India vs England 2021, 5th T20I | शार्दुल-भुवनेश्वरचा भेदक मारा, विराट-रोहितची फटकेबाजी, टीम इंडियाची इंग्लंडवर 36 धावांनी मात, 3-2 ने मालिका खिशात

| Updated on: Mar 20, 2021 | 11:34 PM

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पाचवा टी 20 सामना लाईव्ह (india vs england 5th t20 live score)

India vs England 2021, 5th T20I  | शार्दुल-भुवनेश्वरचा भेदक मारा, विराट-रोहितची फटकेबाजी, टीम इंडियाची इंग्लंडवर 36 धावांनी मात,  3-2 ने मालिका खिशात
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पाचवा टी 20 सामना लाईव्ह (india vs england 5th t20 live score)

अहमदाबाद : टीम इंडियाने इंग्लंडवर पाचव्या टी 20 सामन्यात 36 धावांनी विजय मिळवला आहे. भारताने इंग्लंडला विजयासाठी 225 धावांचे आव्हान दिले होते. मात्र इंग्लंडला निर्धारित 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 188 धावाच करता आल्या. या विजयासह टीम इंडियाने 3-2 च्या फरकाने मालिकाही जिंकली आहे. इंग्लंडकडून डेव्हिड मलानने सर्वाधिक 68 धावांची खेळी केली. तर जॉस बटलरने 52 धावांची खेळी केली. टीम इंडियाकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर भुवनेश्वर कुमारने 2 फलंदाजांना माघारी धाडलं. (india vs england 5th t20 live score updates in marathi narendra modi stadium ahmedabad ind vs eng 2021 t20i cricket match news online)

Key Events

3-2 ने मालिका विजय

टीम इंडियाने इंग्लंडला पाचव्या सामन्यात 36 धावांनी पराभूत केलं. या विजयासह भारतानने 3-2 च्या फरकाने मालिकाही खिशात घातली आहे.

शार्दुलचा भेदक मारा

शार्दुल ठाकूरने या सामन्यात एकूण 3 विकेट्स घेतल्या. त्याने एकाच ओव्हरमध्ये निर्णयाक क्षणी 2 विकेट्स घेत सामना फिरवला. शार्दुलने या संपूर्ण मालिकेत टीम इंडियाकडून सर्वाधिक 8 विकेट्स मिळवल्या.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 20 Mar 2021 11:02 PM (IST)

    टीम इंडियाचा शानदार विजय,  3-2 ने मालिका खिशात

    टीम इंडियाने इंग्लंडवर पाचव्या सामन्यात 36 धावांनी शानदार विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने 3-2 ने मालिका जिंकली आहे.  टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 225 धावांचे आव्हान दिले होते. मात्र इंग्लंडला निर्धारित 20 ओव्हरमध्ये  188 धावाच करता आल्या. टीम इंडियाकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

  • 20 Mar 2021 10:27 PM (IST)

    इंग्लंडला पाचवा धक्का

    हार्दिक पांड्याने इंग्लंडला पाचवा धक्का दिला आहे. हार्दिकने इयोन मॉर्गनला आऊट केलं आहे. मॉर्गन आऊट झाल्यानंतर ख्रिस जॉर्डन मैदानात आला आहे. 
  • 20 Mar 2021 10:24 PM (IST)

    शार्दुलची कमाल, एकाच ओव्हरमध्ये इंग्लंडला दोन धक्के

    शार्दुल ठाकूरने निर्णायक क्षणी इंग्लंडला सामन्यातील 15 व्या ओव्हरमध्ये 2 धक्के दिले. त्याने आधी जॉनी बेयरस्टोला आऊट केलं. त्यानंतर डेव्हिड मलानला आऊट केलं.

  • 20 Mar 2021 10:21 PM (IST)

    इंग्लंडला तिसरा धक्का

    शार्दुल ठाकूरने इंग्लंडला तिसरा धक्का दिला आहे. शार्दुलने जॉनी बेयरस्टोला सूर्यकुमार यादवच्या हाती आऊट 7 धावांवर आऊट केलं आहे. बेयरस्टोनंतर कर्णधार इयोन मॉर्गन मैदानात आला आहे.

  • 20 Mar 2021 10:10 PM (IST)

    इंग्लंडला दुसरा धक्का

    भुवनेश्वर कुमारने  इंग्लंडला दुसरा धक्का दिला आहे. भुवनेश्वरने जॉस बटलरला आऊट केलं आहे. बटलरने 52 धावा केल्या. बटलर बाद झाल्यानंतर जॉनी बेयरस्टो मैदानात आला आहे.

