Ind vs Eng : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड, कोण जिंकणार वन डे मालिका? इंग्लंडच्या माजी कर्णधाराची मोठी भविष्यवाणी

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने (Michael Vaughan) एकदिवसीय मालिका भारतीय टीम जिंकेल, अशी भविष्यवाणी केली आहे.

Ind vs Eng : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड, कोण जिंकणार वन डे मालिका? इंग्लंडच्या माजी कर्णधाराची मोठी भविष्यवाणी
india Vs England Michael Vaughan Predicts India Win one day series
Follow us
| Updated on: Mar 23, 2021 | 9:48 AM

पुणे : भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील एकदिवसीय मालिकेला (One Day Series) आजपासून सुरुवात होत आहे. पुण्यातील गहुंजे (सहारा) क्रिकेट स्टेडियमवर (MCA Cricket Stadium) आज पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. त्याअगोदर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने (Michael Vaughan) ही एकदिवसीय मालिका भारतीय टीम जिंकेल, अशी भविष्यवाणी केली आहे. (india Vs England Michael Vaughan Predicts India Win one day series)

पाहुणा इंग्लंड संघ जसा भारत दौऱ्यावर आला आहे, तसं प्रत्येकवेळी मायकल वॉनने काहीतरी ट्विट करुन भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. कधी टीम इंडियाची मुंबई इंडियन्सशी तुलना करुन तर कधी टीम इंडियाला चिमटे काढून… आता मात्र पहिल्यांदाच त्याने भारतीय संघाचं पारडं जड मानत एकदिवसीय मालिका भारत जिंकेल, अशी भविष्यवाणी केली आहे.

मायकल वॉनची भविष्यवाणी काय?

मायकल वॉनने भारत एकदिवसीय मालिका जिंकणार असल्याची भविष्यवाणी केलीय. त्याने ट्विट करत त्याचं प्रेडिक्शन मांडलंय. भारत इंग्लंडला एकदिवसीय मालिकेत 3-0 ने धूळ चारणार असल्याची भविष्यवाणी त्याने केली आहे. एकदिवसीय माकिला सुरु होण्याच्या पूर्वसंध्येला त्याने ही भविष्यवाणी केलीय.

इंग्लंड संघातून रुट आणि आर्चर आऊट

कोणतीही सिरीज सुरु होण्याअगोदर मायकल वॉन भविष्यवाणी करुन किंवा ट्विट करुन चर्चेत येत असतात. इंग्लंडच्या एकदिवसीय संघातून जोफ्रा आर्चर आऊट झाला आहे ज्यामुळे इंग्लंडची बोलिंग आता कमजोर झाली आहे. तसंच इंग्लंडचा तडाखेबाज फलंदाज जो रुटही संघात नसल्याने भारतीय संघाला त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे या मालिका विजयाचा प्रबळ दावेदार भारत असेल, असं मायकल वॉनने म्हटलं आहे.

पुण्यात विराटची ‘चलती’

भारताने कसोटी मालिकेत इंग्लंडला 3-1 असं पराभूत केलं होतं. आणि त्यानंतर टी -20 मालिकेतही 3-2 ने विजय मिळवला. पहिला एकदिवसीय सामना पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर असून त्याच मैदानावर विराट कोहलीने सर्वाधिक 319 रन्स केले आहेत. पुण्यात विराट कोहलीने दोन शतके आणि एक अर्धशतक ठोकले आहे. या मैदानावर विराट कोहलीची फलंदाजीची सरासरी 80 च्या आसपास आहे.

टीम इंडियाला नंबर 1 होण्याची संधी

टीम इंडियाला या मालिकेत क्रमवारीत अव्वल क्रमांक गाठण्याची संधी आहे. आयसीसीच्या क्रमवारीत टीम इंडिया दुसऱ्या तर इंग्लंड पहिल्या क्रमांकावर आहे. भारताला नंबर 1 होण्यासाठी ही मालिका 3-0 अशा एकतर्फी फरकाने जिंकावी लागणार आहे. त्यामुळे टीम इंडिया नंबर 1 होण्यासाठी जोरदार प्रयत्न करणार आहे.

(india Vs England Michael Vaughan Predicts India Win one day series)

हे ही वाचा :

India vs England 1st ODI Preview | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड भिडणार, पहिल्या सामन्यासाठी विराटसेना सज्ज

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.