IND vs ENG 3rd ODI Live Score : सॅम करनची झुंजार खेळी, थरारक सामन्यात टीम इंडियाचा इंग्लंडवर 7 धावांनी विजय, 2-1 ने मालिका जिंकली

| Updated on: Mar 28, 2021 | 10:47 PM

शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या सामन्यात टीम इंडियाने तिसऱ्या एकदिवसीय (India vs England 3rd Odi) सामन्यात इंग्लंडवर 7 धावांनी विजय मिळवला आहे (India vs England 3rd ODI).

IND vs ENG 3rd ODI Live Score : सॅम करनची झुंजार खेळी, थरारक सामन्यात टीम इंडियाचा इंग्लंडवर 7 धावांनी विजय, 2-1 ने मालिका जिंकली

पुणे : शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या सामन्यात टीम इंडियाने तिसऱ्या एकदिवसीय (India vs England 3rd Odi) सामन्यात इंग्लंडवर 7 धावांनी विजय मिळवला आहे. यासह भारताने 2-1 च्या फरकाने एकदिवसीय मालिका जिंकली आहे. विराटसेनेने इंग्रजांना विजयासाठी 330 धावांचे आव्हा दिले होते. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर इंग्लंडला निर्धारित 50 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 322 धावाच करता आल्या. इंग्लंडकडून सॅम करनने सर्वाधिक नाबाद 95 धावांची खेळी केली. तसेच डेव्हिड मलानने अर्धशतक झळकावलं. टीम इंडियाकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर भुवनेश्वर कुमारने 3 फलंदाजांना माघारी धाडत शार्दुलला चांगली साथ दिली. तसेच टी नटराजनने 1 विकेट मिळवली.

इंग्लंडच्या डावाची खराब सुरुवात

भारताने दिलेल्या 330 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या डावाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर जेसन रॉयला भुवनेश्वर कुमारने त्रिफळाचीत केलं. जेसन रॉयने 6 चेंडूत 14 धावा केल्या. यामध्ये 3 चौकारांचा समावेश आहे. जेसन रॉय बाद झाल्यानंतर लगेच तिसऱ्या षटकात भुवनेश्वर कुमारने जॉनी बेयरस्टोला पायचीत केलं.

बेयरस्टो एक धावावर बाद

बेयरस्टो अवघ्या एक धावावर बाद झाला. त्यानंतर डेव्हिड मलान आणि जोस बटलर यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, शार्दूल ठाकूरने त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी ठरवला. त्याने जोस बटलरला पायचीत करत तंबूत परत पाठवले. बटलरने 18 चेंडूत 15 धावा केल्या. त्यानंतर मलान आणि लिविंग्स्टोन यांनी डाव सावरला. दोघांनी संयमी खेळी सुरु ठेवली. पण शार्दूल ठाकूरच्या चेंडूवर लिविंग्स्टोनही झेलबाद झाला. त्याने 31 चेडूत 36 धावा केल्या. यामध्ये 4 चौकार आणि 1 षटकाचा समावेश आहे.

मलानचे अर्धशतक

लिविंग्स्टोन नंतर शार्दूलने मलानचा देखील बळी घेतला. मलानने 50 चेंडूत 50 धावा केल्या. यामध्ये सहा चौकारांचा समावेश आहे. त्यानंतर मोईन अलीने सॅम करनच्या मदतीने डाव सावरला. पण भुवनेश्वर कुमारच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. हार्दिक पांड्याने एकदम अचूकपणे त्याचा झेल टिपल्याने तो बाद झाला. मोईनने 2 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 25 चेंडूत 29 धावा केल्या.