  • 20 Mar 2021 10:03 PM (IST)

    जॉस बटलरचे अर्धशतक

    जॉस बटलरने अर्धशतक पूर्ण केलं आहे.  बटलर आणि डेव्हिड मलान यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 127 धावांची नाबाद भागीदारी झाली आहे. टीम इंडियाला विजयासाठी ही जोडी तोडणं आवश्यक आहे. 
  • 20 Mar 2021 09:54 PM (IST)

    डेव्हिड मलानचे अर्धशतक, टीम इंडियाला विकेटची आवश्यकता

    तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या डेव्हिड मलानने अर्धशतक पूर्ण केलं आहे. त्याआधी जोस बटलर आणि मलानने दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. ही जोडी मैदानात सेट झाली आहे. त्यामुळे टीम इंडियाला सामन्यातील आव्हान कायम राखण्यासाठी विकेटची आवश्यकता आहे.

  • 20 Mar 2021 08:59 PM (IST)

    इंग्लंडला पहिला धक्का

    भुवनेश्वर कुमारने इंग्लंडला पहिला धक्का दिला आहे. भुवीने जेसन रॉयला सामन्यातील पहिल्याच ओव्हरमध्ये शून्यावर बोल्ड केलं.

  • 20 Mar 2021 08:48 PM (IST)

    इंग्लंडला मालिका विजयासाठी 225 धावांचे तगडे आव्हान

    टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 225 धावांचे आव्हान दिले आहे. भारताने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 224 धावा केल्या. टीम इंडियाकडून कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक नाबाद 80 धावांची खेळी केली. तसेच हिटमॅन रोहित शर्माने 34 चेंडूत 5 गगनचुंबी षटकार आणि 4 चौकारांसह अफलातून 64 धावांची खेळी केली. हार्दिक पांड्याने 39 धावा केल्या. तसेच सूर्यकुमार यादवने 32 रन्सची खेळी केली.

  • 20 Mar 2021 08:19 PM (IST)

    कर्णधार विराट कोहलीचे शानदार अर्धशतक

    कर्णधार विराट कोहलीने 36 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं आहे. विराटच्या टी 20 कारकिर्दीतील 28 वं अर्धशतक ठरलं.

  • 20 Mar 2021 08:10 PM (IST)

    टीम इंंडियाला दुसरा धक्का

    टीम इंडियाने दुसरी विकेट गमावली आहे. सूर्यकुमार यादव आऊट झाला आहे. सीमारेषेवर जेसन रॉयने धावत अफलातून कॅच घेतला आहे. सूर्याने 17 चेंडूत 32 धावांची खेळी केली.

  • 20 Mar 2021 07:58 PM (IST)

    सूर्याचे सलग 3 चौकार

    सूर्यकुमार यादवने ख्रिस जॉर्डनला सलग 3 चेंडूत 3 चौकार फटकावले आहेत. ख्रिस जॉर्डन सामन्यातील 12 वी ओव्हर टाकत होता. या ओव्हरमधील शेवटच्या 3 चेंडूमध्ये 3 चौकार लगावले.

  • 20 Mar 2021 07:48 PM (IST)

    सूर्यकुमार यादवचे बॅक टु बॅक 2 सिक्स

    सूर्यकुमार यादवने आदिल रशीदच्या बोलिंगवर बॅक टु बॅक 2 सिक्स खेचले आहेत.

  • 20 Mar 2021 07:47 PM (IST)

    टीम इंडियाला पहिला धक्का

    टीम इंडियाने पहिली विकेट गमावली आहे. रोहित शर्मा अर्धशतकी खेळीनंतर आऊट झाला आहे. रोहितने 34 चेंडूत 64 धावांची खेळी केली.

  • 20 Mar 2021 07:42 PM (IST)

    हिटमॅन रोहितचे शानदार अर्धशतक

    रोहित शर्माने सिक्सर खेचत शानदार अर्धशतक झळकावलं आहे.

  • 20 Mar 2021 07:38 PM (IST)

    रोहित शर्माला जीवनदान

    रोहित शर्माला जीवनदान मिळालं आहे. रोहितने 8 व्या ओव्हरमधील 5 व्या चेंडूवर फटका मारला. पण मार्क वुडने तो कॅच सोडला. यामुळे रोहितला 45 धावांवर जीवनदान मिळालं.

