India vs England 3rd Test | मोटेराची पीच फिरकीसाठी अनुकूल, टीम इंडियाचे फिरकीपटू गुलाबी चेंडूने इंग्लंडला नाचवणार

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना (india vs england 3rd test) अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियममध्ये (Motera Stadium) 24 फेब्रुवारीपासून खेळवण्यात येणार आहे.

India vs England 3rd Test | मोटेराची पीच फिरकीसाठी अनुकूल, टीम इंडियाचे फिरकीपटू गुलाबी चेंडूने इंग्लंडला नाचवणार
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना (india vs england 3rd test) अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियममध्ये (Motera Stadium) 24 फेब्रुवारीपासून खेळवण्यात येणार आहे.
Follow us
| Updated on: Feb 21, 2021 | 1:51 PM

अहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना (India vs England 3rd Test) 24 फेब्रुवारीपासून अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमवर (Motera Stadium) खेळवण्यात येणार आहे. हा कसोटी सामना डे नाईट असणार आहे. ही मॅच गुलाबी चेंडूने खळण्यात येणार आहे. या मोटेरा स्टेडियमवरील खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल ठरणार आहे. त्यामुळे या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळणार आहे. (india vs england 3rd test at motera Stadium turning pitch are helpfull to indian spinners)

“टर्निंग पीचवर खेळली जाणार तिसरी कसोटी”

“हा तिसरा कसोटी सामना टर्निंग पीचवर खेळवण्यात येणार आहे. टीम इंडिया भारतात खेळत आहे. त्यामुळे टीम इंडियाला होम कंडिशनचा फायदा होणार आहे. तसेच टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी संधी आहे”, अशी माहिती इंडियन एक्सप्रेसने बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाल्याने दिली.

गुलाबी चेंडू फिरकीसाठी मदतशीर : कर्ण शर्मा

गुलाबी चेंडूला फार चमक असते. ही चमक फिरकीपटूंसाठी मदतशीर असते. फिरकीपटू कर्ण शर्मानुसार, ” गुलाबी चेंडूने गोलंदाज कोणत्या पद्धतीने बोल फेकणार, याचा अंदाज बांधता येत नाही. डे नाईट सामन्यात हे आणखी अडचणीचं ठरतं. चेंडूमध्ये फार चमक असल्याने गुगली बोल समजायला फार वेळ लागतो.” कर्ण शर्मा दुलीप करंडकात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला होता.

टीम इंडियाकडे आर अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यासारखे चार फिरकी गोलंदाज आहेत. यामुळे हे फिरकीपटू तिसऱ्या सामन्यात या पिचवर कशी कामगिरी करतात, याकडे सर्व भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

दरम्यान या कसोटी मालिकेत आतापर्यंत 2 सामने खेळण्यात आले आहेत. यापैकी प्रत्येकी 1 सामना दोन्ही संघांनी जिंकला आहे. यामुळे मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे हा तिसरा कसोटी सामना मालिकेच्या आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या दृष्टीने महत्वाचा ठरणार आहे.

तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी टीम इंडिया

विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (व्हीसी), केएल राहुल, हार्दिक पंड्या, रिषभ पंत (विकेटकीपर), रिद्धीमान साहा (विकेटकीपर), आर अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल , वॉशिंग्टन सुंदर, ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड टीम

जो रूट (कर्णधार), जेम्स एंडरसन, जोफ्रा आर्चर, जॉनी बेयरस्टो, डॉम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, जॅक क्राउले, रोरी बर्न्स , बेन स्टोक्स, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, ओली पोप, डॉम सिबले, बेन फोक्स, ओली स्टोन, ख्रिस वोक्स आणि मार्क वुड.

संबंधित बातम्या :

Ind vs Eng T 20 Series | 1 ओव्हरमध्ये 5 सिक्स खेचत टीम इंडियामध्ये स्थान मिळवलं, ‘हा’ खेळाडू टी 20 मालिकेत इंग्लंडच्या गोलंदाजांची पिसं काढण्यासाठी सज्ज

क्रिकेट की बॅडमिंटन? होता द्विधा मनस्थितीत, IPL मधून घरोघरी पोहचला, आता टीम इंडियाकडून खेळणार

(india vs england 3rd test at motera Stadium turning pitch are helpfull to indian spinners)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.