सॅम करनची रशीद सोबत भागीदारी

मोईननंतर सॅम करनने आदिल रशीदच्या मदतीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. ही जोडी भारतासाठी डोकेदुखी ठरली. दोघांनी अर्धशतकापेक्षाही जास्त धावांची भागीदारी केली. दरम्यान, विराटने 40 वी ओव्हर शार्दुल ठाकूरला दिली. शार्दुलने विराटचा विश्वास खरा ठरवला. या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर रशीदने फटका मारला. रशीदने मारलेला फटका विराटच्या दिशेने गेला. पण विराट आणि चेंडू यांच्यातील अंतर बरेच लांब होतं. पण विराट आपल्या नेहमीच्या शैलीत हवेत झेपावला. चेंडूवर अचूक नजर ठेवत कॅच पकडला. यासह इंग्लंडला आठवा धक्का बसला. रशीदने 22 चेंडूत 19 धावा केल्या.

सॅम करनच्या नाबाद 95 धावा

रशीद बाद झाल्यानंततर वूड आणि सॅम करन यांनी पुन्हा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. करनने आपली धडाकेबाज फलंदाजी सुरुच ठेवली. अखेर 14 धावांवर बाद झाला. मात्र, शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रोचक ठरला. सॅम करनने शेवटच्या चेंडूपर्यंत नाबाद 95 धावा केल्या.

भारताचा डाव

भारताविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय (India vs England 3rd ODI)सामन्यात ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, शार्दूल ठाकूर यांनी संकटसमयी केलेल्या जबरदस्त फलंदाजीमुळे टीम इंडियाला पुन्हा एकदा मोठी धावसंख्या उभारण्यात यश आलं. भारतीय संघाने टीम इंडियाला 330 धावांचं आव्हान दिलं आहे. भारतीय फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांच्या माऱ्याला कडवी झुंज देत 329 धावांचा डोंगर उभा केला. इंग्लंडला सुरुवातीच्या ओव्हरमध्येच दोन धक्के बसले आहेत. इंग्लंडचे दोन्ही सलामीवीर तंबूत परतले आहेत. अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारनं दोघांना बाद केले.

भारताला मधल्या फळीनं सावरलं

विशेष म्हणजे भारताच्या पहिल्या विकेटनंतर एकामागे एक अशा दोन विकेट गेल्या. कर्णधार विराट कोहली देखील स्वस्तात तंबूत परतला. विराट मोईन अलीच्या फिरकीचा बळी ठरल्याने तो अवघ्या सात धावांवर बाद झाला. त्यानंतर केएल राहुलही स्वस्तात तंबूत परतला. त्यानंतर ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्या यांनी डाव सावरला. दोघांनी 99 धावांची भागीदारी केली. मात्र, सॅम करनला ही जोडी फोडण्यात यश आलं. सॅमच्या चेंडूवर ऋषभ झेलबाद झाला. त्याने 62 चेंडूत 78 धावा केल्या. त्यानंतर हार्दिकने अर्धशतक साजरी केलं. पण पुढे बेन स्टोक्सने त्याचा त्रिफळा उडवला. हार्दिकने 44 चेंडूत 64 धावा ठोकल्या. यामध्ये 4 षटके आणि 5 चौकारांचा समावेश आहे (India Vs England 3rd ODI Cricket live Score Update ind vs Eng MCA Pune)

भारताचा डाव कसा होता? वाचा सविस्तर

प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाची शानदार सुरुवात झाली. रोहित शर्मा आणि शिखर धवन या ओपनिंग जोडीने 103 धावांची भागीदारी रचली. या दरम्यान धवनने अर्धशतक पूर्ण केलं. भारताची धावसंख्या 103 असताना रोहित शर्मा 37 धावांवर बाद झाला. त्यानंतर टीम इंडियाचा 117 स्कोअर असताना गब्बर शिखर धवन आऊट झाला. धवनला आदिल रशीदने आपल्या बोलिंगवर कॅच आऊट केलं. धवनने 56 चेंडूत 10 चौकारांसह 67 रन्स केल्या.

रशीदकडून विराटची शिकार

धवननंतर कर्णधार विराट कोहली मैदानात आला. मात्र विराट फार वेळ मैदानात टिकला नाही. आदिल रशीदने पुन्हा एकदा विराटला बाद केलं. रशीदने विराटचा त्रिफळा उडवला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रशीदने विराटला बाद करण्याची ही नववी वेळ ठरली. विराट बाद झाल्याने भारताची स्थिती 121-3 अशी झाली.