  • 20 Mar 2021 07:30 PM (IST)

    पावर प्लेमध्ये टीम इंडियाच्या बिनबाद 60 धावा

    टीम इंडियाच्या विराट कोहली आणि रोहित शर्मा सलामी जोडीने शानदार सुरुवात केली आहे. या दोघांनी पावर प्लेच्या पहिल्या 6 ओव्हरमध्ये 60 धावा चोपल्या.

  • 20 Mar 2021 07:25 PM (IST)

    विराटचा सिक्सर आणि सलामी अर्धशतकी भागीदारी

    विराट कोहलीने मार्क वुडच्या बोलिंगवर सिक्स खेचला. यासह रोहित शर्मा आणि विराट कोहली या सलामी जोडीने अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली आहे.

  • 20 Mar 2021 07:18 PM (IST)

    टीम इंडियाची शानदार सुरुवात

    टीम इंडियाने झोकात सुरुवात केली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीने पहिल्या 4 ओव्हरमध्ये 35 धावा केल्या आहेत.

  • 20 Mar 2021 07:14 PM (IST)

    रोहितचा शानदार सिक्सर

    रोहितने सामन्यातील तिसऱ्या ओव्हरमधील शेवटच्या चेंडूवर सिक्स मारला. रोहितने आदिल रशीदच्या बोलिंगवर सिक्सर खेचला.

  • 20 Mar 2021 07:07 PM (IST)

    सामन्यातील पहिला चौकार विराटच्या बॅटने

    विराट कोहलीने सामन्यातील पहिला चौकार लगावला आहे.  विराटने मॅचमधील दुसऱ्या ओव्हरमधील तिसऱ्या चेंडूवर जोफ्रा आर्चरच्या बोलिंगवर फोर मारला.

  • 20 Mar 2021 07:01 PM (IST)

    टीम इंडियाच्या बॅटिंगला सुरुवात

    टीम इंडियाच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली सलामी जोडी मैदानात खेळत आहे.

  • 20 Mar 2021 06:46 PM (IST)

    इंग्लंडचे 11 शिलेदार

    इयन मॉर्गन (कॅप्टन), जेसन रॉय, जोस बटलर, डेव्हिड मलान, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स, सॅम करन, जोफ्रा आर्चर, ख्रिस जॉर्डन, आदिल रशीद आणि मार्क वुड

  • 20 Mar 2021 06:42 PM (IST)

    टीम इंडियांचे अंतिम 11 खेळाडू

    विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार), सुर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, राहुल चाहार आणि टी नटराजन

  • 20 Mar 2021 06:36 PM (IST)

    इंग्लंडने टॉस जिंकला

    इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे टीम इंडिया प्रथम फलंदाजी करणार आहे.

  • 20 Mar 2021 05:53 PM (IST)

    टीम इंडियाची निर्णायक सामन्यात शानदार कामगिरी

    टीम इंडियासाठी मालिकेच्या दृष्टीने निर्णायक सामना आहे. भारताने 2016 पासून निर्णायक सामन्यात शानदार कामगिरी केली आहे. भारताने 2016 पासून एकूण असे 6 निर्णायक सामने खेळले आहेत. त्यापैकी 6 सामन्यांमध्येही भारताने विजय मिळवला आहे. त्यामुळे या सामन्यातही अशाच कामगिरीची अपेक्षा टीम इंडियाच्या चाहत्यांना असणार आहे.

  • 20 Mar 2021 05:49 PM (IST)

    अशी आहे इंग्लंड टीम

    इयन मॉर्गन (कॅप्टन), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेयरस्टो, सॅम बिलींग्ज, जोस बटलर, सॅम करन, टॉम करन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिंग्विनस्टोन, डेविड मलान, आदिल राशिद, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रिस टोपेल आणि मार्क वुड.

  • 20 Mar 2021 05:48 PM (IST)

    टीम इंडिया

    विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रिषभ पंत(यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, दिपक चहार, नवदीप सैनी आणि शार्दुल ठाकूर.

  • 20 Mar 2021 05:47 PM (IST)

    टॉस कोण जिंकणार?

    या सामन्याच्या दृष्टीने टॉस फॅक्टर महत्वाचा असणार आहे. 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस उडवण्यात येणार आहे. यामुळे नाणेफेकीचा कौल कोणाच्या बाजूने लागणार याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

  • 20 Mar 2021 05:36 PM (IST)

    टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पाचवा टी 20 सामना

    टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील टी 20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला थोड्याच वेळात म्हणजेच संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. मालिका 2-2 ने बरोबरीत आहेत. त्यामुळे हा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा प्रयत्न विराटसेनेचा असणार आहे.

Published On - Mar 20,2021 11:02 PM

Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.