Washington Sundar | वॉशिंग्टन सुंदर पुन्हा अनलकी, सोबतच्या फलंदाजांनी साथ न दिल्याने दुसऱ्यांदा शतकापासून वंचित
वॉशिंग्टन सुंदर (washington sundar) इंग्लंड विरुद्धच्या या कसोटी मालिकेत सलग दुसऱ्यांदा शतकापासून (missed his hundred) वंचित राहिला आहे.
अहमदाबाद : टीम इंडियाचा चौथ्या कसोटीतील (India vs England 4 Th test) पहिला डाव 365 धावांवर आटोपला आहे. भारताने यासह 160 धावांची आघाडी घेतली आहे. टीम इंडियाकडून रिषभ पंतने सर्वाधिक 101 धावांची खेळी केली. तर अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) पुन्हा एकदा आपल्या शतकापासून वचिंत राहिला. सुंदरला शेपटीच्या फलंदाजांनी साथ न दिल्याने सुंदर आपल्या कसोटीतील पहिल्या शतकापासून अवघ्या 4 धावा दूर राहिला. सुंदरने नाबाद 96 धावांची खेळी केली. वॉशिंग्टनने 174 चेंडूत 10 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 96 धावा केल्या. सुदंर शतकापासून वंचित राहिल्याने नेटीझन्सने शेपटीच्या फलंदाजांना चांगलेच फैलावर घेतलं आहे. (india vs england 4th test day 3 washington sundar missed his hundred just by 4 runs)
तिसऱ्या दिवसाची झोकात सुरुवात
सुंदर आणि अक्षर पटेल या जोडीने तिसऱ्या दिवसाच्या खेळाची सुरुवात केली. 7 बाद 294 धावसंख्येवरुन खेळाची सुरुवात झाली. वॉशिंग्टन सुंदर (60*) आणि अक्षर पटेल (11*) धावांवर नाबाद होते. या दोघांनी झोकात सुरुवात केली. या दोन्ही फलंदाजांनी इंग्लंडच्या फिरकी गोलंजदाज जॅक लीचच्या बोलिंगवर जोरदार फटकेबाजी केली. या दोघांमध्ये 106 धावांची शतकी भागीदारी झाली. पण त्यानंतर चोरटी धाव घेण्याच्या नादात अक्षर 43 धावांवर रनआऊट झाला. तेव्हा सुंदर शतकाच्या उंबरठ्यावर होता. पण अक्षरनंतर मैदानात आलेला इशांत शर्मा पहिल्याच चेंडूवर आऊट झाला. त्यानंतर याच ओव्हरमधील चौथ्या चेंडूवर मोहम्मद सिराज शून्यावर बोल्ड झाला. या दोन्ही विकेट बेन स्टोक्सने घेतल्या. यामुळे नॉन स्ट्राईकर एंडवर असेलला सुंदर आपल्या शतकापासून 4 धावांनी वंचित राहिला. सुंदर 96 नाबाद धावांवर माघारी परतला.
इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीत सहकाऱ्यांमुळे संधी हुकली
दरम्यान सुंदर शतकापासून वंचित राहण्याची ही दुसरी वेळ ठरली. दुर्देवी योगायोग म्हणजे ही घटना इंग्लंड विरुद्धच्या या कसोटी मालिकेतच घडली. चेन्नईत खेळवण्यात आलेल्या पहिल्या कसोटीत सुंदरल शतक लगावण्याची संधी होती. पण इतर सहकाऱ्यांनी त्याला साथ न दिल्याने त्याला शतकापासून वंचित राहावे लागले होते. एका मागोमाग एक खेळाडू बाद झाल्याने सुंदर 85 रन्सवर नॉट ऑऊट राहिला होता. सुंदरने 138 चेंडूत 2 सिक्स आणि 12 चौकारांसह नाबाद 85 धावा केल्या होत्या.
पंत आणि अक्षरसोबत महत्वपूर्ण भागीदारी
वॉशिंग्टन सुंदरने 94 धावांच्या खेळीदरम्यान रिषभ पंत आणि अक्षर पटेलसोबत शतकी भागीदारी केली. सुंदरने दुसऱ्या दिवशी पंतसोबत टीम इंडियाचा डाव सावरण्यात निर्णायक भूमिका बजावली. दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या. अश्विन आऊट झाल्यानंतर टीम इंडियाचा स्कोअर 146-6 असा झाला होता. मात्र त्यानंतर पंतसोबत वॉशिंग्टन सुंदरने टीम इंडियाचा डाव सावरला. या दोघांनी सातव्या विकेटसाठी 158 चेंडूत 113 रन्सची भागीदारी केली. यादरम्यान पंतने शतकी खेळी केली. तर पंत बाद झाल्यानंतर अक्षरसोबत सुंदरने 106 रन्सची पार्टनरशीप केली. या दोघांनी केलेल्या या भागीदारीमुळे टीम इंडियाने 365 पर्यंत मजल मारली
संबंधित बातम्या :
Aus vs Ind, 4th Test | नटराजन आणि वॉशिंग्टनचा कारनामा, पदार्पणात अफलातून कामगिरी
(india vs england 4th test day 3 washington sundar missed his hundred just by 4 runs)