केएल राहुल 7 धावांवर बाद

विराटनंतर केएल राहुल मैदानात आला. पंत आणि राहुलने टीम इंडियाची डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण तो फार यशस्वी ठरला नाही. 157 धावसंख्या असताना केएल 7 धावांवर बाद झाला.

पंत-हार्दिकची फटकेबाजी

केएल बाद झाल्याने भारत अडचणीत सापडला होता. पण पंत आणि हार्दिक या दोघांनी चौफेर फटकेबाजी केली. या दोघांनी मैदानातील प्रत्येक दिशेला फटके मारले. दरम्यान पंतने अर्धशतक झळकावलं. यानंतरही दोघे इंग्लंडच्या फलंदाजांना चोपत होते. मात्र ही सेट जोडी सॅम करनने फोडली.

सॅमने पंतला जॉस बटलरच्या हाती कॅच आऊट केलं. पंतने 62 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांसह 78 धावांची खेळी केली. पंत आणि पंड्याने पाचव्या विकेटसाठी 99 धावांची वेगवान आणि महत्वपूर्ण भागीदारी केली.

शार्दूलची आक्रमक खेळी

हार्दिक पांड्या नंतर शार्दूल ठाकूरने आक्रमक फलंदाजी केली. पण तो झेलबाद झाला. त्याने 21 चेंडूत 30 धावा केल्या. यामध्ये 6 षटके आणि 3 चौकारांचा समावेश आहे. शार्दूलला कृणाल पांड्याने संयमी साथ दिली. मात्र, शार्दूलनंतर कृणालही बाद झाला. त्याने 34 चेंडूत 25 धावा केल्या. त्यानंतर काही धावांच्या अंतरावर भारताचे इतर फलंदाज बाद झाले. भारताने 48.2 षटकात 329 धावा केल्या.

Key Events

भारत-इंग्लंड 1-1 बरोबरीत, अंतिम सामना कोण जिंकणार?

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील मालिका सध्या बरोबरीत आहे. दोन्ही संघ 1-1 मॅच जिंकून बरोबरीत आहेत.

पाठीमागच्या दोन वनडे मालिकेत भारताचा पराभव

टीम इंडियाला पाठीमागच्या दोन वनडे मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये 1-2 असा पराभव पत्कारावा लागला होता तर न्यूझीलंडने 0-3 अशी मालिका जिंकली होती.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 28 Mar 2021 10:46 PM (IST)

    जोनी बेयरस्टोला मॅन ऑफ द सीरिज

    जोनी बेयरस्टोला मॅन ऑफ द सीरिजने गौरवण्यात आलं. जोनीने तीनही सामन्यांमध्ये जबरदस्त फलंदाजी केल्याने त्याला मॅन ऑफ द सीरिजने गौरविण्यात आलं.

  • 28 Mar 2021 09:02 PM (IST)

    सॅम करन आणि राशिदने डाव सावरला, दोघांची 52 धावांची भागिदारी

    सॅम करन आणि राशिदने डाव सावरला, दोघांनी आतापर्यंत 52 धावांची भागिदारी केली आहे. सॅम करनने आतापर्यंत 33 चेंडूत 43 धावा केल्या आहेत. तर आदिल राशिदने 18 धावा केल्या आहेत.

  • 28 Mar 2021 08:31 PM (IST)

    इंग्लंडला सातवा झटका, मोईन अली बाद

    इंग्लंडला सातवा झटका, मोईन अली बाद झाला आहे. मोईन अलीने संकट समयी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, भुवनेश्वर कुमारच्या चेंडूवर तो झेलबाद झाला.

