Video | “थोडासा आगे मिल्खा सिंग भागे”, विकेटकीपर पंतची स्टंपमागून विनोदी कॉमेंट्री
विकेटकीपर रिषभ पंत स्टंप्समागून अनेकदा विनोदी कॉमेंट्री (Rishabh Pant funny commentary ) करत असतो. पंतचे असेच काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
चेन्नई : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना (India vs England 2nd Test) खेळवण्यात येत आहे. सामन्यावर आतापर्यंत टीम इंडियाने घट्ट पकड मिळवली आहे. या सामन्यात टीम इंडियाचा विकेटकीपर रिषभ पंतने (Rishabh Pant) पहिल्या डावात खेळताना शानदार अर्धशतक लगावलं. तसेच किपींग करताना पंतने शानदार कामगिरी केली. त्याने हवेत झेपावत 2 शानदार कॅच घेतल्या. दरम्यान पंत किपींग करताना टीम इंडियाच्या गोलंदाजांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि विरोधी संघाच्या फलंदाजांना खिजवण्यासाठी विनोदी शेरेबाजी करत असतो. पंतचा असाच एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल झाला आहे. (india vs england 2nd test wicket keeper Rishabh Pant funny commentary Behind the stump)
काय आहे व्हिडीओत?
दुसऱ्या सामन्यात इंग्लंडचा संघ बॅटिंग करत होता. इंग्लंडकडून बेन स्टोक्स आणि डॅनियल लॉरेन्स खेळत होते. अक्षर पटेल 14 वी ओव्हर टाकत होता. लॉरेन्स स्ट्राईकवर होता. यावेळेस पंत पटेलला बोलिंग कशी टाकायची याबद्दल सूचना देत होता. तेरा अँगल बहुत तगडा है, उसे खेलना पडेगा, अशी कमेंट पंतने केली. यानंतर लॉरेन्स बॅक फुटवर जाऊन खेळला. यावर “वो पहले से पिछे खडा है बॉल मुह पे भी दाल सकता है”, अशी विनोदी कमेंट पंतने केली. हा सारा प्रकार स्टंप माईकमध्ये कैद झाला आहे.
Petition for BCCI to start Rishabh Pant TV. ? pic.twitter.com/6vpUjBxAM0
— Aishu Haridas (@imaishu_) February 14, 2021
“थोडासा आगे, मिल्खा सिंग भागे”
यानंतर दुसऱ्याच दिवशी सामन्यातील 53 व्या ओव्हरमध्ये अक्षर पटेलच्या बोलिंगवर पंतने आपल्या हटके अंदाजात कमेंट केली. जॅक लीच स्ट्राईकवर असताना पंत अक्षर पटेलला उद्देशून म्हणाला “थोडासा आगे, थोडासा आगे मिल्खा सिंह भागे, प्यारे अक्षर थोडा जागे “, असं यमक वाक्य जुळवत पंतने कमेंट केली.
Rishabh Pant: "Thoda sa aage, thoda sa aage, Milkha Singh Bhage, Pyara Axar thoda jaage" What a character?? Just give this guy a collar mike, we don't need any commentators.#IndiavsEngland #RishabhPant #ViratKohli #TeamIndia pic.twitter.com/p9UhF4npq8
— FPeL-Bicho (@FPeL_Bicho) February 14, 2021
या सर्व प्रकारावरुन पंतवर सोशल मीडियावर उपरोधिक टीका करण्यात येत आहे. गोलंदाजांना वारंवार बोलिंग कशी टाकायची याबाबत कमेंट करत असल्याने आता पंत कोचिंग आणि सर्वच जबाबदारी एकटाच पार पाडणार आहे, अशा अर्थाचं एक विनोदी मीम एका ट्विटर हॅंडलवरुन शेअर करण्यात आलं आहे.
Petition for BCCI to start Rishabh Pant TV. ? pic.twitter.com/6vpUjBxAM0
— Aishu Haridas (@imaishu_) February 14, 2021
Rishabh pant now days – ?#RishabhPant #INDvENG #viratkohli pic.twitter.com/mZdWXWxBRy
— Self musing ⭐ (@Spellbounded17) February 14, 2021
संबंधित बातम्या :
India vs England 2nd Test | Video | ‘उडता’ रिषभ, विकेटकीपर पंतचा एकहाती भन्नाट कॅच
India vs England 2nd Test, 3rd Day Live | लंच ब्रेकपर्यंत टीम इंडियाची 6 बाद 156 धावांपर्यंत मजल
(india vs england 2nd test wicket keeper Rishabh Pant funny commentary Behind the stump )