रोहित शर्माची 10 वर्षांपूर्वी सूर्यकुमारच्या बॅटिंगबद्दल भविष्यवाणी, काय होतं ‘ते’ ट्विट?
सूर्यकुमारच्या खेळीविषयी रोहित शर्माने 10 वर्षांपूर्वी एक भविष्यवाणी केली होती. ती भविष्यवाणी खरी ठरलीय.
मुंबई : शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या चौथ्या टी 20 सामन्यात टीम इंडियाने (India vs England 2021 4th T20) इंग्लंडवर 8 धावांनी थरारक विजय मिळवला. भारताने इंग्लंडला विजयासाठी 186 धावांचे आव्हान दिले होते. मात्र इंग्लंडला टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 177 धावाच करता आल्या. मुंबईकर तडाखेबंद फलंदाज सूर्यकुमार यादवने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिल्या डावात फलंदाजी करताना शानदार अर्धशतकी खेळी केली. सुर्याने 31 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांसह 57 धावांची अफलातून खेळी केली. (india vs england Rohit Sharma tweet On Suryakumar yadav 10 Years Ago)
सूर्यकुमारच्या खेळाविषयी रोहित शर्माने 10 वर्षांपूर्वी एक भविष्यवाणी केली होती. ती भविष्यवाणी खरी ठरलीय. सूर्यकुमारने पहिल्याच पदार्पणाच्या सामन्यात धमाकेदार खेळी करत रोहितची भविष्यवाणी खरी ठरवलीय.
रोहितने 10 वर्षांपूर्वी काय भविष्यवाणी केली होती?
सूर्यकुमार यादवविषयी रोहित शर्माने 10 डिसें. 2011 ला म्हणजेच बरोबर 10 वर्षांपूर्वी एक भविष्यवाणी केली होती. सूर्यकुमारविषयी ट्विट करताना रोहित म्हणाला होता, “चेन्नईत बीसीसीआयचा पुरस्कार सोहळा पार पडला. येणाऱ्या काळात काही अद्वितीय खेळाडू समोर येतील. मुंबईकर सूर्यकुमारवरच्या भविष्यावर येणाऱ्या काळात नजर असेल”
Just got done with BCCI awards here in chennai..some exciting cricketers coming up..Suryakumar yadav from Mumbai to watch out for in future!
— Rohit Sharma (@ImRo45) December 10, 2011
सूर्यकुमारची धमाकेदार इनिंग
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात अहमदाबादमध्ये चौथा टी 20 सामना (India vs England 2021 4th T20) खेळला गेला. या सामन्यात मुंबईकर सूर्यकुमार यादवने शानदार (Suryakumar Yadav) कामगिरी केली. सूर्याने आपल्या बॅटिंग करतानाच्या पहिल्या सामन्यात अफलातून अर्धशतक झळकावलं आहे. सूर्याने अवघ्या 28 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांसह अर्धशतक लगावलं
सूर्याच्या टी 20 कारकिर्दीतील पहिलंवहिलं अर्धशतक ठरलं. सूर्याने इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातून पदार्पण केलं होतं. पण त्याला त्या सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली नव्हती. त्यामुळे सूर्यकुमार आपल्या कारकिर्दीती दुसऱ्या सामन्यात फलंदाजी करताना अर्धशतक लगावणारा तिसरा भारतीय ठरला.
हे ही वाचा :