  • 28 Mar 2021 08:02 PM (IST)

    इंग्लंडला सहावा झटका, मलान बाद

    इंग्लंडला सहावा झटका, मलान बाद, विशेष म्हणजे मलानने संयमीपणे खेळत अर्धशतक पूर्ण केलं. मात्र, शार्दूल ठाकूरच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. विशेष म्हणजे झेलबाद होण्याआधी ऋषभ पंतने कॅच सोडल्याने तो बचावला होता. मात्र, पुढच्या बॉलमध्ये रोहितने अचूकपणे त्याचा झेल टिपला.

  • 28 Mar 2021 07:54 PM (IST)

    इंग्लंडला पाचवा झटका, लिविंगस्टोन बाद

    इंग्लंडला पाचवा झटका, लिविंगस्टोन बाद, लिविंगस्टोनने 31 चेंडूत 36 धावा केल्या, शार्दूल ठाकूच्या चेंडूवर तो झेलबाद झाला

  • 28 Mar 2021 07:14 PM (IST)

    इंग्लंडला चौथा झटका, जोस बटलर बाद

    इंग्लंडला चौथा झटका, जोस बटलर बाद, बटलरने 18 चेंडूत 15 धावा केल्या

  • 28 Mar 2021 06:46 PM (IST)

    इंग्लंडला तिसरा झटका, बेन स्टोक्स बाद

    इंग्लंडला तिसरा झटका, बेन स्टोक्स बाद, स्टोक्सने 4 चौकार आणि 1 षटकांच्या मदतीने 39 चेंडूत 35 धावा केल्या

  • 28 Mar 2021 06:41 PM (IST)

    इंग्लंडच्या 10 षटकात 2 बाद 66 धावा

    इंग्लंडच्या 10 षटकात 2 बाद 66 धावा, बेन स्टोक्स आणि डेव्हिड मलान सध्या मैदानावर खेळत आहेत. स्टोक्सची अर्धशतकाकडे वाटचाल सुरु आहे.

  • 28 Mar 2021 06:08 PM (IST)

    इंग्लंडला दुसरा धक्का, जॉनी बेयरस्टो 4 धावांवर बाद

    इंग्लंडला दुसरा धक्का बसला असून त्यांचे दोन्ही सलामीवर माघारी परतले आहेत. भूवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर जॉनी बेयरस्टो 4 धावांवर एलबीडब्ल्यू झाला.

  • 28 Mar 2021 05:55 PM (IST)

    इंग्लंडला पहिल्याचं ओव्हरमध्ये धक्का, जेसन रॉय 14 धावांवर बाद

    भारतानं दिलेल्या 330 धावांचं आव्हान गाठण्याच्या उद्देशानं मैदानात उतरलेल्या इंग्लंडला पहिल्याचं ओव्हरमध्ये धक्का बसला आहे. आक्रमक सुरुवात करणाऱ्या जेसन रॉयला  14 धावांवर बाद करण्यात भूवनेश्वर कुमारला यश आलं आहे.

  • 28 Mar 2021 05:21 PM (IST)

    भारताला दहावा झटका, इंग्लंडला 330 धावांचं आव्हान

    भारताला दहावा झटका बसला आहे. भारतीय संघ 329 धावा करुन तंबूत परतला आहे. त्यामुळे इंग्लंडपुढे आता 330 धावांचं आव्हान आहे.

  • 28 Mar 2021 05:16 PM (IST)

    भारताला 9वा झटका, प्रसिद्ध कृष्णा बाद

    भारताला 9वा झटका, प्रसिद्ध कृष्णा बाद, मार्क वूडने त्याचा त्रिफळा उडवला

  • 28 Mar 2021 05:13 PM (IST)

    भारताला आठवा झटका, कृणाल पांड्या बाद

    भारताला आठवा झटका, कृणाल पांड्या बाद, हार्दिक पांड्या बाद झाल्यानंतर कृणालने शार्दूल ठाकूर सोबत डाव सावरण्याचा प्रयत्न केला . शार्दूलने आक्रमक फलंदाजी केली. यावेळी कृणासने त्याला संयमीपणे साथ दिली. शार्दूल बाद झाल्यानंतर त्याने भुवनेश्वर कुमार सोबत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण तो मार्क वूडच्या चेंडूचा शिकार झाला. मार्क वूडच्या चेंडूवर तो उंच फटका मारण्याचा नादात झेलबाद झाला.

