India Vs England T 20 : सर्वाधिक षटकार खेचणारे 5 फलंदाज, पहिल्या क्रमांकावर ‘हा’ खेळाडू, रोहितचा नंबर कितवा?

 कसोटी मालिकेनंतर भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-ट्वेन्टी मालिकेला आता 12 मार्चपासून  सुरुवात होत आहे. | India Vs England T 20

India Vs England T 20 : सर्वाधिक षटकार खेचणारे 5 फलंदाज, पहिल्या क्रमांकावर 'हा' खेळाडू, रोहितचा नंबर कितवा?
रोहित शर्मा
Follow us
| Updated on: Mar 09, 2021 | 9:49 AM

अहमदाबाद : भारत आणि इंग्लंड (India Vs England T 20) यांच्यातील टी ट्वेन्टी मालिकेला (T 20 Series) येत्या 12 मार्चपासून सुरुवात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर (narendra modi Stadium) हा सामना खेळवला जाईल. भारताने इंग्लंडविरुद्ध शेवटचा टी-ट्वेन्टी सामना 2018 मध्ये खेळला होता जो जिंकण्यात भारतीय संघाला यश आलं होतं. आपण नजर टाकूया भारत विरुद्ध इंग्लंड संघातील एकमेकांविरुद्ध सर्वाधिक षटकार खेचणारे टॉप पाच फलंदाज कोणते आहेत…?

इयॉन मॉर्गन (Eoin Morgan)

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सर्वाधिक षटकार खेटणाऱ्या फलंदाजांमध्ये क्रमांक एकचा फलंदाज आहे इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गन. मॉर्गनने टी -20 मध्ये भारताविरुद्ध 11 सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने 17 षटकार लगावले आहेत. भारताविरुद्ध टी ट्वेन्टीत मॉर्गनने 21 चौकारही मारले आहेत. मॉर्गनने आतापर्यंत टी -२० मध्ये भारताविरुद्ध 414 धावा केल्या आहेत. इंग्लंडकडून मॉर्गनने टी-20 मध्ये भारताविरुद्ध सर्वाधिक धावा ठोकल्या आहेत.

युवराज सिंह आणि सुरेश रैना (Yuvraj Singh And Suresh Raina)

भारताचा माजी खेळाडू युवराज सिंग भारत-इंग्लंड टी -20 सामन्यांत सर्वाधिक षटकार खेचणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. युवराज सिंगने इंग्लंडविरुद्ध 15 षटकार लगावले आहेत. त्याचबरोबर सुरेश रैनाने इंग्लंडविरुद्ध 15 षटकार खेचण्याचा पराक्रम केलाय.

जेसन रॉय, अॅलेक्स हेल्स (jason Roy And Alex hales)

सर्वाधिक षटकार खेचणाऱ्या फलंदाजांमध्ये इंग्लंडचा जेसन रॉय तिसऱ्या क्रमांकावर आहे. रॉयने टी -20 मध्ये भारताविरुद्ध 12 षटकार ठोकले आहेत. भारताविरुद्ध अ‍ॅलेक्स हेल्सने 11 षटकार लगावले आहेत. भारत-इंग्लंड टी -20 मध्ये हेल्स चौथ्या क्रमाकांचा फलंदाज आहे ज्याने सर्वाधिक षटकार खेचणाणाऱ्या फलंदाजांच्या यादीत स्थान मिळवलंय.

के.एल.राहुल आणि रोहित शर्मा (K.L. ahul And Rohit Sharma)

भारताचा धडाकेबाज फलंदाज के.एल.राहुल आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. इंग्लंडविरुद्ध टी 20 त्याने 10 षटकार लगावले आहेत. तर त्याखालोखाल रोहित शर्माचा नंबर आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध 8 सिक्सर लगावले आहेत.

रोहित आणि के.एल.ची धडाकेबाज कामगिरी

भारत आणि इंग्लंड यांच्यात टी -20 मध्ये शतक झळकविणारे दोनच फलंदाज आहेत. इंग्लंडविरुद्ध टी -२० मध्ये शतके ठोकण्यात यशस्वी झालेले रोहित शर्मा आणि केएल राहुल हे दोन फलंदाज आहेत. 2018 मध्ये ब्रिस्टल टी -२० मध्ये रोहितने इंग्लंडविरुद्ध नाबाद 100 धावा केल्या. त्या खेळीत हिट मॅनने 56 चेंडूंचा सामना केला. त्यामध्ये त्याने 11 चौकार तसंच 5 षटकार लगावले. केएल राहुलने 3 जुलै 2018 ला मँचेस्टर टी -20 मध्ये इंग्लंडविरुद्ध 54 चेंडूत नाबाद 101 धावांची खेळी खेळली. या डावात केएल राहुलने 10 चौकार आणि 5 षटकार लगावले.

टी 2O सीरिजचे वेळापत्रक

12 मार्च | पहिली टी 20 मॅच | संध्याकाळी 7 वाजता

14 मार्च | दुसरी टी 20 मॅच | संध्याकाळी 7 वाजता

16 मार्च | तिसरी टी 20 मॅच | संध्याकाळी 7 वाजता

18 मार्च | चौथी टी 20 मॅच | संध्याकाळी 7 वाजता

20 मार्च | पाचवी टी 20 मॅच | संध्याकाळी 7 वाजता

या टी 20 मालिकेला 12 मार्चपासून सुरुवात होत आहे. या मालिकेत एकूण 5 सामने खेळवण्यात येणार आहेत. हे सर्व सामने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहेत.

इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी टीम इंडिया :

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रिषभ पंत(यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, दिपक चहार, नवदीप सैनी आणि शार्दुल ठाकूर.

अशी आहे इंग्लंड टीम :

इयन मॉर्गन (कॅप्टन), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेयरस्टो, सॅम बिलींग्ज, जोस बटलर, सॅम करन, टॉम करन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिंग्विनस्टोन, डेविड मलान, आदिल राशिद, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रिस टोपेल आणि मार्क वुड.

हे ही वाचा :

India vs England T 20I | इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेत ‘हा’ खेळाडू मॅचविनर ठरणार, व्हीव्हीएस लक्ष्मणची भविष्यवाणी

Rishabh Pant | पंत म्हणजे डावखुरा सेहवाग, रिषभच्या आक्रमक फलंदाजीचा दिग्गज क्रिकेटपटू दिवाना

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.