India vs England 4TH T20 | इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या सामन्यात ‘हिटॅमन’ रोहित शर्माला मोठा विक्रम करण्याची संधी

इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या टी 20 सामन्यात (india vs england 4th t20) रोहित शर्माला (Rohit Sharma) 9 हजार धावा पूर्ण करण्याची संधी आहे.

India vs England 4TH T20 | इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या सामन्यात 'हिटॅमन' रोहित शर्माला मोठा विक्रम करण्याची संधी
इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या टी 20 सामन्यात (india vs england 4th t20) रोहित शर्माला (Rohit Sharma) 9 हजार धावा पूर्ण करण्याची संधी आहे.
Follow us
| Updated on: Mar 18, 2021 | 6:54 PM

अहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथ्या टी 20 सामन्याला (India vs England 4TH T20) थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. इंग्लंडने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे टीम इंडिया प्रथम बॅटिंग करणार आहे. या सामन्यात टीम इंडियाचा सलामीवीर हिटमॅन रोहित शर्मा (Hitman Rohit Sharma) मोठा विक्रम करण्याची मोठी संधी आहे. ही कामगिरी करताच रोहित दुसराच भारतीय खेळाडू ठरेल. त्यामुळे रोहित हा किर्तीमान करणार का, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे. (india vs england 4th t20 Rohit Sharma has a chance to complete 9 Thousand runs in T20 cricket)

काय आहे रेकॉर्ड?

रोहित शर्माला टी 20 क्रिकेटमध्ये 9 हजार धावांचा टप्पा पूर्ण करण्याची संधी आहे. हा किर्तीमान करण्यासाठी रोहितला अवघ्या 11 धावांची आवश्यकता आहे. रोहितच्या नावे टी 20 मध्ये एकूण 8 हजार 989 धावांची नोंद आहे. रोहितने ही कामगिरी एकूण 341 सामन्यात केली आहे. त्यामुळे रोहित 11 धावा करताच अशी कामगिरी दुसरा भारतीय ठरेल. याआधी टीम इंडियाकडून कर्णधार विराट कोहलीने ही कामगिरी केली आहे. विराटच्या नावे टी 20 मध्ये 302 सामन्यात 9 हजार 650 धावा केल्या आहेत.

रोहितच्या तिसऱ्या सामन्यात 15 धावा

रोहितने इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात 17 चेंडूत 15 धावांची खेळी केली होती. या सामन्यात त्याला चांगली सुरुवात मिळाली होती. मात्र त्याला या खेळीचे मोठ्या आकड्यात रुपांतर करता आले नव्हते. तर याआधीच्या 2 सामन्यात रोहितला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली नव्हती.

टीम इंडियासाठी ‘करो या मरो’चा सामना

इंग्लंड विरुद्धच्या चौथा टी 20 सामना भारतासाठी ‘करो या मरो’चा आहे. मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी विराटसेनेला हा सामना जिंकावा लागणार आहे. दरम्यान इंग्लंड या 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे.

इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या टी 20 सामन्यासाठी टीम इंडिया

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, रिषभ पंत(यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, भुवनेश्वर कुमार आणि राहुल चाहर.

अशी आहे इंग्लंड टीम

इयन मॉर्गन (कॅप्टन), जेसन रॉय, जोस बटलर, डेव्हिड मलान, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स, सॅम करन, जोफ्रा आर्चर, ख्रिस जॉर्डन, आदिल राशिद आणि मार्क वुड.

संबंधित बातम्या :

India vs England 2021, 4th T20, LIVE Score | इंग्लंडचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय

India vs England 4th T20I | टीम इंडियासाठी ‘करो या मरो’, मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी विजय आवश्यक

(india vs england 4th t20 Rohit Sharma has a chance to complete 9 Thousand runs in T20 cricket)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.