Ind vs Eng T 20 Series | 1 ओव्हरमध्ये 5 सिक्स खेचत टीम इंडियामध्ये स्थान मिळवलं, ‘हा’ खेळाडू टी 20 मालिकेत इंग्लंडच्या गोलंदाजांची पिसं काढण्यासाठी सज्ज

राहुल तेवतियाने (Rahul Tewatiya) आयपीएलच्या 13 व्या मोसमात पंजाब विरुद्धच्या सामन्या शेल्डॉन कॉट्रेलच्या गोलंदाजीवर 5 चेंडूत 5 सिक्स फटकावले होते.

Ind vs Eng T 20 Series | 1 ओव्हरमध्ये 5  सिक्स खेचत टीम इंडियामध्ये स्थान मिळवलं, 'हा' खेळाडू टी 20 मालिकेत इंग्लंडच्या गोलंदाजांची पिसं काढण्यासाठी सज्ज
राहुल तेवतियाने (Rahul Tewatiya) आयपीएलच्या 13 व्या मोसमात पंजाब विरुद्धच्या सामन्या शेल्डॉन कॉट्रेलच्या गोलंदाजीवर 5 चेंडूत 5 सिक्स फटकावले होते.
Follow us
| Updated on: Feb 21, 2021 | 11:56 AM

मुंबई : इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी टीम इंडियाची (India vs England T 20 Series) घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेसाठी काही अनुभवी खेळाडूंचे पुनरागमन झालं आहे. काही खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. तर नव्या दमाच्या स्टार खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. यामध्ये राहुल तेवतिया (Rahul Tewatia) या अफलातून अष्टपैलू खेळाडूची निवड करण्यात आली आहे. (india vs england t 20 series rahul tewatiya selected in team india after hitting 5 sixes in ipl 2020)

राहुल तेवतियाने आयपीएलच्या 13 व्या मोसमात शानदार कामगिरी केली. राहुलने शारजाहमध्ये विजयी आव्हानाचं पाठलाग करताना एकाच ओव्हरमध्ये 5 सिक्स फटकावले होते. त्याने ही कामगिरी पंजाब विरुद्ध केली होती. 27 सप्टेंबर 2020 ला सामना खेळण्यात आला. पंजाबने राजस्थानला विजयासाठी 224 धावांचे तगडे आव्हान दिले होते.

राजस्थानच्या टॉप ऑर्डरमधील सर्व फलंदाजांनी धमाकेदार खेळी केली. यामुळे राजस्थानची 16.1 ओव्हरमध्ये 161 अशी स्थिती झाली होती. सामना रंगतदार स्थितीत पोहचला होता. विजयासाठी 23 चेंडूत 63 धावांची आवश्यकता होती. तेवतिया मैदानात खेळत होता. तेवतियाने पहिल्या 19 चेंडूत अवघ्या 8 धावा केल्या होत्या. तेवतिया राजस्थानच्या पराभवाचं कारण ठरणार होता.

5 चेंडूत 5 सिक्स

शेल्डॉन कॉट्रेल सामन्यातील 18 वी ओव्हर टाकायला आला. तेवतियाने निर्णायक क्षणी गियर बदलला. तेवतियाने शेल्डॉन कॉट्रेलच्या ओव्हरमध्ये धमाकेदार उत्तुंग 5 षटकार खेचले. तेवतियाने सामना पूर्णपणे राजस्थानच्या बाजून झुकवला. तेवतियाने मॅच विनिंग खेळी केली. त्याने एकूण 31 चेंडूत 7 सिक्सच्या मदतीने 53 धावांची विजयी खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे राजस्थानने पंजाबवर विजय मिळवला. तेवतिया मॅचविनर ठरला. त्याच्या या खेळीमुळे तो घराघरात पोहचला. क्रिकेट विश्वात त्याची चर्चा होऊ लागली.

तेवतियाने यानंतर या 13 व्या मोसमात बॅटिंगसह बोलिंग आणि फिंल्डिंग अशा तिनही आघाड्यांवर दमदार कामगिरी केली. त्याने एकूण 10 विकेट्स घेतल्या. यासह राजस्थानकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज ठरला.

डोमेस्टिक क्रिकेटमधील कारकिर्द

तेवतिया देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत हरयाणाचे प्रतिनिधित्व करतो. त्याने आतापर्यंत एकूण 21 लिस्ट ए सामन्यात 113 च्या स्ट्राईक रेटने 484 धावा केल्या आहेत. तसेच 27 विकेट्सही घेतल्या आहेत. सोबतच 68 टी20 सामन्यांमध्ये 150 च्या स्ट्राइक रेटने 965 रन्स केल्या आहेत. तसंच 7 च्या इकॉनॉमी रेटने 42 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. दरम्यान राहुल आता इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेत कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी टीम इंडिया :

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रिषभ पंत(यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वाॅशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, दिपक चहार, नवदीप सैनी आणि शार्दुल ठाकूर.

संबंधित बातम्या :

क्रिकेट की बॅडमिंटन? होता द्विधा मनस्थितीत, IPL मधून घरोघरी पोहचला, आता टीम इंडियाकडून खेळणार

India vs England T20 | इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, मुंबईच्या ‘या’ स्टार खेळाडूला संधी

(india vs england t 20 series rahul tewatiya selected in team india after hitting 5 sixes in ipl 2020)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.