Ind vs Eng : ऑस्ट्रेलिया दौरा गाजवणारा ‘हा’ दिग्गज खेळाडू मैदानात परतला, इंग्लंडची आता खैर नाही
इंग्लंडविरुद्ध (England) अहमदाबाद येथे होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया (Team India) सध्या जोरदार तयारी करीत आहे.
अहमदाबाद : इंग्लंडविरुद्ध (England) विरुद्ध अहमदाबाद येथे होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया (Team India) सध्या जोरदार तयारी करीत आहे. हा सामना 4 मार्चपासून खेळवला जाणार आहे. यानंतर उभय संघांमध्ये टी -20 मालिका खेळवली जाणार आहे. ज्यामध्ये पाच सामने होणार आहेत. अशा परिस्थितीत मर्यादित षटकांच्या मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट संघाला मोठा दिलासा मिळाला आहे. टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा अंगठ्याला झालेल्या दुखापतीतून सावरत मैदानात परतला आहे. (India vs England Ravindra Jadeja returns to the field after thumb surgery)
ऑस्ट्रेलियन दौर्यावर असताना जाडेजाच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर जाडेजाच्या अंगठ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला होता. पुरेशी विश्रांती घेतल्यानंतर जाडेजाने आता मैदानावर सराव सुरू केला आहे आणि या सरावादरम्यानचा एक व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामुळे आता सर्वजण जाडेजाच्या कमबॅकच्या प्रतीक्षेत आहेत.
ऑस्ट्रेलिया दौर्यावर सिडनी येथे खेळवण्यात आलेल्या तिसर्या कसोटी सामन्यात रवींद्र जाडेजा जखमी झाला होता. या मालिकेत गोलंदाजी आणि फलंदाजीतही उत्तम कामगिरी करणारा जाडेजा अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे ब्रिस्बेनमधील चौथा आणि निर्णायक कसोटी सामना खेळू शकला नाही. हा सामना जिंकत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियामध्ये सलग दुसर्या कसोटी मालिका विजय आपल्या नावावर नोंदवला.
Back on the field ??#firstday #postsurgery pic.twitter.com/SrCyLx7TQx
— Ravindrasinh jadeja (@imjadeja) March 2, 2021
मर्यादित षटकांच्या मालिकेत पुनरागमन करणार
दरम्यान, आता जाडेजाने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे आणि लिहिले आहे की, “आता मी मैदानात परतलो आहे.” जडेजाच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यातून आता तो पूर्ण बरा झाला आहे, असं दिसत आहे. त्यामुळेच आता त्याने मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी सराव सुरु केला आहे. असं म्हटलं जातंय की, जाडेजा इंग्लंडविरूद्ध टी -20 किंवा वनडे मालिकेद्वारे पुनरागमन करू शकेल.
टी-20 मालिका 12 मार्चपासून सुरु होणार
चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत आणि इंग्लंड दोन्ही संघ आमनेसामने उभे आहेत. मालिकेत टीम इंडिया 2-1 ने पुढे आहे. कसोटी मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये 12 मार्चपासून पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार असून, हे सर्व सामने अहमदाबादमध्ये नव्याने बांधलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवले जाणार आहेत.
एकदिवसीय मालिका पुण्यात
टी-20 मालिकेनंतर दोन्ही संघ तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भिडतील. एकदिवसीय मालिकेतील तिन्ही सामने पुण्यात खेळवले जाणार आहेत. इंग्लंडविरुद्धच्या तिन्ही मालिका आटोपल्यानंतर भारतीय खेळाडू इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या सत्रात खेळतील. रवींद्र जाडेजा आयपीएलमध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जच्या संघाकडून मैदानात उतरेल.
संबंधित बातम्या
India vs England 2021 | टीम इंडियाला भारतात सलग 13 वी कसोटी मालिका जिंकण्याची संधी
टीम इंडियाला झटका, बुमराहची चौथ्या कसोटीसह वनडे, टी-20 मालिकेतून माघार, थेट IPL मध्ये खेळणार?
(India vs England Ravindra Jadeja returns to the field after thumb surgery)