Video | सूर्यकुमार यादव Out की Not Out? नेटीझन्समध्ये संताप

इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या टी 20 सामन्यात (india vs england 4th t2o) सूर्यकुमार यादवने (suryakumar yadav) सर्वाधिक 57 धावा केल्या. सूर्याला अंपायरच्या चुकीच्या निर्णयामुळे मैदानाबाहेर जावे लागले. त्यामुळे नेटीझन्सने थर्ड अंपायरला चांगलेच फैलावर घेतले आहे.

Video | सूर्यकुमार यादव Out की Not Out? नेटीझन्समध्ये संताप
इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या टी 20 सामन्यात (india vs england 4th t2o) सूर्यकुमार यादवने (suryakumar yadav) सर्वाधिक 57 धावा केल्या. सूर्याला अंपायरच्या चुकीच्या निर्णयामुळे मैदानाबाहेर जावे लागले. त्यामुळे नेटीझन्सने थर्ड अंपायरला चांगलेच फैलावर घेतले आहे.
Follow us
| Updated on: Mar 19, 2021 | 12:37 AM

अहमदाबाद : भारताने पाहुण्या इंग्लंडवर चौथ्या टी 20 सामन्यात ((india vs england 4th t2oi) 8 धावांनी शानदार विजय मिळवला. टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 186 धावांचे आव्हान दिले होते. मात्र इंग्लंडला 20 ओव्हर्समध्ये 8 विकेट्स गमावून 177 धावाच करता आल्या. त्यामुळे टीम इंडियाचा रंगतदार सामन्याच विजय झाला. या विजयासह भारताने 5 सामन्यांच्या मालिकेत 2-2 ने बरोबरी साधली. सूर्यकुमार यादव ( suryakumar yadav)  या सामन्याचा हिरो ठरला. त्याने 31 चेंडूत 57 धावांची खेळी केली. मात्र थर्ड अंपायर्सने त्याला ज्या पद्धतीने बाद घोषित केलं, त्यासाठी नेटीझन्सने बीसीसीआय आणि थर्ड अंपायरला चांगलेच फैलावर घेतले आहे. सूर्यकुमारला बाद दिल्याच्या निर्णयाविरोधात अनेक ट्विट केले जात आहेत. (india vs england 4th t2oi suryakumar yadav out or not out netizens troll third umpire)

नक्की काय झालं?

आपल्या पहिल्या सामन्यात सूर्या चांगल्या रंगात दिसत होता. त्याने षटकार खेचून आपला आक्रमक रंग दाखवून दिला. त्यानंतर सूर्याने चौफेर फटकेबाजी केली. 28 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं.त्यानंतर सूर्यकुमार आणखी आक्रमक झाला होता.

सॅम करण 14 वी ओव्हर टाकायला आला. या ओव्हरमधील दुसऱ्या चेंडूवर सूर्याने 57 धावांवर असताना जोरदार फटका मारला. मात्र तो कॅच डेव्हिड मलानने पकडला. डेव्हिड मलानने टिपलेला चेंडूचा जमीनीला स्पर्श झाला की नाही, याबाबत फिल्ड अंपायर्सना शंका होती. त्यामुळे त्यांनी याबाबतचा निर्णय थर्ड अंपायर्सना घ्यायला लावला. मात्र तिसऱ्या अंपायरही अचूक निर्णय देऊ शकले नाहीत. थर्ड अंपायरने सूर्याला बाद घोषित केलं. यामुळे नेटकऱ्यांमध्ये नाराजी आणि संतापाचं वातावरण पाहायला मिळतंय.

नेटीझन्सची भूमिका काय?

नेटीझन्सनुसार सूर्यकुमारला चुकीच्या पद्धतीने बाद दिल्याचं म्हटलं जात आहे. अनेकांनी व्हिडीओ शेअर केले आहेत. यामध्ये डेव्हिड मलान कॅच घेताना त्याने चेंडू जमिनिला स्पर्श केल्याचं दिसतंय. मात्र यानंतरही तिसऱ्या पंचांनी सूर्याला चुकीच्या पद्धतीने बाद दिलं. यामुळे या निर्णयाविरोधात नेटकरी अनेक ट्विट करत आहेत. त्यामुळे ट्विटरवर #NotOut हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. दरम्यान या निर्णयाविरोधात अनेकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

मालिकेत 2-2 ने बरोबरी

टीम इंडियाने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 2-2 ने बरोबरी साधली आहे. यामुळे मालिकेच्या दृष्टीने 5 वा सामना हा रंगतदार होणार आहे. हा 5 वा सामना 20 मार्चला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या :

India vs England 4Th T20i | शार्दुलचा भेदक मारा, सूर्यकुमारची अर्धशतकी खेळी, मुंबईकर खेळाडूंची विजयी कामगिरी

India vs England 2021, 4th T20 | अटीतटीच्या सामन्यात टीम इंडियाची इंग्लंडवर 8 धावांनी मात, मालिकेत 2-2 ने बरोबरी

(india vs england 4th t2oi suryakumar yadav out or not out netizens troll third umpire)

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.