India vs Engalnd 4th Test | कॅप्टन विराट कोहलीला ‘या’ दिग्गज कर्णधाराचा रेकॉर्ड मोडीत काढण्याची संधी

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) इंग्लंड विरुद्ध सुरु असलेल्या चौथ्या कसोटीत (India vs England 4th Test) ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगचा (Ricky Ponting) रेकॉर्ड ब्रेक करण्याचा संधी आहे.

India vs Engalnd 4th Test | कॅप्टन विराट कोहलीला 'या' दिग्गज कर्णधाराचा रेकॉर्ड मोडीत काढण्याची संधी
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) इंग्लंड विरुद्ध सुरु असलेल्या चौथ्या कसोटीत (India vs England 4th Test) ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगचा (Ricky Ponting) रेकॉर्ड ब्रेक करण्याचा संधी आहे.
Follow us
| Updated on: Mar 05, 2021 | 10:01 AM

अहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात अहमदाबादमध्ये चौथी कसोटी (India vs Engalnd 4th Test) खेळवण्यात येत आहे. या सामन्याचा आजचा (5 मार्च) दुसरा दिवस आहे. टीम इंडियाने पहिल्या दिवसखेर 1 विकेट गमावून 24 धावा केल्या आहेत. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगचा (Ricky Ponting) रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे. (india vs england 4th test Virat Kohli have a chance to break Ricky Ponting most  hundred record as captain)

रेकॉर्ड काय आहे?

विराटला एक कर्णधार म्हणून ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे. कर्णधार म्हणून सर्वाधिक शतक करण्याचा हा रेकॉर्ड आहे. याबाबतीत विराट आणि पॉन्टिंग संयुक्तरित्या पहिल्या क्रमांकावर आहेत. दोघांच्या नावावर प्रत्येकी 41 शतक आहेत. त्यामुळे विराटने या सामन्यात शतक लगावल्यास पॉन्टिंगचा रेकॉर्ड ब्रेक होईल. विराटने हे शतक ठोकल्यास त्याचं हे 28 वं कसोटी शतक ठरेल.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनयशीपच्या दृष्टीने महत्वाचा सामना

इंग्लंड विरुद्धचा हा कसोटी सामना टीम इंडियासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या दृष्टीने महत्वाचा आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात पोहचण्यासाठी टीम इंडियाला हा चौथा सामना जिंकावा किंवा अनिर्णित राखावा लागणार आहे. त्यामुळे या सामन्यात टीम इंडियाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

चौथ्या दिवसाचा धावता आढावा

नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने लागला. इंग्लंडचा पहिला डाव 205 धावांवर आटोपला. इंग्लंडकडून स्टोक्सने सर्वाधिक 55 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर डॅनियल लॉरेन्सने 46 धावा केल्या. या व्यतिरिक्त एकाही फलंदाजाला मोठी खेळी करण्यात यश आले नाही. टीम इंडियाकडून फिरकीपटू अक्षर पटेलने सर्वाधिक 4 विकेट्स मिळवल्या. आर अश्विनने 3 बळी घेतल्या. तर मोहम्मद सिराजनेही 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

विराटचे अनोखं शतक

विराटने नुकतेचं अनोख शतक पूर्ण केलं. विराटचे इंस्टाग्रामवर 100 मिलियन (Virat Kohli 100 million followers on Instagram) म्हणजेच 10 कोटी फॉलोअर्स पूर्ण झाले आहेत. अशा प्रकारे 10 फॉलोअर्स मिळवणारा विराट हा पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. जगभरात इंस्टाग्रामवर फॉलोअर्सच्या बाबतीत स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो अव्वल क्रमांकावर आहे. रोनाल्डोचे एकूण 26.6 कोटी इतके फॉलोअर्स आहेत. यानंतर एरियाने ग्रांडे (22.4 कोटी), अभिनेता ड्वेन जॉनसन (2.20 कोटी), काइल जेनर (2.18 कोटी) इंस्टाग्राम फॉलोअर्स आहेत.

संबंधित बातम्या :

पोलार्डचे खणखणीत 6 षटकार, ‘सिक्सर किंग’ युवराजची प्रतिक्रिया, म्हणाला…..

India vs England 4th Test, Day 1 Highlights | पहिल्या दिवसावर टीम इंडियाचं वर्चस्व, दिवसखेर 1 बाद 24 धावा

(india vs england 4th test Virat Kohli have a chance to break Ricky Ponting most  hundred record as captain)

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.