  • 28 Mar 2021 05:05 PM (IST)

    भारताला सातवा झटका, शार्दूल ठाकूर बाद

    भारताला सातवा झटका, शार्दूल ठाकूर बाद, शार्दूलने सिक्स ठोकत आपलं खातं उघडलं. त्याने आक्रमक फलंदाजी केली. त्याने कृणाल पांड्याच्या मदतीने 21 चेंडूत 30 ठोकत टीम इंडियाच्या स्कोर 300 पार नेला.

  • 28 Mar 2021 04:52 PM (IST)

    भारताच्या 42 षटकात 6 बाद 295 धावा

    भारताच्या 42 षटकात 6 बाद 295 धावा, सध्या क्रुणाल पांड्या आणि शार्दुल ठाकूर फलंदाजी करत आहेत.

  • 28 Mar 2021 04:32 PM (IST)

    भारताला सहावा झटका, हार्दिक पांड्या बाद

    भारताला सहावा झटका बसला आहे. बेन स्टोक्सने हार्दिक पांड्याचा त्रिफळा उडवला. त्याआधी पांड्याने आज अर्धशतक पूर्ण केलं. त्याने 44 चेंडूत 64 धावा ठोकल्या.

  • 28 Mar 2021 04:19 PM (IST)

    हार्दिक पांड्याचं अर्धशतक

    हार्दिक पांड्याने जबरदस्त फलंदाजी केली. त्याने 38 चेंडूत 57 धावा करत आपलं अर्धशतक साजरी केलं

  • 28 Mar 2021 04:17 PM (IST)

    78 धावांच्या आक्रमक खेळीनंतर ऋषभ पंत बाद

    78 धावांच्या आक्रमक खेळीनंतर ऋषभ पंत बाद, त्याने 62 चेडूत 78 धावा केल्या. यामध्ये 5 चौकार आणि सहा षटकारांचा समावेश आहे.

  • 28 Mar 2021 04:05 PM (IST)

    ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्याने डाव सावरला

    तीन मातब्बर खेळाडूंच्या विकेटनंतर भारतीय संघावर दबाव वाढला होता. मात्र, ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्या यांनी डाव सावरत इंग्लिश गोलंदाजांना धू धू धुण्यास सुरुवात केली. ऋषभने आपलं अर्धशतकं साजरी केलं. तर हार्दिक पांड्याची देखील  अर्धशतकाकडे वाटचाल सुरु आहे

  • 28 Mar 2021 03:24 PM (IST)

    खासदार सुप्रिया सुळे यांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निर्णय

    बारामती : खासदार सुप्रिया सुळे यांनी केले सर्व कार्यक्रम रद्द.. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुचनेनंतर सर्व कार्यक्रम रद्द करत असल्याचं सुप्रिया सुळे यांचं व्हाटसअप स्टेटस.. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे घेतला निर्णय..

  • 28 Mar 2021 03:23 PM (IST)

    भारताला चौथा झटका, के एल राहुल बाद

    भारताला पुन्हा एकदा झटका बसला, भारताचा धडाकेबाज फलंदाज के एल राहुल लिविंगस्टोनच्या चेंडूवर झेलबाद झाला. राहुलच्या विकेटमुळे भारतीय संघावर दबाव वाढताना दिसत आहे. आता हार्दिक पांड्या मैदानावर उतरला आहे. तो काहीतरी करिश्मा दाखवेल अशी भारतीय क्रिकेटप्रेमींना अपेक्षा आहे

  • 28 Mar 2021 03:01 PM (IST)

    आदिल रशीदने सलामीवीरांना जाळ्यात ओढलं

    रोहित शर्मा आणि धवनने भारताला शतकी ओपनिंग भागिदारी करुन दिली. अतिशय चांगल्या सुरुवातीनंतर भारताच्या झटपट तीन विकेट्स गेल्या. आदिल रशीदने धवन आणि रोहितला फिरकीच्या जाळ्यात ओढलं. विराटही स्वस्तात परतला आहे. केवळ 7 धावा काढून तो मोईन अलीच्या बोलिंगवर आऊट झाला.

