Video: रिषभ पंतचा ‘तो’ डोळ्याचे पारणे फेडणारा चौकार बघाच, वॉशिंग्टनची ‘सुंदर’ खेळी, वाचा स्पेशल रिपोर्ट

रिषभ पंतने जेम्स अँडरसनच्या (James Anderson) बोलिंगवर रिव्हर्स स्वीपचा शानदार फटका मारला. पंतने लगावलेला फटका पाहून अँडरसनही अवाक झाला.

Video: रिषभ पंतचा 'तो' डोळ्याचे पारणे फेडणारा चौकार बघाच, वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी, वाचा स्पेशल रिपोर्ट
रिषभ पंतने मारलेला स्वीपचा अप्रतिम फटका
Follow us
| Updated on: Mar 05, 2021 | 9:03 PM

अहमदाबादटीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (India Vs England) यांच्यातील चौथ्या कसोटीतील दुसऱ्या दिवस भारताचा आक्रमक फलंदाज रिषभ पंतच्या (Rishabh pant) नावे राहिला.  रिषभला वॉश्गिंटन सुंदरनेही (Washington Sundar) चांगली साथ दिली. रिषभने आपल्या कसोटी कारकीर्दीतील तिसरं शतक रिषभने झळकावलं. रिषभ पंतने 118 चेंडूत 13 चौकार आणि 2 षटकारांसह तडकाफडकी 101 धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान पंतने जेम्स अँडरसनच्या (James Anderson) बोलिंगवर रिव्हर्स स्वीपने शानदार चौकार खेचला. या रिव्हर्स स्वीपचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (India vs England 4th test day 2 Rishabh Pant hit Reverse Sweep, Washington Sundar-Rishabh partnership)

और ये लगा शानदार चौका..

अँडरसन सामन्यातील 83 वी ओव्हर टाकायला आला. पंत आणि वॉशिंग्टन सुंदरमध्ये सातव्या विकेटसाठी 99 धावांची भागीदारी झाली होती तर पंत स्वत: 89 धावांवर खेळत होता. अँडरसनने या ओव्हरमधील पहिल्या चेंडूवर पंतने परफेक्ट टायमिंगसह फर्स्ट स्लीपच्या डोक्यावरुन अचूक रिव्हर्स स्वीप लगावला.

रिषभ पंतच्या सिक्सरने अँडरसन अवाक, आजी-माजी खेळाडू अचंबित

पंतने लगावलेला फटका पाहून अँडरसनही अवाक झाला. पंतने मारलेल्या या फटक्यानंतर इंग्लंड टीमचा विशेषत: अँडरसनचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. पंतने मारलेला या फटक्याने अनेक आजी माजी खेळाडूही प्रभावित झाले. या रिव्हर्स स्वीपसाठी पंतचं दिग्गज खेळाडूंकडून कौतुक केलं जातंय.

दिलखेचक षटकारावर काय म्हणाला रिषभ पंत

“रिव्हर्स स्वीपसारखे फटके मारताना विचार करावा लागतो. भाग्य तुमच्या बाजूने असेल तर तुम्ही असे फटके मारण्याची जोखीम पत्करू शकता. मला माझा नैसर्गिक खेळ करण्याची परवानगी आहे. पण मी परिस्थितीनुसार खेळण्याचा प्रयत्न करतो. मी माझ्या देशासाठी खेळतो. या दरम्यान जर क्रिकेट चाहत्यांना माझा खेळ पाहून आनंद वाटत असेल तर मी फार भाग्यवान आहे”, अशी प्रतिक्रिया पंतने दुसऱ्या दिवसाच्या खेळानंतर दिली.

मालिकेत दुसऱ्यांदा अर्धशतक, वॉशिंग्टनचा ‘सुंदर’ खेळ

पंत आणि सुंदर यांनी सातव्या विकेटसाठी 113 धावांची भागीदारी केली. रिषभ पंतची आऊट झाल्यानंतर डावाची सूत्रे सुंदरने हातात घेतली. भारतीय डावाचं सारथ्य करत वॉशिंग्टनने इंग्लंडचा सुंदर सामना केला. सुंदरने मालिकेत दुसऱ्यांदा अर्धशतक झळकावलं.

भारताकडे निर्णायक 89 धावांची आघाडी

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीतील दुसऱ्या दिवसाचा (india vs england 4th test) खेळ संपला आहे. या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने 7 विकेट्स गमावून 294 धावा केल्या. यासह टीम इंडियाने 89 धावांची निर्णायक आघाडी घेतली.

(India vs England 4th test day 2 Rishabh Pant hit Reverse Sweep, Washington Sundar-Rishabh partnership)

हे ही वाचा :

India vs England 4th Test, Day 2 Live Updates | रिषभ पंतचे खणखणीत शतक, वॉशिंग्टनची ‘सुंदर’ खेळी, दुसऱ्या दिवसखेर टीम इंडियाकडे 89 धावांची आघाडी

India vs England 4th Test | व्वा पंत ! सिक्सर खेचत रिषभ पंतचे खणखणीत शतक पूर्ण

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.