टीम इंडियाने इंग्लंडचा पाचव्या सामन्यात पराभव करुन 3-2 ने मालिका जिंकली. या सामन्यात डेव्हिड मलानने 68 धावांची खेळी केली. यासह मलान टी 20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांमध्ये वेगवान 1 हजार धावा करणारा फलंदाज ठरला. यानिमित्ताने आतापर्यंत सर्वात वेगवान 1 हजार धावा करणाऱ्या फलंदाजांबाबत जाणून घेणार आहोत.
डेव्हिड मलान. मलान टी 20 मधील अव्वल क्रमांकाचा फलंदाज आहे. मलानने टीम इंडिया विरुद्ध पाचव्या सामन्यात 46 चेंडूत 68 धावा चोपल्या. यासह मलानने एकूण 24 सामन्यांमध्ये हजार धावा पूर्ण करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केला.
मलानच्या आधी हा विक्रम पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या नावे होते. बाबरने 2018 मध्ये ही कामगिरी केली होती. बाबरने 26 डावांमध्ये हजार धावा पूर्ण केल्या होत्या. ताज्या आकडेवारीनुसार आझमच्या नावे आता 45 सामन्यांमध्ये 1 हजार 730 धावांनी नोंद आहेत. यामध्ये 16 अर्धशतकांचा समावेश आहे.
या दोघांआधी हा विक्रम टीम इंडियाच्या विराट कोहलीच्या नावे होता. विराटने 27 डावांमध्ये ही कामगिरी केली होती. यानंतर बाबरने हा विक्रम मोडीत काढला होता. कोहली टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. तसेच विराट टी 20 मध्ये कर्णधार म्हणूनही सर्वात जास्त रन्स करणारा खेळाडू आहे.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंच चौथ्या क्रमांकावर आहे. फिंचने हजार धावांचा टप्पा 29 डावांमध्ये ओलांडला होता. फिंचने 2017 मध्ये ही कामगिरी केली होती. फिंच ऑस्ट्रेलियाकडून टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. फिंचने 2 हजार 346 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 2 शतक आणि 14 अर्धशतकं झळकावली आहेत.
पाचव्या क्रमांकावर टीम इंडियाचा सलामीवीर केएल राहुल आहे. केएलने 2019 मध्ये 29 डावात 1 हजार धावा पूर्ण केल्या होत्या. राहुलने 45 टी 20 सामन्यांमध्ये 2 शतक आणि 12 अर्धशतकांसह 1 हजार 557 धावा केल्या आहेत.