अंपायनरने दिलेला सॉफ्ट सिग्नल म्हणजे काय? ज्याच्यामुळे सूर्यकुमारची खेळी संपुष्टात आली!

सॉफ्ट सिग्रनच्या आधारे सूर्यकुमारला थर्ड अंपायरने बाद घोषित केलं. पण हे सॉफ्ट सिग्नल म्हणजे नेमकं काय? त्याचे काय नियम आहेत...?

अंपायनरने दिलेला सॉफ्ट सिग्नल म्हणजे काय? ज्याच्यामुळे सूर्यकुमारची खेळी संपुष्टात आली!
Indis Vs England t20 umpire Soft Signal Suryakumar Yadav
Follow us
| Updated on: Mar 19, 2021 | 7:21 AM

अहमदाबाद : टीम इंडियाने इंग्लंडवर चौथ्या टी 20 सामन्यात (india vs england 4th t2oi) 8 धावांनी शानदार विजय मिळवला. आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव  (suryakumar yadav) या सामन्याचा हिरो ठरला. त्याने केवळ 31 चेंडूत धमाकेदार 57 धावांची खेळी केली. मात्र थर्ड अंपायर्सने त्याला विचित्र पद्धतीने बाद देऊन त्याची आक्रमक खेळी संपुष्टात आणली. सॉफ्ट सिग्रनच्या आधारे सूर्यकुमारला थर्ड अंपायरने बाद घोषित केलं. पण हे सॉफ्ट सिग्नल म्हणजे नेमकं काय? त्याचे काय नियम आहेत…? (India Vs England t20 umpire Soft Signal Suryakumar Yadav And Washington Sundar)

काय आहे सॉफ्ट सिग्नल?

जर ग्राऊंड अम्पायर एखाद्या निर्णयावर ठाम नाहीत त्यावेळी ते तिसऱ्या अंपायरची मदत घेतात परंतु ती घेताना त्यांना आपला एक निर्णय द्यावा लागतो त्यालाच सॉफ्ट सिग्नल असं म्हणतात. हा सिग्नल आऊट किंवा नॉटआऊटचा असतो. आता थर्ड अंपायरने पण एखाद्या निर्णयावेळी 100 टक्के खात्रीशीर नसतील तर अशावेळी ते मैदानी अंपायरने दिलेल्या सॉफ्ट सिग्नलवर आपला पुढील निर्णय घेतात. अशावेळी मैदानी अंपायरने दिलेला निर्णय महत्त्वाचा ठरतो. सॉफ्ट सिग्नल आणण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे टू डायमेंशनल टीव्ही कॅमेरामध्ये व्हिज्युअल्स क्लिअर न दिसणे. याचमुळे बहुदा थर्ड अंपायर बॅट्समनला नॉट आऊट द्यायचे.

सूर्यकुमार कसा आऊट झाला?

आपल्या पहिल्या सामन्यात सूर्या चांगल्या रंगात दिसत होता. त्याने षटकार खेचून आपला आक्रमक रंग दाखवून दिला. त्यानंतर सूर्याने चौफेर फटकेबाजी केली. 28 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर सूर्यकुमार आणखी आक्रमक झाला होता.

सॅम करण 14 वी ओव्हर टाकायला आला. या ओव्हरमधील दुसऱ्या चेंडूवर सूर्याने 57 धावांवर असताना जोरदार फटका मारला. मात्र तो कॅच डेव्हिड मलानने पकडला. डेव्हिड मलानने टिपलेला चेंडूचा जमीनीला स्पर्श झाला की नाही, याबाबत फिल्ड अंपायर्सना शंका होती. त्यामुळे त्यांनी याबाबतचा निर्णय थर्ड अंपायर्सना घ्यायला लावला. मात्र तिसऱ्या अंपायरही अचूक निर्णय देऊ शकले नाहीत. थर्ड अंपायरने सूर्याला बाद घोषित केलं. यामुळे नेटकऱ्यांमध्ये नाराजी आणि संतापाचं वातावरण पाहायला मिळतंय.

सॉफ्ट सिग्नलमध्ये बदलासाठी प्रस्ताव

सॉफ्ट सिग्नलमध्ये अनेक वेळा फलंदाजांना कारण नसताना तंबूत परतावं लागत आहे. अशावेळी सॉफ्ट सिग्नलमध्ये बदलासाठी प्रस्ताव आणण्याच्या विचार सुरु आहे.

(India Vs England t20 umpire Soft Signal Suryakumar Yadav And Washington Sundar)

हे ही वाचा :

India vs England 4Th T20i | शार्दुलचा भेदक मारा, सूर्यकुमारची अर्धशतकी खेळी, मुंबईकर खेळाडूंची विजयी कामगिरी

India vs England 2021, 4th T20 | अटीतटीच्या सामन्यात टीम इंडियाची इंग्लंडवर 8 धावांनी मात, मालिकेत 2-2 ने बरोबरी

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.