India vs England 2nd Test | अक्षर पटेलचं कसोटी पदार्पण, फिरकीवर इंग्लंडला नाचवणार?
अक्षर पटेल (axar patel makes his test debut) टीम इंडियाकडून कसोटी पदार्पण करणारा 302 वा खेळाडू ठरला आहे.
चेन्नई : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये पेटीएम टेस्ट सीरिजमधील दुसरी कसोटी (India vs England 2nd Test) खेळवण्याात येत आहे. या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी संघात एकूण 3 बदल करण्यात आले आहेत. तसेच या सामन्यानिमित्ताने ऑलराऊंडर अक्षर पटेलने (Axar Patel Test Debut) कसोटी पदार्पण केलं आहे. बीसीसीआयने हा व्हिडीओ ट्विट केला आहे. (india vs england 2nd test day 1 axar patel makes his test debut)
अक्षर पटेलचं कसोटी पदार्पण
Welcome to Test cricket, @akshar2026! ??
Congratulations to the all-rounder who receives his Test cap from #TeamIndia Captain @imVkohli ??@Paytm #INDvENG pic.twitter.com/WIugeXY15D
— BCCI (@BCCI) February 13, 2021
टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने सामन्याआधी कॅप देऊन अक्षरचं संघात स्वागत केलं. अक्षर टीम इंडियाकडून कसोटी पदार्पण करणारा 302 वा खेळाडू ठरला आहे. अक्षरने याआधी एकदिवसीय आणि टी 20 सामन्यात टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केलं आहे.
अक्षर पटेलची आंतरराष्ट्रीय कारकिर्द
अक्षर पटेलने टीम इंडियाकडून 38 एकदिवसीय आणि 11 टी 20 सामने खेळले आहेत. त्याने एकदिवसीय सामन्यात बॅटिंगने 181 धावा केल्या आहेत. तर 45 विकेट्सही घेतल्या आहेत. तसेच टी 20 मध्ये 68 रन्स केल्या आहेत. सोबत 9 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे.
दुसऱ्या कसोटीसाठी एकूण 3 बदल
इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये एकूण 3 बदल करण्यात आले आहेत. जसप्रीत बुमराहला विश्रांती देत त्याच्या जागी मोहम्मद सिराजला संधी देण्यात आली आहे. शहबाज नदीमच्या जागी अक्षर पटेलला कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. तर अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरऐवजी चायमनामॅन बोलर कुलदीप यादवला स्थान देण्यात आलं आहे.
कुलदीपचं 2 वर्षानंतर कमबॅक
कुलदीप यादवने या दुसऱ्या सामन्यातून तब्बल 2 वर्षांनी भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. कुलदीपने अखेरचा कसोटी सामना 3 जानेवारी 2019 मध्ये सिडनीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळला होता. चेन्नईची ही खेळपट्टी फिरकीपटूंसाठी अनुकूल आहे. त्यामुळे कुलदीप कशी कामगिरी करतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
अशी आहे टीम इंडिया :
रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, इशांत शर्मा आणि मोहम्मद सिराज.
संबंधित बातम्या :
India vs England 2nd Test, 1st Day Live | टीम इंडियाची खराब सुरुवात, शुबमन गिल शून्यावर बाद
(india vs england 2nd test day 1 axar patel makes his test debut)