आहे. शिखरला पहिल्या टी 20 सामन्यात संधी देण्यात आली होती. मात्र शिखरने निराशा केली. शिखरने पहिल्या मॅचमध्ये 12 चेंडूत 4 धावा केल्या होत्या.
विजयी आव्हानाचा असा केला पाठलाग
इंग्लंडने 165 धावांचे विजयी आव्हान दिले. विजयी धावांचे पाठलाग करायला आलेल्या टीम इंडियाची खराब सुरुवात राहिली. पहिल्याच ओव्हरमधील तिसऱ्या चेंडूवर केएल राहुल शून्यावर बाद झाला. त्यामुळे टीम इंडियाची 0-1 अशी स्थिती झाली. त्यानंतर विराट मैदानात आला. त्यानंतर इशान आणि विराटनी स्कोअरकार्ड धावता ठेवला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 94 धावांची भागीदारी केली. या दरम्यान इशानने सिक्सर खेचत पहिलवहिलं अर्धशतक झळकावलं. इशानने 28 चेंडूत ही कामगिरी केली. मात्र त्यानंतर इशान 56 धावांवर बाद झाला. यामध्ये इशानने 5 चौकार आणि 4 सिक्स खेचले.
पंतची फटकेबाजी
किशननंतर रिषभ पंत मैदानात आला. पंत आणि विराटने तिसऱ्या विकेटसाठी 36 धावा जोडल्या. यादरम्यान पंतने जोरदार फटकेबाजी केली. पंतने 13 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकारांसह 26 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. पंत बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर आला. श्रेयसने विराटला उत्तम साथ दिली. यादरम्यान सिक्स खेचत 35 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं आहे. विराटच्या टी 20 कारकिर्दीतील 26 वं अर्धशतक ठरलं. यानंतर विराटने सिक्स खेचत आपल्या शैलीत टीम इंडियाला शानदार विजय मिळवून दिला.
मालिकेत बरोबरी
या विजयासह भारताने 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे. दरम्यान या मालिकेतील तिसरा सामना मंगळवारी 15 मार्चला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या :
Video | आयपीएल गाजवणाऱ्या सूर्यकुमार यादव आणि इशान किशनचं टी 20 पदार्पण
(india vs england 2nd t 20 Ishan Kishan increased the tension of Shikhar Dhawan)