India vs England 2nd Test | ‘रनमशीन’ विराटची अपयशाची मालिका सुरुच, तब्बल इतक्यांदा शून्यावर बाद

मोईन अलीने (moeen ali) विराट कोहलीला (Virat Kohli) शून्यावर क्लीन बोल्ड केलं.

India vs England 2nd Test | 'रनमशीन' विराटची अपयशाची मालिका सुरुच, तब्बल इतक्यांदा शून्यावर बाद
विराट कोहली
Follow us
| Updated on: Feb 13, 2021 | 3:52 PM

चेन्नई : एम ए चिदंबरम स्टेडियमवर टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना India vs England 2nd Test खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) भोपळा फोडण्यास अपयशी ठरला. इंग्लंडचा फिरकीपटू मोईन अलीने (Moin Ali) विराटला सामन्याच्या 22 व्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर आऊट केलं. यासह मोईन अली विराट कोहलीला कसोटी क्रिकेटमध्ये शून्यावर बाद करणारा एकूण 11 वा तर पहिला फिरकी गोलंदाज ठरला. (india vs england 2nd test 1st day england spinner moeen ali dismissed to virat kohli on duck)

मोईन अलीने टाकलेला चेंडू विराटने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. पण मोईनने टाकलेला चेंडू तो पर्यंत आत घुसून स्टंपवरील बेल्स उडाल्या होत्या. विराटला कळलंही नाही. पंचांनी बाद झाल्यानंतर विराट अवाक झालेला पाहायला मिळाला.

शून्यावर बाद होण्याची 26 वी वेळ

विराटची शून्यावर बाद होण्याची ही 26 वेळ ठरली. विराट एकूण 11 वेळा टेस्टमध्ये, 13 वेळा वनडे तर दोनदा शून्यावर आऊट झाला आहे.

विराटला शून्यावर आऊट करणारे गोलंदाज

रवी रामपॉल

बेन हिल्फेनहॉस

लियाम प्लंकेट

जेम्स अँडरसन

मिचेल स्टार्क

सुरंगा लकमल

स्टुअर्ट ब्रॉड

पॅट कमिन्स

केमार रोच

अबु जाएद चौधरी

मोईन अली

विराट या सामन्यातील पहिल्या डावात 5 व्या चेंडूवर शून्यावर बाद झाला. विराट पहिल्यांदाच पाचव्या चेंडूवर शून्यावर आऊट झाला आहे. आतापर्यंत विराट पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवर प्रत्येकी 4वेळा आऊट झाला आहे. तर एकदा चौथ्या चेंडूवर आणि एकदा 11 चेंडूवर विराट भोपळा न फोडता माघारी परतला आहे.

रोहितचे शतक

हिटमॅन रोहित शर्माने 130 चेंडूत झुंजार शतक पूर्ण केलं आहे. रोहितच्या कसोटी कारकिर्दीतील हे 7 वं शतक ठरलं. टीम इंडिया अडचणीत असताना निर्णायक क्षणी रोहितने अजिंक्य रहाणेच्या सोबतीने टीम इंडियाचा डाव सावरला. त्यासह रोहितने शतकही लगावलं.

अशी आहे टीम इंडिया : रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, इशांत शर्मा आणि मोहम्मद सिराज

संबंधित बातम्या :

पहिले तीन खेळाडू आजारी, पदार्पणातील सामन्यात दहावा खेळाडू सलामीला उतरला, झंझावाती शतक ठोकलं

(india vs england 2nd test 1st day england spinner moeen ali dismissed to virat kohli on duck)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.