दिग्गज कर्णधाराकडून टीम इंडियाचं कौतुक, आगामी टी20 वर्ल्ड कपबाबत भविष्यवाणी, म्हणाला…
टीम इंडियाने इंग्लंडचा 5 सामन्यातील (india vs england 5th t20i) टी 20 मालिकेत 3-2 ने विजय मिळवला. यासाठी इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉर्नने (michael vaughan) भारतीय संघाचं कौतुक केलं.
अहमदाबाद : टीम इंडियाने इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेत (India vs England T20 Series 2021) शानदार कामगिरी केली. चांगली कामगिरी करणाऱ्या संघाचा विजय झाला. या उभय संघातील ही मालिका चांगली राहिली, असं म्हणत इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉर्नने (Michael Vaughan) टीम इंडियाचं कौतुक केलं आहे. वॉर्नने ट्विट करत कौतुक केलं आहे. भारताने 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेत पाहुण्या इंग्लंडचा 3-2 ने पराभव केला. यासह सलग सहाव्यांदा टी 20 मालिका जिंकली. (india vs england 5th t20i michael vaughan praised Team India)
भारताने 5 व्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडला विजयासाठी 225 धावांचे आव्हान दिले होते. मात्र इंग्लंडला निर्धारित 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 188 धावाच करता आल्या. यासह भारताने हा सामना 36 धावांनी जिंकला. सोबतच 3-2 च्या फरकाने मालिका जिंकली.
India have adapted brilliantly in this series … the better team have won … Add @Jaspritbumrah93 & @imjadeja to this team in Indian conditions & they are favourites to win the T20 World Cup … Great series to watch .. #INDvsENG
— Michael Vaughan (@MichaelVaughan) March 20, 2021
वॉर्न पुढे काय म्हणाला?
“टीम इंडियामध्ये यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जाडेजाचा कमबॅक व्हायला हवं. या दोघांचे पुनरागमन होताच टीम इंडिया भारतात होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कपची प्रबळ दावेदार असेल”, अशी भविष्यवाणीही वॉर्नने केली.
येत्या नोव्हेंबर महिन्यात टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेच्या आयोजनाचा मान भारताला मिळाला आहे. टीम इंडिया सर्वच आघाड्यांवर धमाकेदार कामगिरी करत आहे. भारताने नोव्हेंबर 2019 पासून सलग 6 टी 20 मालिका जिंकल्या आहेत. त्यामुळे टीम इंडिया वर्ल्ड कपसाठी प्रबळ दावेदार समजली जात आहे.
वॉर्न रोहित-विराटबाबत काय म्हणाला?
दरम्यान या आधी वॉर्नने आणखी एक ट्विट केलं होतं. यामध्ये त्याने कर्णधार विराट कोहली आणि हिटमॅन रोहित शर्माचा उल्लेख केला होता. “विराट आणि रोहित ही सध्या परिस्थितीतील सर्वोत्तम सलामी जोडी आहे. ही जोडी सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग सारखीच आहे”, असं वॉर्नने आपल्या ट्विटमध्ये नमूद केलं होतं.
रोहित-विराटची 94 धावांची सलामी भागीदारी
रोहित आणि विराट या जोडीने पाचव्या टी 20 सामन्यात सलामी केली. या दोघांनी 94 धावांची सलामी भागीदारी केली. यादरम्यान या दोघांनी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. तसेच रोहित शर्माने आपले अर्धशतकही पूर्ण केलं.
एकदिवसीय मालिका
दरम्यान या टी 20 मालिकेनंतर उभय संघात 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतील तिनही सामने पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडियममध्ये करण्यात आले आहे. या मालिकेला 23 मार्चपासून सुरुवात होणार आहे.
संबंधित बातम्या :
India vs England 5th T20i | केएल राहुलऐवजी इशान किशनला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी द्या, ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूची मागणी
India vs England T20 Series 2021 | टीम इंडियाचा सलग सहावा टी 20 मालिका विजय
(india vs england 5th t20i michael vaughan praised Team India)