  • 28 Mar 2021 02:46 PM (IST)

    रोहित शर्मा आदिल रशीदची शिकार

    फिरकीपटू आदिल रशीदने रोहितला आपल्या ओढलंय. रोहित 37 चेंडूत 37 धावा करुन तंबूत परतला आहे.

  • 28 Mar 2021 02:35 PM (IST)

    गब्बरचा तडाखा, धडाकेबाज अर्धशतक पूर्ण

  • 28 Mar 2021 02:17 PM (IST)

    टीम इंडियाच्या 10 ओव्हरमध्ये 65 धावा

    पहिला पॉवरप्ले संपला आहे. पहिल्या 10 ओव्हर्समध्ये भारतीय सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवनने आक्रमक अंदाज बॅटिंग केली आहे. शिखरने तर चौकारांचा पाऊसच पाडला. शिखरने आतापर्यंत 7 चौकार लगावलेत.

  • 28 Mar 2021 02:06 PM (IST)

    टॉप्लीला धवनने धुतलं, ओव्हरमध्ये तीन चौकार, रोहितनेही हात साफ केला!

    आठव्या ओव्हरमध्ये शिखऱ धवनने इंग्लंडच्या टॉप्लीला धुतलं. एकाच ओव्हर्समध्ये त्याने शानदार तीन चौकार लगावले. रोहित शर्मानेही हात साफ करुन घेतला. शेवटच्या चेंडूवर ऑन साईडला रोहितने शानदार चौकार लगावला.

  • 28 Mar 2021 01:53 PM (IST)

    पाचव्या ओव्हरमध्ये चौकारांची लूट, धवन रोहितच्या बॅटमधून 3 चौकार

    पाचव्या ओव्हरमध्ये रोहित शर्माने 2 चौकार तर धवनने एक चौकार लगावला.

  • 28 Mar 2021 01:39 PM (IST)

    भारत 2 ओव्हरनंतर बिनबाद 10

    रोहित शर्मा 7* (9),  धवन धवन 3* (3)

  • 28 Mar 2021 01:37 PM (IST)

    रोहित शर्माच्या बॅटमधून पहिला खणखणीत चौकार

  • 28 Mar 2021 01:11 PM (IST)

    तिसऱ्या वन डे साठी इंग्लंडची प्लेइंग 11

  • 28 Mar 2021 01:10 PM (IST)

    तिसऱ्या वन डे साठी भारताची प्लेईंग 11

    रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, केएल राहुल, हार्दिक पंड्या, क्रुणाल पंड्या, ऋषभ पंत, भुवनेश्वर कुमार, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकुर, टी. नटराजन

  • 28 Mar 2021 01:05 PM (IST)

    इंग्लडचा टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय

  • 28 Mar 2021 12:58 PM (IST)

    थोड्याच वेळात टॉस होणार

    भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील अंतिम सामन्याचा बरोबर 1 वाजता सॉस होणार आहे.

  • 28 Mar 2021 12:56 PM (IST)

    कर्णधार कोहली खेळणार 200 वा एकदिवसीय सामना

    भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात आज तिसरा आणि मालिकेतील अखेरचा सामना खेळला जाणार आहे. त्याचबरोबर कर्णधार म्हणून कोहलीचा हा 200 सामना असेल. उद्या होळी देखील आहे. आजचा सामना जिंकून कोहली भारताला विजयाचं रंग उधळण्याचं गिफ्ट देऊ शकतो.

Published On - Mar 28,2021 10:46 PM

Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.