India vs England 4Th Test | कर्णधार विराटकडून पुन्हा एकदा निराशा, ‘रनमशीन’ कोहलीची धोनीच्या ‘या’ नकोशा विक्रमाशी बरोबरी
कर्णधार विराट कोहली (Indian captain Virat Kohli) इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीतील पहिल्या डावात (india vs england 4th test) शून्यावर बाद झाला. यासह त्याने महेंद्रसिंह धोनीच्या नकोशा विक्रमाची बरोबरी केली.
अहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात अहमदाबादमध्ये चौथा कसोटी सामना (India vs England 4th Test) खेळवण्यात येत आहे. या कसोटीतील आजचा दुसरा दिवस आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांची निराशा केली आहे. विराट पहिल्या डावात भोपळा न फोडता बाद झाला. यासह विराटने टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या (Mahendra singh Dhoni) लाजिरवाण्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. (india vs england 4th test day 2 Indian captain Virat Kohli equals Mahendra Singh Dhoni record for most ducks at zero)
विराट बाद झाला तो क्षण
Watch the Reaction of my sister after Virat Kohli has been Got Out by Ben stocks. ? @BCCIVirat 0(7) ? Duck#INDvsEND #KingKohli #ViratKohli pic.twitter.com/FIACpJZfqC
— Sujal Jaiswal (@sujal_jaiswal16) March 5, 2021
विराटला बेन स्टोक्सने विकेटकीपर बेन फोक्सच्या हाती कॅच आऊट केलं. यासह विराटच्या नावे नकोशा विक्रमाची नोंद झाली. विराटची शून्यावर बाद होण्याची ही 8 वी वेळ ठरली. यासह विराटने धोनीच्या नकोशा विक्रमाची बरोबरी केली. धोनीही कसोटीमध्ये कर्णधार म्हणून 8 वेळा शून्यावर आऊट झाला आहे.
Most ducks as an Indian Test captain:
Virat Kohli – 8*MS Dhoni – 8#INDvsENG
— CricTracker (@Cricketracker) March 5, 2021
एकाच मालिकेत 2 वेळा शून्यावर बाद
विराटची इंग्लंड विरुद्धच्या या कसोटी मालिकेत दुसऱ्यांदा शून्यावर बाद झाला. विराटने याआधी 2014 मध्ये इंग्लंड विरुद्ध अशी निराशाजनक कामगिरी केली होती. इंग्लंड विरुद्ध 2014 मध्ये खेळण्यात आलेल्या टेस्ट सीरिजमध्येही विराट दोनदा झिरोवर आऊट झाला होता. त्या मालिकेत लियाम प्लंकेट आणि जेम्स अँडरसनने आऊट केलं होतं. तर यावेळेस मोईन अली आणि बेन स्टोक्सने विराटला धावा करु दिल्या नाहीत.
बेन स्टोक्सचा विराटला जोरदार ‘पंच’
बेन स्टोक्सने विराटला आऊट करण्याची ही पाचवी वेळ ठरली. स्टोक्सने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत कोणत्याही एका फलंदाजाला इतक्या वेळा बाद केलं नाहीये. स्टोक्सने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क आणि दक्षिण अफ्रिकेच्या डीन एल्गरला प्रत्येकी 4 वेळा आऊट केलं आहे.
दुसऱ्या दिवसातील पहिल्या सत्राचा खेळ
चौथ्या टेस्टमधील दुसऱ्या दिवसातील पहिल्या सत्रात एकूण 25. 5 ओव्हर्सचा खेळ पार पडला. हे सत्र इंग्लंडच्या नावावर राहिलं. या सत्रात इंग्लंडने 56 धावा देत चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे या 3 अनुभवी फलंदाजांना बाद केलं.
संबंधित बातम्या :
संपूर्ण कसोटी कारकिर्दीत भारताविरुद्धच खेळला, ‘या’ पाकिस्तानी क्रिकेटपटूचा टीम इंडिया विरुद्ध तगडा रेकॉर्ड
India vs Engalnd 4th Test | कॅप्टन विराट कोहलीला ‘या’ दिग्गज कर्णधाराचा रेकॉर्ड मोडीत काढण्याची संधी
(india vs england 4th test day 2 Indian captain Virat Kohli equals Mahendra Singh Dhoni record for most ducks at zero)